३० जून २०१८
she is very naughty..
She is most talkative..
And she is very loud.. उसे अपनी वॉईस कंट्रोल ही नही होती..
जब तक वो सोती रहती है तो क्लास शांत रहता है.. पर जब उठ जाती है तो.. जिस टेबल के पास वो जाती है वहा हल्लागुल्ला मच जाता है
पर उसको सिरीअसनेस नही है. उस दिन उसको पनिशमेंट दी. Pari stand there.. तो हसते हुए वहा जाके खडी हो गयी. और वहा पे भी मस्ती चालू.
फिर उसे क्लास के बाहर जाने को कहा, pari its punishment! Go and stand out of the class.. तो हसते हुए क्लास के बाहर निकल गयी ..
But she is Darling of the class..
She is one student like.. वो एक ऐसी लडकी है जो क्लास की रौनक है
और हा, वो बॉसी है.. किसी ने कुछ गलती कि, या किसी और के साथ भी कुछ किया तो उसके पीछे पड जाती है.. सॉरी बोलो उसे.. सॉरी बोलो.. और जब तक वो सॉरी नही बोलता उसे छोडती नही है.. She is like teacher of the class !
..... पोरीचा न्यू स्कूल मधील पहिला तक्रार कम कौतुक सोहळा
.
.
२ जुलै २०१८
कालच्या पॅरेंट टीचर मिटींगनंतर रात्री परीला विचारले, "परी तुला टीचर पनिशमेंट म्हणून क्लासच्या बाहेर काढतात आणि तू हसत हसत बाहेर जातेस?"
"हो !"
"अरे पण का..? तुला मजा येते का?"
"हो.. काय तर मी तिथे पाहिजे तेवढी मस्ती करू शकते आणि टीचर ओरडूही शकत नाही
मॉरल ऑफ द स्टोरी - वाईटातून नेहमी चांगले शोधावे
.
.
३ जुलै २०१८
परीच्या नवीन शाळेत एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. क्लासमधील काही मोजक्या मुलांना त्यांच्यातील कलागुण पाहता ठराविक दिवसांनी एक "बूकमार्क" दिला जाणार.
तसेच काही मुलांमधील स्किल पाहता त्यांच्यावर ठराविक काळासाठी एखादी जबाबदारी सोपवत त्याचा "बॅच" दिला जाणार.
परीला पहिल्याच वेळी बूकमार्क आणि बॅच दोन्ही मिळाले.
बूकमार्क मिळाला तो "पब्लिक स्पीकर"चा.. आणि यात काही आश्चर्य नाही. पोरगी आहेच बोलीबच्चन
पण बॅच मिळालाय तो "लाईन मॉनिटर"चा.. क्लासमधील ईकडेतिकडे दंगा करणारया मुलांना कंट्रोल करायचा. मी तर ऐकूनच धन्य झालो.
वर्गातल्या सर्वात मस्तीखोर मुलाला मॉनिटर करायचा फंडा आजही हिट आहे
.
.
११ जुलै २०१८
पोरगा आता त्या वयात पोहोचला आहे जेव्हा दूध पाजणारया आईपेक्षा ऊचलून घरभर फिरवणारा बाप जास्त महत्वाचा वाटतो.
आणि पोरगी तर अजूनही त्याच वयात आहे.
थोडक्यात एक कडेवर तर एक खांद्यावर...
दोन्ही एकाच वेळी माझ्या डोक्यावर ..
कुटुंब नियोजनाचे खर्रेखुरे महत्व आता कुठे समजू लागले आहे
.
.
१३ जुलै २०१८
परीला आजीकडे सोडताना किंवा घेऊन येताना मी तिला काहीतरी छोटामोठा खाऊ घेऊन देतो. आणि त्यातली थोडी टेस्ट सुद्धा मागतो. तेवढेच आपली पोरगी काय खातेय हे समजते, पोरगी शेअरींगही शिकते, आणि पोरीचे खाण्यात एक मजाही असतेच. ती सुद्धा मूड चांगला असेल तर फारसे आढेवेढे न घेता टेस्ट देते. कधी तोंडातला उष्टा लॉलीपॉपही देते आणि मी उष्टा केल्यावर परतही खाते.
तर त्यादिवशी असेच तिला फ्रूटी घेऊन दिली. मगितल्यावर तिने मला थोडी टेस्टही करून दिली.
दुसरया दिवशीही तिला फ्रूटीच हवी झाली. मी घेऊन दिली आणि परत टेस्ट मागितली.. परी टेस्ट बघू.. तर बोलली, अरे पप्पा काल टेस्ट दिली होती ना.. सेमच आहे
अजून करा हावरटपणा
.
.
१६ जुलै २०१८
काल परीने मला काहीतरी खेळायला बोलावले. मी तिला म्हणालो आधी एक पा तर दे. आज सकाळपासून एकही दिली नाहीस..
तसे तिने येऊन मला नेहमीसारखी एक ओठांची पा दिली. आणि नेमके तेव्हाच तिला एक ढेकर आला..
मी तिला गंमतीने म्हणालो, काय परी माझी पा घेऊन पोट भरले का?
तसे हसली आणि म्हणाली, अरे नाही. जे तू खाल्लेलेस ते सारे तुझ्या तोंडातून माझ्या तोंडात आले
.
.
४ ऑगस्ट २०१८
आज साडेतीनला ईंडिया ईंग्लंड क्रिकेट मॅच होती. म्हणून परीला दुपारीच सी शोअरला फिरायला घेऊन गेलेलो. दुपार असली तरी उन्हाचा पत्ता नव्हता. हिरवळ पाणी आणि मस्त ढगाळ रोमांटीक वातावरण होते. त्याचा फायदा उचलत कॉलेजची मुले आणि लवबर्डसचाच तिथे संचार होता. गार्डन बंद असल्याने आम्हाला त्यांनाच डिस्टर्ब करत तिथेच खेळावे लागले. कितीही बागडले तरी तिचे मन काही भरत नाही. पण मॅचची वेळ झाली तसे मी तिला म्हणालो,
"परया चल आता घरी.."
"पप्पा एवढी काय घाई आहे?"
"परया बराच उशीर झालाय..."
"एवढे लोकं तर आहेत आजूबाजूला, ते तर नाही गेले अजून"
"परया ते आत्ता आलेत. आपण आधी आलो आहोत. आणि तुला एक तरी लहान बाबू दिसतोय का ईथे?"
तिने आजूबाजूला पाहिले.. एकही नव्हता..
"बघ नाहीये ना एकही.."
"अरे पप्पा होता आता ईथे एक.. तो गेला आता"
"चल गेला ना घरी, मग आपणही जाऊया.."
ऑं ...
"अरे तो ईकडेतिकडे राऊंड मारायला गेला..
तू पण ना पप्पा, माझं ऐकत नाही पुर्ण.."
मी पुन्हा निरुत्तर झालो
.
.
१९ ऑगस्ट २०१८
काल परीसोबत सी शोअरच्या कट्ट्यावर भेल खात बसलेलो. छान पाऊस पडलेला. त्यामुळे मागच्या गार्डनमधील दोनेक उंदीर बागडायला बाहेर आले होते. परीची त्यांच्यावर नजर पडताच आनंदाने ओरडली... पप्पा ते बघ रॅट.. चुंदीर ..
चुंदीर..? बहुतेक तिचे चूहा आणि उंदीरचे सरमिसळ झाले असावे.
मी - अग्ग ए चुंदीर काय? एकतर हिंदीमधे चूहा तरी बोल नाही तर मराठी मध्ये उंदीर तरी बोल.
परी (लागलीच) - अरे पप्पाss, मी त्याचे नाव चुंदीर ठेवले आहे. तो चुंदीर आणि हा मुंदीर..
अरे ए चुंदीsर.. ए मुंदीsर.. ईकडे काय करत आहात तुम्ही? ..
पोरगी कधी स्वत:ची चूक कबूल करणार नाही
.
.
२५ ऑगस्ट २०१८
आज सकाळी छान साखरझोपेत होतो. स्वप्नही अगदी छान झोपेत असल्याचीच पडत होती. अचानक कोणीतरी सटासट तोंडात मारायला, थोबडवायला सुरुवात केली. हळूहळू मार वाढतच गेला. झोपेत असूनही लागत होते, अपमानास्पदही वाटत होते. स्वप्न असेल तर तुटू दे एकदाचे म्हणून डोळे उघडले आणि समोर पाहिले. माझे डोळे उघडायची वाट बघत असलेला रुनू गोड हसला. आणि उगाचच.. दोन थोबाडात आणखी पडल्या..
आज पहिल्यांदाच रुनूच्या बाजूला झोपलो ते त्याने माझे स्वागत असे केले.
उठल्या उठल्या पोराचा गोड चेहरा नजरेस पडावा हे चांगलेच आहे.. पण पुढच्यावेळी दोन थोबाडात कमी पडल्या तर आणखी चांगले वाटेन
.
.
४ सप्टेंबर २०१८
तिने हट्ट करणे आणि आम्ही तिच्यावर रागावत अबोला धरने हे अधनामधना चालूच राहते. या रविवारच्या सकाळी मात्र तिचा हट्ट आणि आमचा राग जरा जास्तच झाला. दोनेक तास उलटले कोणी माघार घ्यायला तयार नव्हते. हळूहळू मला बोअर होऊ लागले. रविवारची सुट्टी आणि तिच्याशी खेळायचे बोलायचे नाही म्हणजे काय. त्यात आमची फिरायला जायची आणि त्याआधी आंघोळीला जायची वेळ सुद्धा जवळ येत होती. पण आमची माघार म्हणजे तिच्या हट्टाला चालवून घेणे. म्हणून खोटा खोटा राग तोंडावर घेऊन बसलो होतो. पण अखेर तिनेच ही कोंडी फोडली.
तोडक्या मोडक्या ईंग्रजीत ईकडचा शब्द तिकडे असे काहीतरी एका कागदावर खरडवून आली. आणि आम्हाला ते वाचणे अवघड असल्याने मम्मासमोर तो कागद धरून तिनेच आम्हाला वाचून दाखवले..
I Promise you Mom.
I Dont Do Masti
.
.
२६ ऑगस्ट २०१८
Colour colour which colour do you want..?
काल परी आणि तिची एक मावशी हा खेळ खेळत होत्या. मी गरीब बिचारया बापासारखा रुनूला डाळभात भरवत होतो. दोनचारदा त्यांचा कलर ओळखायचा खेळ करून झाल्यावर मला एक नवीन गेम सुचला.
Letter letter which letter do you want..?
म्हणजे ईंग्लिशचे एक अक्षर द्यायचे आणि त्यापासून स्पेलिंग सुरू होणारी वस्तू शोधायची. उदाहरणार्थ C म्हटले की chair ला हात लावायचा आणि F म्हटले की fan दाखवायचा ..
सुरुवात परीने केली,
Letter letter which letter do you want..?
पहिलेच अक्षर मावशीने दिले - B
बी म्हणजे ब ब ब.. असे म्हणत माझ्याकडे धावत आली आणि रुनूचा हात पकडत म्हणाली .. बेबी Baby
.
.
९ सप्टेंबर २०१८
Letter Letter which Letter do you want? हा खेळ आमच्याकडे सध्या खूप चालतो.
त्या दिवशी असेच बेडरूममध्ये खेळत होतो. मी तिला लेटर "M" दिले.
म म.. करत ती My बोलली. मी लगेच फाऊल काढला, परी, माय असे काही असते का? काहीतरी वस्तू पाहिजे.
लगेच तिने जवळच पडलेली डॉल उचलली, आणि म्हणाली My Doll
फाऊल काढायला काही शिल्लकच ठेवले नाही.
मागे एकदा तिच्याबरोबर फिरायला जात होतो. टॅक्सीत आम्ही दोघेच होतो. मध्येच तिला हा खेळ खेळायची हुक्की आली. टॅक्सीत फार काही करण्यासारखे नाही तर बोअर झाली असेल. ते ठिक आहे, पण टॅक्सीत बसल्याबसल्या हा खेळ कसा आणि किती खेळणार होतो..
पण ऐकेल ती परी कसली म्हणून खेळायचे ठरवले. टॅक्सीतल्या टॅक्सीत आणखी काय शोधणार म्हणून पहिले लेटर टॅक्सीचाच "T" दिला.
आता तिची "टी फॉर ट्यूब" पेटून ती "टी फॉर टॅक्सी" हे उत्तर कधी देतेय याची मी वाट बघू लागलो. पण तिने टॅक्सीच्या बाहेर ईथे तिथे पाहिले आणि ट ट करत मला रस्त्याकडेचे "T for Tree" दाखवले. आणि आपण टॅक्सीत बसलो असतो तेव्हा आपले जग टॅक्सीपुरतेच मर्यादीत नसते याचा मला साक्षात्कार झाला.
काल असाच घरी खेळ चालू होता.
मी तिला Letter "W" दिले होते.
तिने उत्तर दिले, व व व.. Winter ..
मी पुन्हा फाऊल काढला, परी विंटर कुठे आहे ईथे, दाखव?
"अरे पप्पा एसी तर चालू आहे, मला थंडी वाजत आहे, म्हणून विंटर :):)
त्यानंतर मग उलटा डब्ल्यू Letter "M" दिला.
म म मिरर आधी बोलून झालेले, त्यामुळे ते पुन्हा अलाऊड नव्हते. म्हणून मग ती म म मेटल म्हणाली.
मी विचारले, ईथे कुठे आहे मेटल? दाखव.. तर तिला मेटलचा अर्थ माहीत नव्हता.
मी फाऊल काढणार ईतक्यात म्हणाली, अरे पप्पा मी मेटल नाही मेन्टल म्हणाले.
आता कुठे आहे मेंटल विचारायचा प्रश्नच नव्हता. याआधीही मला बरेचदा मेंटल बनवून झालेय तिचे आणि आताही तिचे बोट माझ्यावरच रोखले होते
.
.
१० सप्टेंबर २०१८
Letter letter which letter खेळता खेळता पोरीला मध्येच एक नवीन गेम सुचला..
पप्पा आपण number number which number खेळूया?
आता हा कसा खेळायचा? मला काही समजले नाही म्हणून तिलाच विचारले.
अरे म्हणजे वन फॅन, टू ट्यूबलाईटस.. असा खेळायचा..
माझी ट्यूबलाईट अजूनही पेटली नाही. तरी मी तिला गेम स्टार्ट करायला 3 नंबर दिला. तसे तिने ईथे तिथे पाहिले आणि थ्री लोडस म्हणत तीन लोड जमा केले. मला गेम समजला.
मी फोर नंबर दिला तसे तिने चार पिलो (उश्या) जमा केल्या. मी फाईव्ह नंबर देताच तिने अजून एक उशी आणली. मी लगेच गेममध्ये एक रूल टाकला. एकदा काऊंट झालेली वस्तू पुन्हा मोजायची नाही.
पुढे सात नंबर दिला तसे तिने सात टोप्या आणल्या. दहा नंबरसाठी तिच्या पर्सवरच्या डिजाईनमधील दहा सर्कल मोजले.
बारा नंबरसाठी तिच्या नेकलेसमधील फक्त पिंक मणी काउंट केले. आणि ते बरोब्बर बाराच भरले.
पुढे मी १५ नंबर दिला तसे माझे कपडे मोजायला घेतले. दरवाज्याला लटकवलेले सात आठ मोजून झाल्यावर पुढचे मोजायला कपाटात शिरली.
२० नंबर तर खूपच सिंपल होता. पटापट हातापायांची वीस बोटे मोजली.
२५ नंबरसाठी मण्यांची मोठी माळ घेऊन आली.
फायनली बाहेरच्या रूममधून ३० प्लेईंग कार्डस मोजून आणले आणि पहिल्याच दिवशी शंभर नंबर पर्यंत मोजामोज नको म्हणून अखेर आम्ही थांबलो
क्रमश:
जवळपास एक वर्ष वाट पाहिली या
जवळपास एक वर्ष वाट पाहिली या भागाची...
"हो.. काय तर मी तिथे पाहिजे तेवढी मस्ती करू शकते आणि टीचर ओरडूही शकत नाही."
रूनूकथांच्या (रून्मेशच्या बाललीला) प्रतिक्षेत
या मालक.
या मालक.
फारफार वाट बघायला लावलीत.
असो आता खंड नका पडू देऊत. पु भा प्र
भारीच आहे.दोन्ही बाळं
भारीच आहे.दोन्ही बाळं सांभाळायला शुभेच्छा.
आईवर गेलीये पोरगी (बहुतेक).
आईवर गेलीये पोरगी (बहुतेक). हुश्शार आहे.
नाव काढणार बाबाचं
परी लोकसत्ता पण वाचते का?
परी लोकसत्ता पण वाचते का?
https://www.loksatta.com/marathi-jokes-news/marathi-latest-punekar-jokes...
हा लोकसत्तेतला जोक -
बायको बदाम खात होती …….
पती म्हणाला ‘मलाही टेस्ट करू दे…’
तिने एकच बदाम दिला..
पती : बस एकच?
बायको : हो… बाकी सगळ्यांची टेस्ट पण अशीच आहे …
स्थळ : पुणे
हा परीने केलेला जोक -
तर त्यादिवशी असेच तिला फ्रूटी घेऊन दिली. मगितल्यावर तिने मला थोडी टेस्टही करून दिली.
दुसरया दिवशीही तिला फ्रूटीच हवी झाली. मी घेऊन दिली आणि परत टेस्ट मागितली.. परी टेस्ट बघू.. तर बोलली, अरे पप्पा काल टेस्ट दिली होती ना.. सेमच आहे
अहो पुणे तिथे काय उणे.
अहो पुणे तिथे काय उणे.
कित्ती काॅपी करावी म्हणतो मी पुणेकरांनी
कसली कॉपी ? वेगळा आहे की जोक
कसली कॉपी ? वेगळा आहे की जोक आणि असे लहान मुले कॉमनली बोलतातच.
लहान मुलांनी काय बोलायचं हे
लहान मुलांनी काय बोलायचं हे पण आता तुम्हाला विचारायचं का? की पालकांनी ते सांगायचं/ लिहायचं का नाही ते तुम्हाला विचारायचं?
परी कथा नेहमीच आवडतात आणि तिचा अभिमान वाटतो
तिच्या आईची कलाकृती (चप्पाज) पण टाक की इथे
छान, आवडल्या.
छान, आवडल्या.
पोरगी कधी स्वत:ची चूक कबूल करणार नाही Happy>> बापावर गेलीये.
हो हो. अॅनिमल चप्पाज पण दे
हो हो. अॅनिमल चप्पाज पण दे इथे.
लहान मुलांना काय बोलायचं ते
लहान मुलांना काय बोलायचं ते बोलूदेत;
पालकांनी ते इतरांना सांगायचं/ लिहायचं का हादेखील त्यांचा प्रश्न आहे;
लहान मुलांच्या पालकांनी आपल्या पालकांबद्दल आज्जीआजोबा, पंजीपणजोबा, खापरआजी/जोबा, खापरपणजी/जोबा, मामा मामी, काका काकू, आत्या मामा, मावशी काका अजून काय दुरदूरचे जवळजवळचे नातेवाईक, आख्ख्या खानदानची डायरी, कादंबरी, इतिहास, भूगोल, जीवशास्त्र काय लिहायचा ते लिहुदेत...
पण वाचकाने आम्हाला याच्यात काडीचाही इंटरेस्ट नाही we don't give a damn! म्हणलं तर चालेल का?
छान आहेत परीकथा. लहान
छान आहेत परीकथा. लहान मुलांचे वेगळेच असे विश्व असते.
आमच्या शेजारच्या पाहुण्या मुलीने ( वय वर्षे ५ ) तिने स्वतः विडंबन केलेली कविता ऐकवली.
खबडक खबडक घोडोबा, घोड्यावर बसले लाडोबा ही आहे मूळ कविता. पाहुणीने विडंबन केलेली कविता खालची.
खबडक खबडक घोडोबा, घोड्यावर बसले पणजोबा
पणजोबांचे लाड करतय कोण, आजोबा - आजी नी पणज्या दोन !!
जर वाचकाला काडीचाही इंटरेस्ट
जर वाचकाला काडीचाही इंटरेस्ट नाही, तर कुणाला चालेल का नाही चालत त्याने काय फरक पडतो अॅमी?
we don't give a damn! ह्याने लिहिणार्याला तरी काय फरक पडणारे?
रश्मी, दोन पणज्या???
रश्मी, दोन पणज्या???
अगं ! हो ! कारण तिच्या
अगं हो ! कारण तिच्या पणजोबांना खरच दोन बायका होत्या.
मस्त..आता रेग्युलरली येऊ देत
मस्त..आता रेग्युलरली येऊ देत परीकथा.
एखाद्या व्यक्तीबद्धल इतका
एखाद्या व्यक्तीबद्धल इतका तिरस्कार ते देखील या अशा सुंदर धाग्यावर?
परीकथा खरच छान आहेत !
पण वाचकाने आम्हाला याच्यात
पण वाचकाने आम्हाला याच्यात काडीचाही इंटरेस्ट नाही we don't give a damn! म्हणलं तर चालेल का?
>>>
का म्हणे? तुमच्याकडे ते म्हणण्यापेक्षा धागा उघडून न वाचण्याचा पर्याय असतोच की, किंवा वाचून तुम्ही प्रतिसाद द्यायलाच हवाच ही सक्ती कोणी केली तुमच्यावर?
इतर गोष्टी ठीक आहेत पण लहान मुलांच्या निरागसतेचा राग राग करणाऱ्यांना काय म्हणावं बरं
परी कथा नेहमीच आवडतात आणि
परी कथा नेहमीच आवडतात आणि तिचा अभिमान वाटतो Happy>>+१.
नियमितपणे येऊदे परीकथा.
आयडी फोटोत परी आहे की रुनू??
आयडी फोटोत परी आहे की रुनू??
आयडी फोटोत परी आहे की रुनू??
नवीन Submitted by Nidhii on 14 September, 2018 - 15:37
>>>
माझे चार आणे परीवर.
> तुमच्याकडे ते
> तुमच्याकडे ते म्हणण्यापेक्षा धागा उघडून न वाचण्याचा पर्याय असतोच की, किंवा वाचून तुम्ही प्रतिसाद द्यायलाच हवाच ही सक्ती कोणी केली तुमच्यावर? >
म्हणजे "आम्ही आम्हाला काय पायजे ते धाग्यात लिहिणार. तुम्हाला आवडत नसेल तुम्ही धागा उघडून वाचू नका, किंवा वाचलाच तर प्रतिसाद देऊ नका". लेखकाना संपूर्ण स्वातंत्र्य हवे पण वाचकांवर छानछान'च' प्रतिसाद देण्याची किंवा गप्प बसण्याची सक्ती?
===
> इतर गोष्टी ठीक आहेत पण लहान मुलांच्या निरागसतेचा राग राग करणाऱ्यांना काय म्हणावं बरं > लहान मुलं असुदेत नाहीतर मोठी माणसं; जर त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्याबद्दलच्या लिखाणाबद्दल निगेटिव्ह फिडबॅक दिलेला चालत नसेल तर त्यांना जालावर पब्लिक प्लेसमध्ये आणू नका.
स्पष्टीकरण देण्याची गरज नाही
स्पष्टीकरण देण्याची गरज नाही माहित आहे तरीही लिहितेय:
मला तुमचा अभिषेक चे लिखाण आवडत नाही. मी हे परीकथा धागे उघडूनही बघत नाही. त्या दुसऱ्या धाग्यावर उल्लेख वाचला म्हणून इकडे आले.
ऋन्मेषचे धागे, प्रतिसाद एकेकाळी आवडायचे.
भन्नाट भास्कर आणि त्याचा 'मीच तो' धागा वाचल्यापासून मला तिन्ही आयडी आणि त्यांच्या धाग्यात काहीएक रुची राहिलेली नाही.
हे वरचे दोन्ही प्रतिसाद काय पर्सनल, काय पब्लीक, पर्सनलला पब्लिक केल्यावर काहीही प्रतिसाद मिळू शकतात, मग नंतर मुळूमुळू रडण्यात अर्थ नाही एवढेच सांगण्यासाठी लिहिले आहेत.
(धागालेखक रडतोय असे म्हणने नाही)
खूप सुंदर...आतापर्यंतच्या
खूप सुंदर...आतापर्यंतच्या तुमच्या परीच्या गोष्टींमधली ही सगळ्यात जास्त आवडली. God bless your kinds.
खूप दिवसांनी फिरकलो, खरे तर
खूप दिवसांनी फिरकलो, खरे तर धागा ईथे पोस्ट केल्यापासून आताच. त्यामुळे लेट प्रतिसादाबद्दल क्षमस्व आणि सर्वांचे आभार
रीया, तिच्या आईची कलाकृती (चप्पाज) वगैरे कलाकृती म्हणून स्पेशल नाहीत, ती ते पोरीसाठी करते हे स्पेशल आहे.
तरी एखादा भाग टाकायचा झाल्यास त्यात टाकतो. ईथल्या काही प्रतिसादांनी पुढचा भाग टाकायचा हुरूप वाढवलाय
आयडी फोटोत परी आहे की रुनू?? >>>> रुनू
दोन्ही मुले थोडीफार माझ्यावर गेल्याने सेम दिसतात
बिपीनचंद्र, खरे जोक तर लहान मुलेच बनवतात. आपण मोठी माणसे फक्त एखाद्याला चिडवता कसे येईल हे बघत असतो
अॅमी, जसे लेखावर नकारात्मक प्रतिसाद येतात तसेच तुमच्या एखाद्या प्रतिसादावरही नकारात्मक प्रतिसाद येऊ शकतात. पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करून तुम्हाला हवे ते प्रतिसाद देत जा. माझी काही हरकत नाही. प्रतिसाद हे फिडबॅक म्हणूनच बघावेत. चांगले वाईट सारे स्विकारावेत. आणि त्यानंतर ऐकावे जनाचे करावे मनाचे आहेच
आजोबा - आजी नी पणज्या दोन !! .. हे भारी आहे
good answer Abhishek,
good answer Abhishek,
bahuda manat khupach aakas aahe tyanchya, mhanun evdhi garal okli aahe.
tumchya parikatha aavdataat.
अर्रे ! परीकथा मस्तच.
अर्रे ! परीकथा मस्तच.
गणेशोत्सवातला सहभाग मिस केला. व्यक्तिचित्रणावर आपला धागा हवा होताच.
वेगळा धागा काढुन नाही रे,
वेगळा धागा काढुन नाही रे, यातच येउ देत चप्प्पा फोटोज
बरं मी काय म्हणतो, या "कथा"
बरं मी काय म्हणतो, या "कथा" खऱ्या की ट्युलिप चे अनुभव ते कसं समजणार?
माझा इथला प्रतिसाद आपोआप कसा
माझा इथला प्रतिसाद आपोआप कसा काय डिलीट झाला ? माझ्या कथेच्या धाग्यावरचा https://www.maayboli.com/node/81651 इथे Submitted by झम्पू दामलू on 23 August, 2022 - 20:34 हा प्रतिसाद अद्याप आहे. त्या प्रतिसादाला या ट्रोल्सच्या निर्मात्याच्या धाग्यावरच प्रतिसाद नको का द्यायला ? तिथे जर तुमचा अभिषेक या आयडीनेच प्रतिसाद दिला असता तर ठीक होतं.
दुसरा ऋन्मेष हा आयडी आहे. या आयडीने कथा तर नाहीत लिहील्या जात. कथेवर वैयक्तिक प्रतिसाद येण्याचा संबंध नाही. करंट अफेअर्स वर राळ उडणारच. त्यातून प्रत्येकाला वेगवेगळे प्रतिसाद दिले की मग वैयक्तिक प्रतिसादांकडे आपोआप गाडी घसरते. पण स्वतःच्या करंट टॉपिकवरच्या धाग्यावर सुद्धा अवांतर नको म्हणून स्वतःवरच्या आरोपांसाठी वेगळा धागा काढला आहे. तर मग दुसर्यांच्या कथेच्या धाग्यावर ट्रोल आयडीद्वारे असे प्रतिसाद का दिलेत ? कथेचे धागे का भरकटवलेत ? चिकवाच्या धाग्यावर सुद्धा याच ट्रोल आयडी द्वारे उकसवणारे प्रतिसाद सातत्याने चालू आहेत.
त्या प्रतिसादाला अद्याप उत्तर दिलेले नाही. पण इथेच देईन. ते नको असे वाटत असेल तर मुद्दामून उकसवणे थांबव.
हा प्रतिसाद डिलीट करण्यापूर्वी माझ्या नावाने जे ट्रोलिंग केलेय त्याची साफसफाई व्हावी. मी कुठलाही प्रतिसाद दिलेला नसताना, मायबोलीपासून वर्षभर दूर राहून पाहिले तरीही ट्रोलिंग चालू आहे. जर अॅडमिन आणि वेमा यांच्याशिवाय इतरांकडे प्रतिसाद डिलीट करण्याची परवानगी नसेल तर मग माझ्या धाग्यावर ट्रोलिंग कसे काय होतेय ? मला घालवणे हा उद्देश असेल तर माझे धागे उडवा एव्हढेच म्हणणे आहे.
त्याचा अर्थ माझ्या म्हणण्यानुसार मायबोली चालली पाहीजे असा कसा काय होईल ? माझे लिखाण आहे त्याचा मायबोली चालवण्याशी काय संबंध ?
हा प्रश्न तुमचा अभिषेक या आयडीनेच विचारला असता तर तिथे सुद्धा उत्तर मिळाले असते.
फिल्मी, झंपु किती ट्रोल आयडी
फिल्मी, झंपु किती ट्रोल आयडी चालवशील ? बास कि. मी फिल्मी या आयडीला ऋन्मेष या आयडीला किंवा तुमचा अभिषेक या आयडीला उद्देशून एक शब्दही लिहीलेला नाही मायबोलीवर. पण फिल्मी या आयडीने माझ्या नावाने वर्षभरापूर्वी खूप ट्रोलिंग झाले आहे. माझा आयडी उडवीन म्हणून प्रतिज्ञा पण केली होती. फिल्मी हा आयडी गेल्यावर आता दुसर्या आयडीने ट्रोलिंग चालू केलेय. बास कर.
Pages