इन्स्टा गर्ल परी - रील्स आणि शॉर्ट विडिओ :-)

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 July, 2023 - 14:42

इन्स्टा गर्ल परी - रील्स आणि शॉर्ट विडिओ Happy

हा लेकीच्या इन्स्टा रील्सना जोडून केलेला युट्यूब व्हिडिओ.
https://www.youtube.com/watch?v=5eAfuoDOpG0

विडिओ आवडला तर तिला ईन्स्टाला फॉलो जरूर करा.
हे लेकीचे इंस्टाग्राम अकाउंट
https://www.instagram.com/paruli_naik/?igshid=MzRlODBiNWFlZA%3D%3D

(याऊपर तिच्या काही इन्स्टा रील्सना युट्युब शॉर्ट व्हिडिओ स्वरूपात अपलोड करायचाही विचार आहे. अजूनही कोणाचे काही सजेशन असल्यास आवडेल. कारण मी या बाबतीत अगदीच कच्चा आहे.)

तर हो, आमची पोरगी वय वर्षे नऊ, इंस्टा रील्स बनवते. ते तिच्यासाठी या वयात चांगले की वाईट यावर सारासार विचार करून अखेर आम्ही तिला परवानगी दिली. स्वतःचे इन्स्टा अकाउंट उघडून दिले. पुढे मागे तिची ईच्छा असल्यास युट्यूब चॅनेलचाही विचार करता येईल.

जेव्हा तिला सुरुवातीला रिल्स आणि शॉर्ट्स बघायची सवय लागली. तेव्हा तिला त्याचे ॲडिक्शन होण्यापासून होण्यापासून आम्ही रोखले. कारण त्यात ती काय बघेल आणि त्यातले काय उचलेल यावर आपला काही कंट्रोल नसतो. डोळ्यांची वाट लागते ते वेगळेच. पण एकदा अशी मोबाईलची सवय लागली की मुले मैदानी खेळ सोडून घरकोंबड्यासारखे मोबाईललाच एका जागी चिकटून बसतात असे पाहण्यात आहे.

पण जेव्हा स्वतः रिल्स बनवायला लागली तेव्हा परवानगी सोबत प्रोत्साहन सुद्धा दिले. कारण इथे तिची क्रिएटिव्हिटी वापरली जाते. बघण्यापेक्षा बनवताना डोळ्यांना त्रास कमी होतो. तसेच एका जागी बसून राहणे होत नाही. सतत काहीतरी वेगळे करायची धडपड राहते. महत्त्वाचे म्हणजे स्वनिर्मितीचा आनंद मिळतो.

आता आम्ही घरी बेडरूम मध्ये रिल्स बनवतो, किचनमध्ये बनवतो, हॉलमध्ये बनवतो, बाल्कनीमध्ये बनवतो..

सोसायटीच्या गार्डनमध्ये बनवतो, पार्किंगमध्ये बनवतो, लिफ्ट मध्ये बनवतो, स्टेअरकेसवर बनवतो..
स्विमिंगपूल मध्ये उड्या मारत बनवतो, गार्डनमधील स्लाईडवर उलटे लटकून बनवतो..

गिरगाव चौपाटीवर बनवतो, मरीन ड्राइव्हवर बनवतो, हँगिंग गार्डनला बनवतो, गेट वे ऑफ इंडियाला बनवतो..
आमच्या हक्काच्या माझगावच्या डोंगरावर बनवतो... जिथे जाऊ तिथे बनवतो.

जाता जाता टॅक्सीत बनवतो, ट्रेनमध्ये बनवतो, अगदी चालताचालता ही बनवतो..

वेगवेगळे कपडे बदलतो, वेगवेगळे पार्टनर बदलतो, वेगवेगळे प्रयोग करतो...
कधी नाचतो, कधी गातो..
कधी अभिनय करतो, तर कधी स्टंट करतो..

इथे क्रिएटिविटी दाखवायला मर्यादा नाही हे नक्की.. आणि आता तर फक्त सुरुवात झाली आहे. तिलाच प्रोत्साहन मिळायला म्हणून हा धागा Happy

जर रिल्स आवडल्या तर केवळ लाईक करून थांबू नका, ईन्स्टाग्रामवर फॉलो जरूर करा Happy
पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे कौतुक करायला विसरू नका Happy

----------------

याउपर धाग्यावर अजून एक मदत चर्चा स्वरूपात झाली तर आवडेल.

अश्या सोशल साईटवर मुलीला अकाउंट तर उघडून दिले आहे. पण सोबत तिच्या सुरक्षिततेची काळजी ही सुद्धा माझी जबाबदारी आहे. मी स्वत: याआधी कधी Instagram काय असते हे बघायला गेलो नव्हतो. त्यामुळे त्यादृष्टीने काय सावधगिरी बाळगायला हवी किंवा तिला काय सूचना देणे गरजेचे आहे, प्रोफाईल सेटिंग कशी ठेवावी अश्या बेसिक गोष्टींपासून जाणून घ्यायच्या प्रयत्नात आहे. कोणाकडे योग्य माहिती असल्यास प्लीज शेअर करा.

फक्त एक विनंती, वादविवाद टाळा. धाग्यावर शंभर प्रतिसाद होण्यापेक्षा तिचे ईन्स्टावर पाचशे फॉलोअर झालेले आवडेल Happy

दोन्ही लिंक्स पुन्हा देतो,

युट्यूब विडिओ - https://www.youtube.com/watch?v=5eAfuoDOpG0
ईन्स्टा अकाऊंट - https://www.instagram.com/paruli_naik/?igshid=MzRlODBiNWFlZA%3D%3D

धन्यवाद,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बघेनच.
अजून एक मदत चर्चा स्वरूपात झाली तर आवडेल. तर अशा कमी वयातील मुलामुलींचे विडिओ ब्लॉग आहेत का ते शोधून विचार करायला हवा.
'मोटो व्हिडिओ लॉग' म्हणजे मोटोबाईकवर प्रवास आणि त्याचे विडिओ या प्रकारात पर्यटन म्हणून
यूट्यूबवर विडिओ पाहत असताना एका मुलीचा दिसला. बिनधास्त काव्या. तिचे स्कूटीवर ब्लॉग बनवले होते तेव्हा तेरा वयाची होती. मग प्रतिक्रिया आल्यावर ते मोटोलॉग बहुतेक काढले. पण इतर जोरात आहेत.
दुसरा एक गाजलेला चानेल LOL. भारती सिंग आणि नवरा लिंबाचिया हे आता त्यांच्या लहान मुलाचे गोलूचे विडिओ टाकून एका दिवसात लाखभर व्ह्यू सुद्धा मिळतात.
तर हे आणि इतर काही यूट्यूब विडिओ पाहून एकंदर कल्पना येईल काय करावे किंवा करू नये. पुढची पिढी वेगवान डिजिटल वातावरणात वाढणारी आहे. किती स्पीडब्रेकर लावणार?
महिन्यात एक/दोन किंवा वर्षभरात किती विडिओ करायचे ही पालकांनी मर्यादा ठेवणेही गरजेचं आहे.

धन्यवाद सामो, सबस्क्राइब्ड बद्दल आभार.
ईन्स्टावर असलेल्यांनी तिथे फॉलो केले तर तिच्यापर्यंतही पोहोचेल Happy

शरदजी, धन्यवाद. आज जरा रविवारचेही ऑफिस आहे. थोडे कामातून वेळ मिळताच यावर लिहीतो.

मी विडिओ बघितले. पण त्यावर मत देता येणार नाही कारण वयातला फरक. मुलीच्या समवयस्कांना कसे वाटते हे ठरेल.
विडिओ सादर करणाऱ्यांचे वय त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होणे महत्वाचे आहे. आवड, निवड, विचारही.
पालक म्हणून विचार करावासा वाटला हे आवडले.

परीचे व्हिडीओ छान आहेत. अजून तरी इनोसंट आहेत.

Insta वर मी दोन लहान मुलींचे व्हिडीओ नेहमी बघते. Iamcutekeya आणि दुसरी शिवांजली पोरजे.
केयाचे expression faar गोड असतात. मला ती आवडते पण सध्या ती सासू सून कंटेंट करते आहे त्यामुळे हिला नेमकं काय कळतंय असं वाटत रहातं.
परवा तिला एका चष्माच्या दुकानात पाहिलं. मुलगी अजूनही गोड आणि इनोसंट आहे पण आई वडिलांच्या डोक्यात जरा हवा गेल्यासारखी वाटली.

शिवांजली फार सुंदर expression देते पण जे करते आहे ते तिच्या व्हायला अजिबात शोभत नाही. शिवाय इतके रिल्स असतात तिचे की दिवस भर हेच विचार असतील का डोक्यात का अभ्यास वगैरे पण करत असेल असं वाटतं.
एकदम इनोसन्स हरवून गेल्या सारखं वाटतंय तिला बघून. पण टॅलेंटेड आहे नक्की.

शरदजी, रीया, धन्यवाद

@ शरदजी, हो. वयात्ल्या फरकाने आवडी भिन्न असणे स्वाभाविक आहे. सुरुवातीला मला हे ईन्स्टा रील बघायलाही बोअर व्हायचे. मग अचानक अ‍ॅडीक्शन लागल्यासारखे बघू लागलेलो. मग अ‍ॅडीक्शन कालांतराने कमी झाले. अश्या फेज येत जात राहतात..

@ रीया, खरे आहे. स्लीपरी स्लोप आहे तसा हा.

इनोसन्स बद्दल वैयक्तिक मत सांगायचे झाल्यास विडिओत इनोसन्स दिसायलाच हवा असा माझा हट्ट नाही. त्यापेक्षा जे जसे आहे ते प्रामाणिक दिसणे गरजेचे. म्हणून मी अजूनपर्यंत तिला कुठलीही अमुकतमुक रील्स कर म्हणून सजेस्ट केले नाहीये. तीच रील्स शोधते आणि तिला जे कळते तेच तिच्याच मनाने करते. त्यामुळे साहजिकच विडिओ तिच्या वयाच्या समजेनुसार बनतात.
पोस्ट करायच्या आधी मात्र आमची परमिशन गरजेची आहे. ईतके पाळतो.

बाकी अभ्यासाचे आम्हाला तरी टेंशन नाही.
कारण तो ती आधीही फार करायची नाहीच Happy

मुलीचे वय नऊ वर्ष हे फार लहान आहे सोशल मिडीआ साठी. तुमची मुलगी क्रिएटिव आहे तरी ती शेवटी एक लहान मुलगी आहे त्यामुळे तिच्या क्रिएटिविटीला वाव देण्यासाठी दुसरे काही माध्यम शोधलेत तर उत्तम. स्वतःसाठी काय योग्य हे निवडायचे तिचे वयही नाहीये त्यामुळे तिच्यासाठी योग्य माध्यम शोधणे ही जबाबदारी तुमची.
इंस्टासाठी वय १३ पूर्ण हवे असे आहे मात्र माझ्यामते १५ पर्यंत थांबावे. इंस्टा आणि तत्सम सोशल मेडीआ यांचे जे अल्गोरिदम्स आहेत त्याचे स्वरुपच असे आहे की युझर अधिकाधिक गुंतत जावा. सोशल मेडीआ कायम आपल्यासोबत असणारच आहे मात्र तुमच्या मुलीचे हे निरागस वय परत येणार नाहीये. तुमची मुलगी अजून टिनएजरही नाहीये. तिचा मेंदू अजून डेवलप होतोय, तो मोठ्या माणसासारखा चालत नाही, मुलगी टिनेजर होईल तो काळ तर मेंदूच्या योग्य वाढीसाठी अजूनच महत्वाचा असेल. 'सोशल मेडीआची क्लिनीकल डिपेडन्सी' चा धोका या वयोगटासाठी फार मोठा आहे. जोडीला सोशल मेडीआच्या वापरातून होणारे डेटा कलेक्शन, प्रायवसी जाणे, विशिष्ठ हेतूने तयार केलेला कंटेंट सातत्याने मुलांसमोर येत रहाणे वगैरे धोके आहेतच.
सोशल मेडीआ हे फ्री टुल आहे, वापरायला सोपे आहे मात्र त्यामागे टेक कंपन्या आहेत, ज्या फायद्यासाठी चालवल्या जातात. थोडक्यात तुम्हाला जे फ्री टुल वाटते त्याची किंमत तुमच्याकडून शेवटी वेगळ्या स्वरुपात वसूल केली जाते. त्यामुळे या फ्री टुलचा वापर टाळून तुमच्या मुलीच्या क्रिएटिवीटीला वाव कसा देता येईल याचा विचार करा. थोडे कष्ट पडतील, कदाचित झटपट प्रसिद्धी, वाहवा नसेल पण तिच्या वयाला साजेसे, तिच्यातल्या कलागुणांचा आलेख सातत्याने चढता होत जाईल असे काहीतरी निवडा.

स्वाती२ यांच्या संपूर्ण प्रतिसादाशी सहमत. मुलगी 9 वर्षांची म्हणजे इंस्टाग्राम च्या वयोमर्यादेतही बसत नाही. तिच्या creativity साठी ईतर कुठले माध्यम निवडावे असा अभिषेक तुम्हाला कळकळीचा सल्ला. पुढे जावून अनेक चांगले वाईट परिणाम होऊ शकतात व एका विशिष्ट वयानंतर parental control देखील फारसा राहू शकत नाही.
मुलीला उज्जल भविष्यासाठी अनेक शुभेच्छा.

खूप शुभेच्छा....
खूप टॅलेंट आहे तुमच्या कन्येकडे...

माफ करा, 9 हे खूप लहान वय आहे सोशल मीडिया च्या चिखलाला एक्सपोझ करायला.निव्वळ पैसे चोरी/मुलींना धोका असणारे समाज कंटक या फार टोकाच्या गोष्टी झाल्या.पण 9 वर्षाच्या मुलावर सोशल मीडिया मधल्या प्रसिद्धी सॅव्ही पणाचा, बाह्य रूपावर कमेंट्स करण्याच्या प्रवृत्तीचा मनावर थोडा वेगळा प्रभाव, परिणाम असू शकतो.मुख्य म्हणजे वजन/रंग/फिगर अश्या कश्यावरूनही होऊ शकणाऱ्या शेमिंग ची शक्यता.

रिल्स गोड आहेतच. पण एकंदर काळजी घ्या.तुम्ही घेत असालच. परी ला शुभेच्छा.
(हे आपलं उगीच वात्रटपणा पूर्ण रिल्स पाहिल्यावर: वाघाकडून त्याच्या न्यूड व्हिडीओ चा कंसेंट घेतलाय का? Happy )

परीचे रील्स आवडले. 9 हे फार लहान वय आहे पण यापेक्षा लहान मुलांना रील्स करताना बघितलय.
आईवडिलांच्या रील्स मध्ये मुलं असणं वेगळं पण आईवडील आपल्या रील्समध्ये मुलांकडून काम करून घेतात ते पटत नाही.
माझ्या एका कलिगची मुलगी परीएवढीच असेल , गेली 2वर्षे स्वतः च इन्स्टा चँनल आहे. एक्टिंग भारी करते चिमुरडी पण मेकप करून , स्वतः च्या वयाच्या मानाने मोठ्या विषयावर ,भारी expressions देत रील्स करते ते खटकतं.
हल्ली काही 9-10 वर्षाची मुलं , प्रेमप्रकरण , ब्रेकप , प्रपोज इ विषयावर रील्स बनवतात हे बघून अचंबित व्हायला होतं.
मला स्वतःला राज ग्रोवरचे रील्स आवडतात. आता तो टीनेजर आहे पण त्याचे विषय शाळकरी मुलांच्या जगातले असायचे.
बाकी परी हुशार आहे , अंगात नाना कला आहेत , सोबतीला भाऊ आहे. Voiceoverवाले फिल्मी videos बनवण्यापेक्षा , काही creative , informative , fun videos बनवता येतील का ते बघ.
All the best.

परी गोड आहे आणि व्हिडिओही छान आहेत. पण स्वाती२ यांच्या प्रतिसादाशी सहमत.
योगायोगाने आजच 'हिंदू'मध्ये लहान मुलं आणि सोशल मिडिया यावर लेख वाचला. पण लिंक देता येत नाही, नाही तर दिली असती! सोशल मिडियाचं Addiction एक झालं, पण सतत इतरांबरोबर तुलना करण्याची सवय, त्यातून नकळत एक सतत 'परफॉर्म' करत राहण्याचा दबाव निर्माण होणं, मागे पडण्याची भीती, नैराश्य येणं अशी साखळी निर्माण होऊ शकते.

ऋन्मेषने टाकलेले व्हिडीओज पाहिलेले नाहीत त्यामुळे त्यावर नो कमेंट्स. पण मलाही स्वातीसारखंच वाटतं. लहान मुलांना इतक्या लहान वयात ह्या इन्स्टाशी वगैरे ओळख करुन देऊ नये. आधी रील, व्हिडीओज टाकणंआणि मग व्ह्युज, कमेंट्सकरता आणखीन कंटेंटचा आटापिटा हे दुष्टचक्र आहे.

>> केयाचे expression faar गोड असतात. मला ती आवडते पण सध्या ती सासू सून कंटेंट करते आहे त्यामुळे हिला नेमकं काय कळतंय असं वाटत रहातं.>> ह्या केयाची रिल्स मी ही पाहिली आहेत आणि तिला सासू सून वगैरे कुचकट पॉलिटिक्समध्ये तिला आतापासून का ट्रेन करतायत हे मला कळत नाही. तिचं वय काय आणि बोलते काय असा प्रश्न पडतो.

सायो, exactly!
मागे एकदा तिच्या एका व्हिडीओ वर मी ही कमेंट पण दिलेली.

सर्व सूचना, सल्ले, काळजी आणि कौतुकाच्या प्रतिसादांचे आभार Happy

@ स्वस्ति
Voiceoverवाले फिल्मी videos बनवण्यापेक्षा , काही creative , informative , fun videos बनवता येतील का ते बघ.
>>>>>
हो, ते आहेच डोक्यात. पण तिच्याही मनात यायला हवे. सध्या ती हे एन्जॉय करतेय. करू देतोय. फेज जाईल ही सुद्धा. आताही नुसते Voiceover वाले व्हिडिओ ना शोधता काही वेगवेगळे ट्रिक असलेले प्रयोग चालू आहेतच. हे करून मन भरले की पुढे जाईल ती स्वतःच..

सोशल मीडिया किंवा इंस्ता यातले धोके ठाऊक आहेतच. तेराच्या आत जे अकाऊंट आहे ते सुद्धा तिच्या आईचे आहे. सोसायटीतील तिच्या वयाच्या तिच्या क्लोज ग्रुपच्या मैत्रिणींचे तिच्या आधीपासून होते. ती त्यांच्यासोबत आधी हे करायची. त्यामुळे तिलाही आपले स्वतःचे असावे असे वाटणे स्वाभाविक होते. यात पुढे जाऊन धोके आहेत या कारणास्तव तिला हे एकदम नाकारणे योग्य वाटले नाही. मग मैत्रिणीसोबत देखील करायचे नाही अशीही सक्ती करावी लागली असती. म्हणून यातले धोके समजावून विश्वासात घेऊन मग प्रोत्साहन देणे योग्य वाटले. आज ना उद्या सोशल मिडीयाशी संबंध प्रत्येक मुलाचा येणार आहेच. धोका तेरा चौदा वयात सोशल मीडियावर जाण्यातही आहेच. तरी सर्व प्रकारे लक्ष ठेवेन. बघूया पुढे हे कसे कुठवर जातेय..

@ केया नावाच्या मुलीचे व्हिडियो, तर ती म्हणजे तिचे पालक इथे नसताना असे स्पेसिफिक नाव घेऊन तिची चर्चा होऊ नये असे वाटते.

वाघाकडून त्याच्या न्यूड व्हिडीओ चा कंसेंट घेतलाय का?
>>>>
जाओ पहले उस डिस्कवरी आणि जिओग्राफिक चॅनेलवालों की साईन लेके आओ जो वाघ और वाघीण का रोमान्स दिखाते है Wink

पण पूर्ण व्हिडिओ पाहील्याबद्दला धन्यवाद

वेळ आहे तोवर सुधरा.

अनुभवांना जास्त अर्थ अस्तो हे लक्षात घ्या. लवकरच मानवी (जैविक) काय आहे आणि सिंथेटिक काय आहे हा फरक मानवी अस्तित्त्वासाठी फार फारमहत्तत्वाचा ठरणार आहे. कदाचित तुम्हाला आता त्याचे महत्त्व समजणार नाही, पण तुम्ही कोणत्या बाजूला आहात हे तुम्च्या मुलांसाठी खूप खूप मह्त्वाचे आहे.

मानवी (जैविक) काय आहे आणि सिंथेटिक काय आहे हा फरक मानवी अस्तित्त्वासाठी फार फारमहत्तत्वाचा ठरणार आहे. कदाचित तुम्हाला आता त्याचे महत्त्व समजणार नाही,
>>>

मला तुम्ही काय म्हणालात त्याचा अर्थही समजला नाही Happy

इतके मराठी छान नाही..

अमा समजले नाही.
हो इन्स्ताचे प्रायव्हेट अकाऊंट आहे.
रिक्वेस्ट पाठवली की aproval ला येते. त्या शिवाय आतले दिसत नाही.
म्हणून व्हिडिओ जोडून युट्यूब ला टाकलेत.

Views and Followers वाढविण्याचे धंदे

मला वाटते मोप टॅलेंट असले तरी ही इन्स्टा शी ओळख करून देण्याचे हे वय नक्कीच नाही. ती इतकी लहान आहे गोड आहे, तिला इतके सोमि मधे फेमस करायचीही गरज नाही.. सर्वांची नजर निकोप निर्मळ नसते!
सतत काय कंटेंट करावे, जास्त लाईक्स केव्हा मिळतात हे नकळत प्रेशर. हीट झाली तर कदाचित गर्व, ज्या मुलं मुली रील्स करत नाहित ते तुच्छ वगैरे भावना येणे अगदीच अशक्य नाही.
हळू हळू लहानपण विसरून १ सेलिब्रिटी वलय येत जाईल, मग अमुक मैत्रिणी चे सबस्क्रायबर का जास्त आपले का कमी वगैरे मधून उगा लहान वयात असूया वगैरे भावना येत जातात. फार फेच्ड वाटले तर सोडून द्या पण मला ही सेम वयाची मुलगी आहे, तिला ही युट्युब विडीओज करायचे होते ज्याची परवानगी मी दिली नाही तिने मा‍झ्या फोन वर गंमती दार विड बनवले जे आम्ही क्लोज नातेवाईकांना दाखवले आणि शाबासकी मिळून दिली.. अर्थात हा माझा मधला पर्याय झाला. ज्याचा त्याचा ज्याने त्याने योग्य पर्याय शोधून काढावा Happy
तुम्ही समजून घ्याल वगैरे अपेक्षा नाही, पण लिहावेसे वाटते ते लिहिले.

केया नावाच्या मुलीचे व्हिडियो, तर ती म्हणजे तिचे पालक इथे नसताना असे स्पेसिफिक नाव घेऊन तिची चर्चा होऊ नये असे वाटते.
>>>
This is exactly we don't want to happen with Pari and that is why people are saying it's not right age to give this platform..

Once you go public, You dont have control on what and who says about you..

@ रीया,
हे असे चर्चा घडणे एखाद्या लहान मुलीसाठी चांगले नाही असेही तूच बोलत आहेस आणि स्वतःही त्या केयाच्या चर्चेत सहभागी होत आहेस.
तर हे आपण इथे avoid करूया ना इतकेच मी म्हणत आहे...

बाकी मला कल्पना आहे की असे घडणार. त्याचा विचार चालू आहेच डोक्यात की माझ्या केसमध्ये मला काय सूटेबल मार्ग काढता येईल. Insta account बंद करणे हा एक मार्ग आहे. पण तोच एक मार्ग नाही. अजून मध्यममार्ग काय असावा याचा विचार करतो आता.

वर तू म्हणालीस की तू काही मुलींचे व्हिडिओ आवडीने बघतेस, फॉलो करतेस. म्हणजेच त्यांचे व्यू आणि लाईक वाढवून तू देखील त्यांना एकप्रकारे प्रोत्साहन देत आहेसच. त्यामुळे तुला जरी परीची काळजी वाटत असली तरी चांगल्या स्पिरीटने देखील असे व्हिडिओ बघितले जातात हे ही एक बाजू आहेच.

Pages