हा या विभागातील माझा दुसरा धागा. हा देखील लेकीच्याच कौतुकात काढला आहे
पहिला धागा लेकीने घरी रंगवलेल्या पणत्यांचा होता - https://www.maayboli.com/node/77232
तशी चित्रकला हस्तकलेची तिला उपजतच आवड असली तरी मधल्या काळात तिने फार काही ती जोपासली नव्हती वा यात काही विशेष प्रगती नव्हती. कोणाचा बड्डे आला तर एखादे ग्रीटींग तेवढे बनवायची.
पण नुकतेच गेल्या काही दिवसात अचानक पुन्हा काहीतरी गिरगटवायला सुरुवात केली. जे आधीपेक्षा नेक्स्ट लेव्हलला गेलेय हे जाणवले.
तेच शेअर करायला हा धागा.
जर हि आवड पुढेही कायम राहीली तर यात आणखी काय करता येईल यावर तज्ञ आणि जाणकारांनी मार्गदर्शन केल्यास आवडेल
-------------------------------------------------
हे एक सायन्स पोस्टर - हे तिच्या शाळेतही बोर्डावर लावले आहे - हे मला त्या दिवशी पॅरेंट टीचर मिटींगला गेलो तेव्हा समजले
हा असाच फावल्या वेळेतला चाळा. अशी चित्रे कोणीही काढली की मला त्यांच्या चिकाटीचे कौतुकच वाटते
हे आपले असेच, मध्यंतरी काही नाही सापडले तर एक बंद मोबाईल रंगवून काढला. आता तो घेऊन खोटे खोटे बोलायची स्टाईल मारत रस्त्याने फिरतेही
आणि हे नुकतेच काढलेले स्केचेस, ज्यामुळे कौतुकाने हा धागा काढावासा वाटला. जवळपास दहाबारा स्केचेस एकाच बैठकीत आणि पटापट काढलेली आहेत. काही कलर केलेलेही आहेत. काही स्केचेसचे मूळ चित्रासोबत कोलाज केले आहे. कारण मला चित्रकलेतील काही कळत नसले तरी मूळ चित्राचीच साईज आणि प्रपोर्शन हे माझ्या ईंजिनीअर मनाला फार भावले
स्केचेस १
स्केचेस २
स्केचेस ३
स्केचेस ४
स्केचेस ५
स्केचेस ६
स्केचेस ७
स्केचेस ८
स्केचेस ९
स्केचेस १०
स्केचेस ११
स्केचेस १२
स्केचेस १३
कोलाज १
कोलाज २
कोलाज ३
कोलाज ४
कोलाज ५
कोलाज ६
- धन्यवाद,
ऋन्मेष
परीची चित्रकला आवडली, मासळी
परीची चित्रकला आवडली, मासळी डूडल आर्ट आहे का,फोन कवर खूप आवडलं.
भारी आहे सगळ.
भारी आहे सगळ.
मायबोलीकर नीलम चित्रकलेचे लहान मुलांचे क्लासेस घेतात. परीसाठी हायली रिकमंडेड..
खूपच छान. कला आहे तिच्या
खूपच छान. कला आहे तिच्या हातांत तिला जोपासा.
फारच हुशार आहे परी.लहात वयातच
फारच हुशार आहे परी.लहात वयातच खूप चांगली समज आहे.परफेक्ट आउटलाईन काढणं कठीण असतं. तिला असे स्वतःचेच प्रयोग जास्त करूदे सद्ध्या. पुढे जाऊन जे.जे सारख्या ठिकाणी शिकेल ती. परीला शाब्बासकी आणि शुभेच्छा.
खूप छान! प्रोत्साहन द्या.
खूप छान! प्रोत्साहन द्या. माझ्या लेकीची चित्रकला पण महान आहे, आर्ट क्लास ला घातले आहे. अजून बहरली आहे कला.
खूप छान!
खूप छान!
मस्त!! एवढ्या लहान वयात एवढं
मस्त!! एवढ्या लहान वयात एवढं जमतं हे कौतुकास्पद आहे.
नेक्स्ट सिंपल स्टेप- पापण्यांकडे अधिक लक्ष द्यायला हवे आहे.
खूप छान!..मस्त
खूप छान!..मस्त
फारच मस्त आहेत. तिच्यात उपजतच
फारच मस्त आहेत. तिच्यात उपजतच ही कला आहे. भरपूर चित्रं काढायला प्रोत्साहन दे.
फारच मस्त आहेत. तिच्यात उपजतच
मायबोलीकर नीलम नागवेकर (नीलू) लहान मुलांसाठी चित्रकलेचे ऑनलाईन क्लासेस घेते. खूप माबो-लेकरं तिचे विद्यार्थी आहेत. परीकरताही नक्की विचार कर.
अप्रतिम स्केचेस काढलीत.
अप्रतिम स्केचेस काढलीत.
मस्तच काढली आहेत चित्रं!
मस्तच काढली आहेत चित्रं! चेहऱ्यावरचे भाव किती छान टिपले आहेत.
परीला मोठ्ठी शाबासकी!
या विषयात मी अगदीच 'ढ' असल्यामुळे मला फार कौतुक वाटतं अशी छान चित्रं काढणाऱ्या मुलांचं!
अरे कसली भारी आहे ही! इतकी
अरे कसली भारी आहे ही! इतकी सुंदर चित्रं म्हणजे कमालच आहे. परीला हर्पा काकाकडून शाबासकी आणि तोंडभरून कौतुक.
मस्तच काढली आहेत चित्रं.
मस्तच काढली आहेत चित्रं. शाब्बास परी !!!
मायबोलीकर नीलम चित्रकलेचे लहान मुलांचे क्लासेस घेतात. परीसाठी हायली रिकमंडेड.. > चित्र बघितल्याबरोबर माझ्याही मनात तेच आले.
मायबोलीकर नीलम चित्रकलेचे
मायबोलीकर नीलम चित्रकलेचे लहान मुलांचे क्लासेस घेतात,>>>>>
त्यांच्या id ची लिंक देता का इथे?
फारच सुंदर!
फारच सुंदर!
सुरेख आहेत स्केचेस!
सुरेख आहेत स्केचेस!
ही नीलमच्या इन्स्टा
मनिम्याऊ, ही नीलमच्या इन्स्टा प्रोफाईलची लिंक
https://instagram.com/art_tuts_by_lumiere?igshid=YmMyMTA2M2Y=
भारीच की! शाब्बास परी!
भारीच की! शाब्बास परी!
भारीच की! शाब्बास परी!
भारीच की! शाब्बास परी!
Thanks जाई.
Thanks जाई.
किती गोड निरागस चित्रे.
किती गोड निरागस चित्रे.
मुलगी चतुरस्र आहे. कलाही आहे
मुलगी चतुरस्र आहे. कलाही आहे आणि व्यवहारही आहे ( असे दिसतेय) तिच्याकडे. हे दुर्मीळ. खूप मोठी होईल.
फार सुरेख चित्र, शाब्बास परी
फार सुरेख चित्र, शाब्बास परी सगळ्याच प्राण्यांच्या चेहऱ्यात गोडवा आहे.
क्लास वगैरे तुम्ही लावालंच पण सरावात राहू द्या. सराव नसला की बिघडते. स्वानुभव.
खूपच छान परी! मोठी शाबासकी ❤️
खूपच छान परी! मोठी शाबासकी ❤️
खूप छान. परीला शाबासकी. परी
खूप छान. परीला शाबासकी. परी आता आईला केकवर आयसिंग करायला नक्कीच मदत करणार.
शाब्बास परी .
शाब्बास परी .
पोरीच्या हातात जादू आहे ऋ, तिला प्रोत्साहन, शिक्षण, ट्रेनिंग अस सगळं देऊन खूप मोठी कर. तिला वाचून दाखव सगळे कौतुकाचे प्रतिसाद , आणखी हुरूप येईल तिला.
फारच सुंदर काढली आहेत सगळी
फारच सुंदर काढली आहेत सगळी चित्रं. अगदी सहज काढल्यागत रेघा आहेत. तिला शुभेच्छा!
अगदी सुरेख आणि सफाईदार!
अगदी सुरेख आणि सफाईदार!
खूपच छान!
खूपच छान!
त्या Science च्या चित्रात तिने Science या शब्दातील 'C' या अक्षरासाठी C ही संज्ञा असलेल्या कार्बन या मूलद्रव्याचे आवर्त सारणी (Periodic Table) मधील स्थान (त्याला नेमके काय म्हणतात ते मी आता विसरलो!) अचूक सर्व योग्य तपशीलासाहित रंगवले आहे, याचे मला विशेष कौतुक वाटले. शिवाय विज्ञानातील अतिशय महत्वाचे असलेले E = mc2 हे सूत्र देखील लिहिले आहे!!!
आपण तिच्या वयाचे असतांना आवर्त सारणी सोडा, मूलद्रव्य म्हणजे काय तेही आपल्याला माहीत नव्हते!!!
Pages