इन्स्टा गर्ल परी - रील्स आणि शॉर्ट विडिओ :-)
इन्स्टा गर्ल परी - रील्स आणि शॉर्ट विडिओ
हा लेकीच्या इन्स्टा रील्सना जोडून केलेला युट्यूब व्हिडिओ.
https://www.youtube.com/watch?v=5eAfuoDOpG0
इन्स्टा गर्ल परी - रील्स आणि शॉर्ट विडिओ
हा लेकीच्या इन्स्टा रील्सना जोडून केलेला युट्यूब व्हिडिओ.
https://www.youtube.com/watch?v=5eAfuoDOpG0
हा या विभागातील माझा दुसरा धागा. हा देखील लेकीच्याच कौतुकात काढला आहे
पहिला धागा लेकीने घरी रंगवलेल्या पणत्यांचा होता - https://www.maayboli.com/node/77232
तशी चित्रकला हस्तकलेची तिला उपजतच आवड असली तरी मधल्या काळात तिने फार काही ती जोपासली नव्हती वा यात काही विशेष प्रगती नव्हती. कोणाचा बड्डे आला तर एखादे ग्रीटींग तेवढे बनवायची.
आमची पोरगी समरकॅम्पला जातेय म्हटले की लोकांना वाटायचे पोरीला सिंगिंग और डान्सिंग का शौक असेल. पण आमचा समरकॅम्प मात्र मार्शल आर्ट ग्रूपचा होता. ज्या दिवशी पोरीला समरकँपला पाठवायचे नक्की केले त्या दिवशी दोन्ही घरात एक टेंशनचे वातावरण निर्माण झाले. कारण पहिल्यांदाच पोरगी तीन दिवस आणि दोन रात्र चक्क एकटी कुठेतरी जाणार होती. खरे तर हे आम्हालाच तीन दिवस दोन रात्र शांततेत व्यतीत करायचे पॅकेज मिळत होते पण जोक्स द अपार्ट, चिंता होतीच.
गुलमोहर - ईतर कला या विभागातील माझा हा पहिलाच धागा. किंबहुना या विभागाचे सदस्यत्वही आज आत्ताच घेतले आहे. कधी घेईल असे वाटलेही नव्हते. कारण कुठल्याही कलेशी माझा दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही. पण मुलीसाठी म्हणून आज ईथे यावे लागले
लेकीचा धागा म्हणून नो बकवास सिधी बात,
आज वर भिंती तिने बरेच रंगवल्या, परवा पणत्यांवर हात साफ केला.
रंगसंगती, डिजाईन वगैरे सारेच तिच्याच मनाचे. दहा दहा मिनिटांत एक पणती तयार झाली.
स्पर्धेसाठी म्हणून या आधी खालील धाग्यावर प्रवेशिका दिली होती
https://www.maayboli.com/node/76386
ती आता मागे घेत आहे
कारण स्पर्धेची वेळ वाढवण्यात आली असल्याने आमच्यातील किडा शांत बसणे आता शक्य नव्हते.
खरे तर आधीची वारली बूकमार्क किंवा टू ईन वन (बूकमार्क + हेअरक्लिप) कल्पना मला आवडलीच होती,
हे असे भेंडी बटाट्याचे काप आणि दोरी रंगात बुडवून चित्र काढणे मीच कधी लहानपणी केले नाही, तर पोरीला काय समजावणार होतो. त्यामुळे उगाच भाज्यांची नासाडी करण्यापेक्षा हाताच्या बोटांनी काहीतरी कलरफुल कर म्हणालो. जे तिचे फार आवडते आहे, फक्त कागदावर नाही तर तिला अश्या भिंती रंगवायला आवडतात
तुझे साहित्य तूच ठरव म्हटले. तर तिने टूथब्रश मागितला. म्हटले छान आयड्या आहे. त्याचा तुला फवाराही ऊडवता येईल.
बूकमार्क म्हणजे काय असते?
ज्या दिवशी हि स्पर्धा जाहीर झाली त्या दिवशीच मी हा प्रश्न फार निरागसपणे विचारला होता.
मला अॅक्चुअली बूकमार्क हा प्रकार माहीत नव्हता. किंवा कदाचित पाहिला होता, पण यालाच बूकमार्क ऐसे नाव हे माहीत नव्हते. एखाद्या ईटरनेटवरील साईटच्या लिंकला सेव्ह बूकमार्क करतात हे माहीत होते. पण ते बनवायची कशी काय स्पर्धा असू शकते याने आणखी गोंधळून गेलो होतो. मग कोणीतरी बूकमार्क काय असते हे मला समजावले. ते बघून मला ईतके साधे लक्षात आले नाही याचे स्वत:शीच हसायला आले. पण हा ऋन्मेष म्हणजे उगाच वेड पांघरूण पेडगावला जातो या ईमेजमुळे ईतर कोणी माझ्या या अज्ञानावर हसले नसावे.
३० जून २०१८
she is very naughty..
She is most talkative..
And she is very loud.. उसे अपनी वॉईस कंट्रोल ही नही होती..
जब तक वो सोती रहती है तो क्लास शांत रहता है.. पर जब उठ जाती है तो.. जिस टेबल के पास वो जाती है वहा हल्लागुल्ला मच जाता है
पर उसको सिरीअसनेस नही है. उस दिन उसको पनिशमेंट दी. Pari stand there.. तो हसते हुए वहा जाके खडी हो गयी. और वहा पे भी मस्ती चालू.
फिर उसे क्लास के बाहर जाने को कहा, pari its punishment! Go and stand out of the class.. तो हसते हुए क्लास के बाहर निकल गयी ..
४ फेब्रुवारी २०१७
आमच्यावेळी पालकसभा व्हायच्या. पालकांना वर्गात बसवून आम्हा वर्गातल्या "निवडक" आठ-दहा मुलांना सर्व पालकांसमोर उभे केले जायचे. अश्या निवडक मुलांमध्ये नसल्यास तो आपला अपमान समजून मी नेहमीच त्यात असेन ही काळजी घ्यायचो. आणि मग आमची खर्या अर्थाने ‘शाळा’ घेतली जायची. त्यानंतर एक राऊंड घरीही व्हायचा तो वेगळा.