लेकीची चित्रकला - तिने काढलेले स्केचेस

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 August, 2022 - 13:23

हा या विभागातील माझा दुसरा धागा. हा देखील लेकीच्याच कौतुकात काढला आहे Happy
पहिला धागा लेकीने घरी रंगवलेल्या पणत्यांचा होता - https://www.maayboli.com/node/77232

तशी चित्रकला हस्तकलेची तिला उपजतच आवड असली तरी मधल्या काळात तिने फार काही ती जोपासली नव्हती वा यात काही विशेष प्रगती नव्हती. कोणाचा बड्डे आला तर एखादे ग्रीटींग तेवढे बनवायची.

पण नुकतेच गेल्या काही दिवसात अचानक पुन्हा काहीतरी गिरगटवायला सुरुवात केली. जे आधीपेक्षा नेक्स्ट लेव्हलला गेलेय हे जाणवले.
तेच शेअर करायला हा धागा.

जर हि आवड पुढेही कायम राहीली तर यात आणखी काय करता येईल यावर तज्ञ आणि जाणकारांनी मार्गदर्शन केल्यास आवडेल Happy

-------------------------------------------------

हे एक सायन्स पोस्टर - हे तिच्या शाळेतही बोर्डावर लावले आहे - हे मला त्या दिवशी पॅरेंट टीचर मिटींगला गेलो तेव्हा समजले Happy

science poster.jpg

हा असाच फावल्या वेळेतला चाळा. अशी चित्रे कोणीही काढली की मला त्यांच्या चिकाटीचे कौतुकच वाटते Happy

fine art.jpg

हे आपले असेच, मध्यंतरी काही नाही सापडले तर एक बंद मोबाईल रंगवून काढला. आता तो घेऊन खोटे खोटे बोलायची स्टाईल मारत रस्त्याने फिरतेही Happy

mobile painting.jpg

आणि हे नुकतेच काढलेले स्केचेस, ज्यामुळे कौतुकाने हा धागा काढावासा वाटला. जवळपास दहाबारा स्केचेस एकाच बैठकीत आणि पटापट काढलेली आहेत. काही कलर केलेलेही आहेत. काही स्केचेसचे मूळ चित्रासोबत कोलाज केले आहे. कारण मला चित्रकलेतील काही कळत नसले तरी मूळ चित्राचीच साईज आणि प्रपोर्शन हे माझ्या ईंजिनीअर मनाला फार भावले Happy

स्केचेस १

sketches 1.jpg

स्केचेस २

sketches 2.jpg

स्केचेस ३

sketches 3.jpg

स्केचेस ४

sketches 4.jpg

स्केचेस ५

sketches 5.jpg

स्केचेस ६

sketches 6.jpg

स्केचेस ७

sketches 7.jpg

स्केचेस ८

sketches 8.jpg

स्केचेस ९

sketches 9.jpg

स्केचेस १०

sketches 10.jpg

स्केचेस ११

colour sketch 1.jpg

स्केचेस १२

colour sketch 2.jpg

स्केचेस १३

colour sketch 3.jpg

कोलाज १

collage 1.jpg

कोलाज २

collage 2.jpg

कोलाज ३

collage 3.jpg

कोलाज ४

collage 4.jpg

कोलाज ५

collage 5.jpg

कोलाज ६

collage 6.jpg

- धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी आहे सगळ.

मायबोलीकर नीलम चित्रकलेचे लहान मुलांचे क्लासेस घेतात. परीसाठी हायली रिकमंडेड..

फारच हुशार आहे परी.लहात वयातच खूप चांगली समज आहे.परफेक्ट आउटलाईन काढणं कठीण असतं. तिला असे स्वतःचेच प्रयोग जास्त करूदे सद्ध्या. पुढे जाऊन जे.जे सारख्या ठिकाणी शिकेल ती. परीला शाब्बासकी आणि शुभेच्छा.

खूप छान! प्रोत्साहन द्या. माझ्या लेकीची चित्रकला पण महान आहे, आर्ट क्लास ला घातले आहे. अजून बहरली आहे कला.

Happy मस्त!! एवढ्या लहान वयात एवढं जमतं हे कौतुकास्पद आहे.
नेक्स्ट सिंपल स्टेप- पापण्यांकडे अधिक लक्ष द्यायला हवे आहे.

मायबोलीकर नीलम नागवेकर (नीलू) लहान मुलांसाठी चित्रकलेचे ऑनलाईन क्लासेस घेते. खूप माबो-लेकरं तिचे विद्यार्थी आहेत. परीकरताही नक्की विचार कर.

मस्तच काढली आहेत चित्रं! चेहऱ्यावरचे भाव किती छान टिपले आहेत.
परीला मोठ्ठी शाबासकी!

या विषयात मी अगदीच 'ढ' असल्यामुळे मला फार कौतुक वाटतं अशी छान चित्रं काढणाऱ्या मुलांचं!

अरे कसली भारी आहे ही! इतकी सुंदर चित्रं म्हणजे कमालच आहे. परीला हर्पा काकाकडून शाबासकी आणि तोंडभरून कौतुक.

मस्तच काढली आहेत चित्रं. शाब्बास परी !!!
मायबोलीकर नीलम चित्रकलेचे लहान मुलांचे क्लासेस घेतात. परीसाठी हायली रिकमंडेड.. > चित्र बघितल्याबरोबर माझ्याही मनात तेच आले. Happy

फार सुरेख चित्र, शाब्बास परी Happy सगळ्याच प्राण्यांच्या चेहऱ्यात गोडवा आहे.
क्लास वगैरे तुम्ही लावालंच पण सरावात राहू द्या. सराव नसला की बिघडते. स्वानुभव.

शाब्बास परी .
पोरीच्या हातात जादू आहे ऋ, तिला प्रोत्साहन, शिक्षण, ट्रेनिंग अस सगळं देऊन खूप मोठी कर. तिला वाचून दाखव सगळे कौतुकाचे प्रतिसाद , आणखी हुरूप येईल तिला.

खूपच छान!
त्या Science च्या चित्रात तिने Science या शब्दातील 'C' या अक्षरासाठी C ही संज्ञा असलेल्या कार्बन या मूलद्रव्याचे आवर्त सारणी (Periodic Table) मधील स्थान (त्याला नेमके काय म्हणतात ते मी आता विसरलो!) अचूक सर्व योग्य तपशीलासाहित रंगवले आहे, याचे मला विशेष कौतुक वाटले. शिवाय विज्ञानातील अतिशय महत्वाचे असलेले E = mc2 हे सूत्र देखील लिहिले आहे!!!
आपण तिच्या वयाचे असतांना आवर्त सारणी सोडा, मूलद्रव्य म्हणजे काय तेही आपल्याला माहीत नव्हते!!!
Periodic Table.jpg

Pages