हा या विभागातील माझा दुसरा धागा. हा देखील लेकीच्याच कौतुकात काढला आहे
पहिला धागा लेकीने घरी रंगवलेल्या पणत्यांचा होता - https://www.maayboli.com/node/77232
तशी चित्रकला हस्तकलेची तिला उपजतच आवड असली तरी मधल्या काळात तिने फार काही ती जोपासली नव्हती वा यात काही विशेष प्रगती नव्हती. कोणाचा बड्डे आला तर एखादे ग्रीटींग तेवढे बनवायची.
पण नुकतेच गेल्या काही दिवसात अचानक पुन्हा काहीतरी गिरगटवायला सुरुवात केली. जे आधीपेक्षा नेक्स्ट लेव्हलला गेलेय हे जाणवले.
तेच शेअर करायला हा धागा.
जर हि आवड पुढेही कायम राहीली तर यात आणखी काय करता येईल यावर तज्ञ आणि जाणकारांनी मार्गदर्शन केल्यास आवडेल
-------------------------------------------------
हे एक सायन्स पोस्टर - हे तिच्या शाळेतही बोर्डावर लावले आहे - हे मला त्या दिवशी पॅरेंट टीचर मिटींगला गेलो तेव्हा समजले
हा असाच फावल्या वेळेतला चाळा. अशी चित्रे कोणीही काढली की मला त्यांच्या चिकाटीचे कौतुकच वाटते
हे आपले असेच, मध्यंतरी काही नाही सापडले तर एक बंद मोबाईल रंगवून काढला. आता तो घेऊन खोटे खोटे बोलायची स्टाईल मारत रस्त्याने फिरतेही
आणि हे नुकतेच काढलेले स्केचेस, ज्यामुळे कौतुकाने हा धागा काढावासा वाटला. जवळपास दहाबारा स्केचेस एकाच बैठकीत आणि पटापट काढलेली आहेत. काही कलर केलेलेही आहेत. काही स्केचेसचे मूळ चित्रासोबत कोलाज केले आहे. कारण मला चित्रकलेतील काही कळत नसले तरी मूळ चित्राचीच साईज आणि प्रपोर्शन हे माझ्या ईंजिनीअर मनाला फार भावले
स्केचेस १
स्केचेस २
स्केचेस ३
स्केचेस ४
स्केचेस ५
स्केचेस ६
स्केचेस ७
स्केचेस ८
स्केचेस ९
स्केचेस १०
स्केचेस ११
स्केचेस १२
स्केचेस १३
कोलाज १
कोलाज २
कोलाज ३
कोलाज ४
कोलाज ५
कोलाज ६
- धन्यवाद,
ऋन्मेष
धन्यवाद माबॉ वाचक
धन्यवाद माबॉ वाचक
आमच्याकडे त्या भांड्याला छोटे पातेले म्हणतात. टोप हे पहिल्यांदाच ऐकले. Happy
>>>>>
आमच्याकडे पातेले आणि टोप दोन्ही शब्द वापरतात. आणि पातेले शक्यतो याहून मोठ्या साईजसाठी वापरतात. लहानपणी जेव्हा गिझर नव्हता आणि आंघोळीचे पाणी गॅस वर गरम करायचो तेव्हा पातेले हा शब्द रोज किमान चारदा वापरला जायचा
सध्या हे फॉर्मला आहे
सध्या हे फॉर्मला आहे
आणि हि एक तिची आवडच आहे.
आणि हि एक तिची आवडच आहे.
मस्त आहे चित्रकला तिची. पुढे
मस्त आहे चित्रकला तिची. पुढे आवड राहिली तर ह्यात खूप पर्याय आहेत शिकायला.
धन्यवाद अनुश्री
धन्यवाद अनुश्री
पर्याय म्हणजे? आय मीन कुठले?
गुगलने, गुगल-डुडल करता
ऋन्मेष, गुगलने, गुगल-डुडल करता प्रवेश्पत्रिका मागितल्या आहेत -
https://doodles.google.com/d4g/?utm_source=HPP&utm_medium=Owned&utm_camp...
Pages