Submitted by अni on 17 September, 2024 - 11:12
निर्जन जंगल .. पाणवठ्यावरची थोडी दलदल आणि सांजवेळ. पाणकोंबडी पकडायला अजून काय हवे. बस फक्त थोडी सबुरी. ती तर म्हादूकडे बक्कळ होतीच आणि पिढीजात अनुभवसुद्धा. आज पाटलाच्या वाड्यावरच्या जंगी पार्टीचे मुख्य आकर्षण शमवणे म्हादूच्याच हातात होतं. खास भूयारासारख्या केलेल्या ठिकाणापासून सावजाचा शोध सुरू झाला...
पावसाची रिपरिप चालूच होती.
दबक्या पावलांनी थोडं पुढे गेल्यावर चिमुरडी मंदा दिसल्याने तो जागेवरच थिजला. विचारांनी आणि पावसानं अचानक जोर धरला. पाटलाने पुन्हा डाव साधला होता. आजच्या पार्टीचे कारण कळल्यावर तिथं आता दोन कलेवर होती.
रक्ताळलेल्या कपड्यांच्या चिंध्या झालेलं मंदाचे एक आणि सर्वधर्मसमभाव नावाच्या शाळेतल्या शिकवणीचे म्हादुच्या मनाचे एक असे ते दोघे मुसळधार पावसात होते, पण कोरडेच.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सत्य परिस्थिती.
सत्य परिस्थिती.
सर्वधर्मसमभाव>>> ह्य शब्दाचे प्रयोजन कळले नाही.
सर्वधर्मसमभाव>>> ह्य शब्दाचे
सर्वधर्मसमभाव>>> ह्य शब्दाचे प्रयोजन कळले नाही.
++
मलाही!