बूकमार्क म्हणजे काय असते?
ज्या दिवशी हि स्पर्धा जाहीर झाली त्या दिवशीच मी हा प्रश्न फार निरागसपणे विचारला होता.
मला अॅक्चुअली बूकमार्क हा प्रकार माहीत नव्हता. किंवा कदाचित पाहिला होता, पण यालाच बूकमार्क ऐसे नाव हे माहीत नव्हते. एखाद्या ईटरनेटवरील साईटच्या लिंकला सेव्ह बूकमार्क करतात हे माहीत होते. पण ते बनवायची कशी काय स्पर्धा असू शकते याने आणखी गोंधळून गेलो होतो. मग कोणीतरी बूकमार्क काय असते हे मला समजावले. ते बघून मला ईतके साधे लक्षात आले नाही याचे स्वत:शीच हसायला आले. पण हा ऋन्मेष म्हणजे उगाच वेड पांघरूण पेडगावला जातो या ईमेजमुळे ईतर कोणी माझ्या या अज्ञानावर हसले नसावे.
असो, पाल्हाळ पुरे. माझ्याच लेकीचा धागा मी हायजॅक नाही करू शकत
तर योगायोगाने दोनच दिवसांनी माझ्या मुलीने, परीने मला हा खालील बूकमार्क दाखवला. मी पुन्हा गोंधळात.
आता हा असा कसा बूकमार्क?
तर तिने त्याचा वापरही कसा करायचा हे मला समजावले. तिने ते यूट्यूबवर पाहिले होते. स्मार्ट जनरेशन. मी कौतुकाने त्याचा फोटो काढला. जे नेहमीच करतो. स्पर्धेचा विचारही डोक्यात नव्हता.
प्रचि क्रमांक १
प्रचि क्रमांक २
सस्मित यांनी माझ्या लेखावर प्रतिसाद देताना लेकीला बूकमार्क स्पर्धेत भाग घ्यायला लाव असे सुचवले आणि पुन्हा हे स्ट्राईक झाले.
काल शनिवारचा सुट्टीचा मुहुर्त बघत लेकीला स्पर्धेची कल्पना न देता छान छान बूकमार्क बनवायला सांगितले. तर तिने आम्हा चौघांसाठी चार बूकमार्क बनवले. म्हणजे ती, मी, मम्मा आणि आज्जी आम्हा चौघांसाठी. कारण कुमार ऋन्मेष अजून शाळेत जात नसल्याने त्याला बूकमार्कची गरज नाही - ईति परी
प्रचि क्रमांक ३
माझे ईतक्याने समाधान झाले नाही. तिने आणखी काहीतरी चांगले बनवावे म्हणून म्हटले, हे काय लॉलीपॉप बनवलेत. काहीतरी हटके बनव.
तसे तिने हे "वारली बूकमार्क" बनवले.
गोल वगैरे व्यवस्थित मार्क करून कापता आले असते, पण तिला डायरेक्ट कात्रीच चालवायला आवडते
प्रचि क्रमांक ४
आणि आमची फॅमिली कम्प्लीट झाली
परी का सपना, सब के बूक मे बूकमार्क अपना..
प्रचि क्रमांक ५
पण पप्पांचे समाधान ईतक्यानेही होणार नव्हते
म्हणून मग मी तिला स्पर्धेबद्दल सांगितले आणि काहीतरी स्पेशल बनवायला सांगितले.
तर तिने खालील बूकमार्क बनवले. जे वापरानुसार पहिल्या बूकमार्कसारखेच होते.
प्रचि क्रमांक ६
मी म्हटले, यात काय स्पेशल आहे?
तसे तिने मला ते उलटे करायला लावले.
हे बूकमार्क "टू ईन वन" होते. याच्या मागे हेअरक्लिप जोडली असल्याने ते केसांतही माळता येणार होते
प्रचि क्रमांक ७
हेअर क्लिप अडचणीची तर होणार नाही ना हे चेक करायला मी त्याचा बूकमार्क म्हणून वापर करून पाहिला. आणि लक्षात आले की हेअरक्लिपमुळे ऊंचवटा तयार झाल्याने पान आणखी चटकन शोधता येतेय
प्रचि क्रमांक ८
प्रचि क्रमांक ९
आणि हे शेवटचे प्रकाशचित्र.
स्वतःचा फोटो आलाच पाहिजे, जी आमची परंपराच आहे
आर्ट अॅण्ड आर्टिस्ट
प्रचि क्रमांक १०
शेवटी चिमुकल्या जीवांसाठी प्रत्यक्ष स्पर्धेपेक्षा जास्त आनंददाय़क असतो तो त्यात भाग घेण्याचा प्रवास
- ईति ऋन्मेऽऽष
तळटीप - हे सर्व बूकमार्क बनवायला तिने माझी वा आमची शून्य मदत घेतली आहे. किंबहुना ती काही करताना आम्ही बघितलेलेही तिला आवडत नाही, कारण तिला आम्हाला सरप्राईज द्यायचे असते. आणि आम्हीही ती काय करतेय हे बघायला आणि तिला काही सांगायला जात नाही. कारण ती कोणाच्या बापाचेही ऐकत नाही
--------------------------------------
--------------------------------------
ही प्रवेशिका स्पर्धेतून मागे घेत आहे
आणि नवीन एंट्री देत आहे
बूकमार्क स्पर्धा - ऋन्मेऽऽष - अ गट - परी वय वर्षे ६ - (न्यू एंट्री - विडिओसह)
https://www.maayboli.com/node/76508
धन्यवाद
सुंदर!
सुंदर!
शेवटी चिमुकल्या जीवांसाठी
शेवटी चिमुकल्या जीवांसाठी प्रत्यक्ष स्पर्धेपेक्षा जास्त आनंददाय़क असतो तो त्यात भाग घेण्याचा प्रवास.... अगदी खरयं....
तुमची मुलगी खरंच खुप छान आहे.
ती कोणाच्या बापाचेही ऐकत नाही.... थोडक्यात आत्मनिर्भर
मस्त.. वारली बूकमार्क आवडला..
मस्त.. वारली बुकमार्क आवडला.. शेवटचा टू इन वन पण छान .. परीचा फोटो पण मस्त.. अगदी मिस वर्ल्ड पोज
खूप छान बुकमार्क आहेत. परी
खूप छान बुकमार्क आहेत. परी शाब्बास !!
वारली वाले बघुन तिचे fine motor skills चांगले आहेत असे दिसतयं. फोटो गोड, आत्मविश्वास दिसतोयं !
एक नंबर! फ्रॉकवाल्या ताईचा
एक नंबर! फ्रॉकवाल्या ताईचा बुकमार्क तर खूप cute आहे. शिवाय परीचा फोटो एकदम गोड!
अभि, खूपच गोड बनवलेत रे !
अभि, खूपच गोड बनवलेत रे !
सगळेच खूप छान बनवले आहेत परी
सगळेच खूप छान बनवले आहेत परी !! टू ईन वन वाला तर एकदम खास आहे.
खूपच छान.
खूपच छान.
खूप छान बुकमार्क आहेत. परी
खूप छान बुकमार्क आहेत. परी शाब्बास !!>>+१
हाहाहा! व्हेरी नाईस. गोड आहेत
हाहाहा! व्हेरी नाईस. गोड आहेत बुकमार्क व परी.
मस्तच बूकमार्क्स बनवलेस परी
मस्तच बूकमार्क्स बनवलेस परी आणि मस्त डोकं चालवलंस फॅमिली पूर्ण करण्याचं! शाब्बास!
ऋन्मे SS ष १ नंबर एन्ट्री!
ऋन्मे SS ष १ नंबर एन्ट्री! खुपच गोड आहे परी आणि तिची परिकथा.
तसे तिने हे "वारली बूकमार्क" बनवले.
गोल वगैरे व्यवस्थित मार्क करून कापता आले असते, पण तिला डायरेक्ट कात्रीच चालवायला आवडते Happy>>>>>>>> हे वाचून मला माझं कातरकाम आठवलं. मी असंच न चित्र काढता कापते खुप मजा येते. टाकले आहेत मी फोटो पूर्वी आता लिंक नाही देता येत.. परीला करूदे तिच्या मनासारखं कातरकाम. खुपच गोड छोकरी आहे तुझी.
https://www.maayboli.com/node/18338
आली देता लिंक, पण मलाही तुझ्या परीचा धागा हायजॅक नाही करायचाय, असंच आठवलं म्हणून टाकते. परीला ही दाखव
गोड आहेत सर्व बुकमार्क. शिवाय
गोड आहेत सर्व बुकमार्क. शिवाय तिने सुरुवात ते शेवट सर्व स्वतः केले आहे.
बुकमार्क आणि क्लिप एकांत ही कल्पना तर भारीच आहे.
(परिचा पण घरी हेअरकट/फ्रंट बँग केलेत का?छान दिसतेय)
क्युट क्युट बुकमार्क्स ।
क्युट क्युट बुकमार्क्स । बनानेवाली और भी क्युट।
मस्त! स्पर्धेची कल्पना न देता
मस्त! स्पर्धेची कल्पना न देता तिच्याकडून बरेचसे बुकमार्क करून घेतलेस हे आवडलं!
छान झालेत बुकमार्क्स. शाब्बास
छान झालेत बुकमार्क्स. शाब्बास परी
परीचे बुकमार्क परीसारखेच गोड
परीचे बुकमार्क परीसारखेच गोड आहेत..परी एकदम वन्डरगर्ल दिसतेय.. पोझ पण मस्त दिलीय..
छान झालेत बुकमार्क्स.
छान झालेत बुकमार्क्स.
परीला भली मोठी शाब्बासकी
छान झालेत बुकमार्क्स . शाबास
छान झालेत बुकमार्क्स . शाबास परी
मस्त केलेत. शाब्बास परी!
मस्त केलेत. शाब्बास परी!
छानच झालेत बुकमार्क्स
छानच झालेत बुकमार्क्स
परीला शाब्बासकी
वयाच्या मानाने खूपच कल्पक
वयाच्या मानाने खूपच कल्पक बुकमार्क हस्तकला. परीचे अभिनंदन.
खूपच छान
खूपच छान
छान , सुंदर
छान , सुंदर
असो, पाल्हाळ पुरे. माझ्याच
असो, पाल्हाळ पुरे. माझ्याच लेकीचा धागा मी हायजॅक नाही करू शकत>>>> याबद्द्ल धन्यवाद!
शिवाय तिने सुरुवात ते शेवट सर्व स्वतः केले आहे.>>>>> हेच खूप महत्वाचे आहे.
सगळे बुकमार्क छान छान
सगळे बुकमार्क छान छान
Cute आहेत बुकमार्क्स व तुमची
Cute आहेत बुकमार्क्स व तुमची परी
शाब्बास परी
शाब्बास परी
छान केलेत सगळे
शेवटचा फोटो तर अफलातून
ऋन्मेऽऽष आवडले बुकमार्क्स..
ऋन्मेऽऽष आवडले बुकमार्क्स.. मुलगी खूप उत्साही आहे..
खूपच छान परी आणि तिने
खूपच छान परी आणि तिने परोपरीने बनवलेले बुक मार्कस
Pages