हे असे भेंडी बटाट्याचे काप आणि दोरी रंगात बुडवून चित्र काढणे मीच कधी लहानपणी केले नाही, तर पोरीला काय समजावणार होतो. त्यामुळे उगाच भाज्यांची नासाडी करण्यापेक्षा हाताच्या बोटांनी काहीतरी कलरफुल कर म्हणालो. जे तिचे फार आवडते आहे, फक्त कागदावर नाही तर तिला अश्या भिंती रंगवायला आवडतात
तुझे साहित्य तूच ठरव म्हटले. तर तिने टूथब्रश मागितला. म्हटले छान आयड्या आहे. त्याचा तुला फवाराही ऊडवता येईल.
चित्र सुरू करायच्या आधीच तिला सांगितले की कदाचित स्पर्धेची तारीख काल रविवारीच संपली असेल त्यामुळे आपण फक्त टाईमपास म्हणून काहीतरी वेगळे करायचे म्हणून हे करतोय. जेणेकरून प्रयोगाच्या नादात चित्र गंडलेच तर तिला वाईट वाटू नये.
पण सुरुवात तरी छान झाली. टूथब्रशचा कलर ब्रशसारखा वापर करून तिचे आधी नीचे धरती उपर अंबर रंगवून झाले. मग त्या आकाशावर टूथब्रशनेच फवारा मारताच छान चांदण्या अवतरल्या. बोटांनी एक छानशी नाजूक चंद्रकोरही काढली. आणि चित्र जमतेय म्हणत मी पहिला फोटो काढला
प्रचि १
त्यानंतर टेनिसचे रॅकेट घेत त्याच्या जाळीवरून कलर मारला. छान हलकासा जाळीदार टेक्चर असलेला चौकोन तयार झाला. हे काय आहे म्हणून मी विचारले तर गार्डनमधील बेंच असे उत्तर मिळाले. आम्हाला समजावे म्हणून लगोलग बोटाने त्याचे पायही काढले. दोन पाय डाऊन टू अर्थ, तर दोन अहंकाराने हवेत होते. आपले चित्र पुर्ण व्हायच्या आधीच हा माणूस उगाच कश्याला फोटो काढतोय म्हणून मला एक लूक सुद्धा देऊन झाला. कारण तिला तिचे चित्र पुर्ण तयार झाल्यावरच लोकांना दाखवायला आवडते. अध्येमध्ये सल्ले लुडबूड नको असते.
प्रचि २
प्रचि ३
त्यानंतर मग झपझप आजूबाजूला हिरवे गार्डन आले. उगाचच त्या बेंचवर बोटाने काळी जाळी काढून आधीचे जमलेले टेक्चर बिघडवून टाकले. त्यानंतर बोटाने आणि टूथब्रशने काढायला बोअर झाले असावे म्हणून कलर ब्रशने छान काळेकुट्ट डोंगर काढले. मी लगेच नियमावर बोट ठेवले आणि तो ब्रश अलाऊड नाहीये असे म्हटले. तर लगेच तिने तावातावाने आपले बोट वापरून पाऊस पाडून झाला. डोंगर का काळे केले? असे विचारले असता रात्र आहे असे उत्तर मिळाले. रात्रीचा विषय निघताच माझी नजर वर चंद्रावर गेली, सुरुवातीच्या चंद्रकोरीचा पुर्ण चंद्र झाला होता. तसेच तो ही थोडासा काळवंडला होता. कदाचित चंद्रावरही रात्र असावी. क्वाईट पॉसिबल. पण काही का असेना, झाले एकदाचे चित्र पुर्ण म्हणत बिचारा स्माईल करत होता
प्रचि ४
तर हा तोच पसारा जो मी तिच्या मदतीने आवरला. त्यातच वापरलेले साहित्यही सापडेल - टूथब्रश, कलरब्रश, हातांची बोटे, टेनिस रॅकेट आणि वॉटर कलर
प्रचि ५
आणि हा आमच्या परंपरेला अनुसरून
प्रचि ६
आर्ट अॅण्ड आर्टिस्ट
तिच्या मम्माला तिच्या ईतर चित्रकारीच्या मानाने हे चित्र फारसे आवडले नसावे, ती उत्सुक नव्हती हे प्रकाशित करायला. पण मी मात्र माझी पसारा आवरायची मेहनत आणि धागा काढायची संधी वाया जाऊ देणार नव्हतोच, त्यामुळे एंट्री टाकलीच
- ऋन्मेऽऽष
छान आहे चित्र आणि मस्त वर्णन!
छान आहे चित्र आणि मस्त वर्णन!
परीची कल्पनाशक्ती खूप छान आहे
परीची कल्पनाशक्ती खूप छान आहे. चित्र आणि चित्रकार दोन्ही गोड.
खूप सुंदर.
खूप सुंदर.
झकास!
झकास!
मस्त
मस्त
छान झालेय चित्र.
छान झालेय चित्र.
वर्णनाच्या मदतीने चित्र समजलं
वर्णनाच्या मदतीने चित्र समजलं. बाकडं, पाऊस , रात्र, भर पावसातला चंद्र इत्यादी परीच्या नजरेतून पाहायला मजा आली
फारच मस्त काढलंय चित्रं.
फारच मस्त काढलंय चित्रं. शाब्बास परी!
छानच! आकाश छान दिसतंय पहिल्या
छानच! आकाश छान दिसतंय पहिल्या फोटोत!
छान छान चित्र परी राणी
छान छान चित्र परी राणी
छान चित्र काढलयं.. लेकीचा
छान चित्र काढलयं.. लेकीचा हेअरकट आवडला.
चित्राचा अजून एक जवळून फोटो
चित्राचा अजून एक जवळून फोटो काढ ऋ. बाकी प्रोसेस, वर्णन आणि परी सगळंच गोड. चित्र ही छान आहे पण नीट दिसत नाहीये.
भारी काढलंय चित्र.
भारी काढलंय चित्र.
खूपच छान
खूपच छान
चित्राचा अजून एक जवळून फोटो
चित्राचा अजून एक जवळून फोटो काढ ऋ.
>>>
हो हे नंतर लक्षात आले. पण पहाट होत आलेली. आता शोधून काढतो आणि टाकतो
क्लोज फोटो अपडेट केला,
क्लोज फोटो अपडेट केला, सुचवल्याबद्दल धन्यवाद धनुडी, पसार्यातून मोठ्या मुश्कीलीने शोधावा लागला
परी फॅन क्लब मध्ये माझे नाव
परी फॅन क्लब मध्ये माझे नाव वरती राहावे हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना
वर्णनाच्या मदतीने चित्र समजलं
वर्णनाच्या मदतीने चित्र समजलं. बाकडं, पाऊस , रात्र, भर पावसातला चंद्र इत्यादी परीच्या नजरेतून पाहायला मजा आली >>>>>>> +१.
लेक क्यूट आहे.
परीराणी काय गोड चित्र काढलंस
परीराणी काय गोड चित्र काढलंस तुझ्यासारखं
वर्णनाच्या मदतीने चित्र समजलं
वर्णनाच्या मदतीने चित्र समजलं. बाकडं, पाऊस , रात्र, भर पावसातला चंद्र इत्यादी परीच्या नजरेतून पाहायला मजा आली ..."+1
रॅकेटचा वापर करून जाळीदार
रॅकेटचा वापर करून जाळीदार बेंच..मस्त डोकं चालवलंय परीने. आणि भाज्यांची नासाडी न केल्याबद्दल एक्स्टा् मार्क्स एंड प्रोडक्टही छान
खूप खूप धन्यवाद सर्वांचे
खूप खूप धन्यवाद सर्वांचे मनापासून आभार
खरे तर तिला आम्ही वॉटर कलर कधी देत नाहीत कारण हात पाय कपडे सारे घर रंगवून ठेवते
आणि तिलाही फारसे ते आवडत नाहीत, कारण पाणी टाकून बनवायचे कष्ट कोण घेणार, त्यापेक्षा आयते क्रेयॉन झपझप मारता येतात
बाकी क्रेयॉन असले की मग तिला कुठलाही कॅनव्हास छोटा वाटतो, या लॉकडाऊन काळातच एक दिवस भिंतीवरचा पोस्टर निखळलेला, तो उलटा करून तिने लगेच असा हात साफ केला. माझी चहा पिऊन संपेपर्यंत चित्र तयार होते
..
भिंतीवरचे रंगकाम मस्त आहे,
भिंतीवरचे रंगकाम मस्त आहे, त्याचा फोटू टाका
आता नव्या घरात भिंतीवर
आता नव्या घरात भिंतीवर
चालू केले का रंगकाम?
शाब्बास परी!! पसारा
शाब्बास परी!! पसारा आवरल्याबद्दल बाबाचेही कौतुक!
खूप छान परी
खूप छान परी
@ देवकी,
@ देवकी,
नव्या घरात शक्य्ता कमी आहे. कारण आता परीची भिंती रंगवायची हौस फिटली आहे. आणि रुनूला तो छंद नाहीये. असता तर अडवून त्यावर अन्याय होऊ दिला नसता
@ ब्लॅककॅट, त्या भिंती तर आमच्या दर फोटोत बॅलग्रांऊडला असतातच. मुद्दाम त्यांचेच फोटो काही काढले असतील तर शोधावे लागतील. सापडल्यास तो नवीन लेखाचा विषय होईल
आमच्यातही सेम एक असेच चित्र
आमच्यातही सेम एक असेच चित्र काढले होते , झाड , 90 अंश कोनात मोडकी फांदी , त्यावर पक्षी
हे झाड , मुले , हे कागदाच्या त्याच कोपऱ्यात तसेच रंगवले आहेत,
तुमच्या झाडावरचे आंबे खाऊन सम्प्ले वाटते
झाड आंब्याचे आहे की कसले
झाड आंब्याचे आहे की कसले कल्पना नाही. त्यावरच्या घरट्यातील पक्ष्यांना विचारयला हवे.
किती गोडूली दिसतेय परी.
किती गोडूली दिसतेय परी. चित्र ही फर्मास आहे
Pages