हे असे भेंडी बटाट्याचे काप आणि दोरी रंगात बुडवून चित्र काढणे मीच कधी लहानपणी केले नाही, तर पोरीला काय समजावणार होतो. त्यामुळे उगाच भाज्यांची नासाडी करण्यापेक्षा हाताच्या बोटांनी काहीतरी कलरफुल कर म्हणालो. जे तिचे फार आवडते आहे, फक्त कागदावर नाही तर तिला अश्या भिंती रंगवायला आवडतात
तुझे साहित्य तूच ठरव म्हटले. तर तिने टूथब्रश मागितला. म्हटले छान आयड्या आहे. त्याचा तुला फवाराही ऊडवता येईल.
चित्र सुरू करायच्या आधीच तिला सांगितले की कदाचित स्पर्धेची तारीख काल रविवारीच संपली असेल त्यामुळे आपण फक्त टाईमपास म्हणून काहीतरी वेगळे करायचे म्हणून हे करतोय. जेणेकरून प्रयोगाच्या नादात चित्र गंडलेच तर तिला वाईट वाटू नये.
पण सुरुवात तरी छान झाली. टूथब्रशचा कलर ब्रशसारखा वापर करून तिचे आधी नीचे धरती उपर अंबर रंगवून झाले. मग त्या आकाशावर टूथब्रशनेच फवारा मारताच छान चांदण्या अवतरल्या. बोटांनी एक छानशी नाजूक चंद्रकोरही काढली. आणि चित्र जमतेय म्हणत मी पहिला फोटो काढला
प्रचि १
त्यानंतर टेनिसचे रॅकेट घेत त्याच्या जाळीवरून कलर मारला. छान हलकासा जाळीदार टेक्चर असलेला चौकोन तयार झाला. हे काय आहे म्हणून मी विचारले तर गार्डनमधील बेंच असे उत्तर मिळाले. आम्हाला समजावे म्हणून लगोलग बोटाने त्याचे पायही काढले. दोन पाय डाऊन टू अर्थ, तर दोन अहंकाराने हवेत होते. आपले चित्र पुर्ण व्हायच्या आधीच हा माणूस उगाच कश्याला फोटो काढतोय म्हणून मला एक लूक सुद्धा देऊन झाला. कारण तिला तिचे चित्र पुर्ण तयार झाल्यावरच लोकांना दाखवायला आवडते. अध्येमध्ये सल्ले लुडबूड नको असते.
प्रचि २
प्रचि ३
त्यानंतर मग झपझप आजूबाजूला हिरवे गार्डन आले. उगाचच त्या बेंचवर बोटाने काळी जाळी काढून आधीचे जमलेले टेक्चर बिघडवून टाकले. त्यानंतर बोटाने आणि टूथब्रशने काढायला बोअर झाले असावे म्हणून कलर ब्रशने छान काळेकुट्ट डोंगर काढले. मी लगेच नियमावर बोट ठेवले आणि तो ब्रश अलाऊड नाहीये असे म्हटले. तर लगेच तिने तावातावाने आपले बोट वापरून पाऊस पाडून झाला. डोंगर का काळे केले? असे विचारले असता रात्र आहे असे उत्तर मिळाले. रात्रीचा विषय निघताच माझी नजर वर चंद्रावर गेली, सुरुवातीच्या चंद्रकोरीचा पुर्ण चंद्र झाला होता. तसेच तो ही थोडासा काळवंडला होता. कदाचित चंद्रावरही रात्र असावी. क्वाईट पॉसिबल. पण काही का असेना, झाले एकदाचे चित्र पुर्ण म्हणत बिचारा स्माईल करत होता
प्रचि ४
तर हा तोच पसारा जो मी तिच्या मदतीने आवरला. त्यातच वापरलेले साहित्यही सापडेल - टूथब्रश, कलरब्रश, हातांची बोटे, टेनिस रॅकेट आणि वॉटर कलर
प्रचि ५
आणि हा आमच्या परंपरेला अनुसरून
प्रचि ६
आर्ट अॅण्ड आर्टिस्ट
तिच्या मम्माला तिच्या ईतर चित्रकारीच्या मानाने हे चित्र फारसे आवडले नसावे, ती उत्सुक नव्हती हे प्रकाशित करायला. पण मी मात्र माझी पसारा आवरायची मेहनत आणि धागा काढायची संधी वाया जाऊ देणार नव्हतोच, त्यामुळे एंट्री टाकलीच
- ऋन्मेऽऽष
परी गोड आहे.शाब्बास परी
परी गोड आहे.शाब्बास परी
सुंदर प्रात्यक्षिकेसह वर्णन.
सुंदर प्रात्यक्षिकेसह वर्णन. चित्र मस्त दिसतंय. टी-शर्ट वर छपाई करून घ्या.
छान चित्र.
छान चित्र.
वाह गोड परी आणि गोड स्केचेस.
वाह गोड परी आणि गोड स्केचेस. शाब्बास.
परी खूप गोड आहे ऋन्मेऽऽष भाऊ
परी खूप गोड आहे ऋन्मेऽऽष भाऊ तुम्हची आणि न्यू घर पण छान आहे.
धन्यवाद,
धन्यवाद,
धनुडी, कमला, किशोर, सस्मित, अंजू. पुर्वी
सध्या आमच्याकडे मुक्तपणे हस्त
माबो गणेशोत्सव स्पर्धा ईफेक्ट
सध्या आमच्याकडे मुक्तपणे हस्त उधळले जाताहेत
..
..
छान परी
ड पो
छान परी
छान परी
ऋन्मेष, तुम्ही ते मुलाच्या रूम डेकोरेशन चे विचारले होते ना..
काही विशेष नाही पण त्याने असेच त्याच्या आवडीचे कार्टून्स काढून रूममध्ये लावले आहेत.. आता फक्त खिडकी पूर्ण झालीए...सगळ्या भिंतींवर पण चित्र लावायचा प्लान आहे त्याचा.. क्रेयान्स झाले..आता नेक्स्ट वॉटर कलर्स आणि जरा मोठी चित्रं सुरु करणार आहे....
अरे वाह मस्त चित्रे आहेत..
अरे वाह मस्त चित्रे आहेत.. आणि बरीच लावली आहेत.
आमच्याकडे जुन्या घरात तिच्या मम्माने भिंतीवरच असे डोरेमॉन नोबिता शुझुका वगैरे काढलेले आणि तिने रंगवलेले. आता नवीन घरात मात्र सध्या असा विचार आहे की एका भिंतीला आर्ट गॅलरी बनवून तिथे पोरगी जे काही करेल ते लावत राहायचे आणि नवे नवे करेल तसे बदलत राहायचे. आता हॉलमध्येच प्रदर्शन मांडायचे की आमच्या बेडरूमध्ये हे करायचे यावर सध्या विचार चालूय
अभिनंदन परी!
अभिनंदन परी!
धन्यवाद सोनाली,
धन्यवाद सोनाली,
आणि विराजचेही अभिनंदन
आमच्याकडे फार आवडले होते ते.. आणि रुपाली- विवान यांचेही.. दोन्हीत फार छान रंगसंगती आणि ब्राईट कलर्स होते
अभिनंदन परी..
अभिनंदन परी..
अभिनंदन परी शुभेच्छुक - विवान
अभिनंदन परी
शुभेच्छुक - विवान
परी अभिनंदन आणि कौतुक
परी अभिनंदन आणि कौतुक
अभिनंदन परी.
अभिनंदन परी.
खुप छान परी. मस्त काढले आहे
खुप छान परी. मस्त काढले आहे चित्र.
हार्दिक अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन.
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन परी
अभिनंदन परी
परीचे अभिनंदन.
परीचे अभिनंदन.
धन्यवाद सर्वांचे मनापासून
धन्यवाद सर्वांचे मनापासून आणि परीतर्फे
(No subject)
ईथेही धन्यवाद
ईथेही धन्यवाद
छान आहेत प्रशस्तीपत्रके .. आवडली
यावर ऋन्मेष परी अशी दोन्ही
यावर ऋन्मेष परी अशी दोन्ही नावे आहेत.
मोठे झाल्यावर माझी पोरे हे पाहतील तेव्हा त्यांना वाटेल की त्या दोघांनी मिळून हे जिंकलेय
अभिनंदन परी
अभिनंदन परी
Pages