नाना चाराच्या एस.टी.नं तालुक्यावरून परतला. एस.टी. स्टॅंडवरून जड पावलांनी घरी यायला चक्क अर्धा तास लागला.
एवढं वय झालं तरी नाना स्टॅंडवरून झपाझप पावलं टाकत १० मिनिटांत घरी पोहचायचा. गुडघ्यापर्यंत धोतर , अंगात बंडी , बंडीला डाव्या छातीवर बटणाचा खिसा, त्यात एक डायरी आणि एक पेन, पायात वहाणा , पाठीचा कणा ताठ, नजर समोर , डोळ्याला गांधींसारखाच गोल भिंगाचा चष्मा.
नाना चालू लागला की बरोबर कोण चालत असेल त्याची तारांबळ उडायची.
कातरवेळ
--------------------------------------------
जेव्हा केशरी रंगाचं अस्तित्व पुसत
राखाडी रंग आकाशात पसरत जातो
तेव्हा उत्फुल्लपणाचं अस्तित्व पुसत
अस्वस्थपणा मनात उतरत जातो
मनात अनामिक हुरहूर दाटून येते
कारण ती कातरवेळ असते
जेव्हा पाखरं माघारी फिरतात
जेव्हा माणसं घरात शिरतात
तेव्हा कुठल्याकुठल्या आठवणींची
वटवाघळं मनात भिरभिरतात
कधी कोणाची दुखावणारी
मनात खोल याद असते
कारण ती कातरवेळ असते
आस
अशाच या कातरवेळी
निशब्द असावा
आसमंत सारा
त्यासमयी रवि तु
क्षितिजाच्या कुशीत निजावा
रवि तुज निजवताना
वारा ही गाई झुळझुळ गाणे
ती लुकलुकणारी कोर ही
बघ तुज कथा सांगे
अशाच एका कातरवेळी
बघ. कोण पणती
त्या तुळशीसमोर लावे
मंद अश्या त्या प्रकाशात
माझा ऊर भरुन वाहे
तेव्हा दुरवर कोठेतरी
मज ऐकु येते ती किणकिणारी घंटा
'आस' लागे मनास कान्हा
तसाच ऐकु येईल का रे मज
एक दिन तुझा मधुर पावा..
-दिप्ती भगत
(९मे, २०२०)
कातरवेळ..
अंबरात नाना रंगाची
उधळण होते तेव्हा
अंतरी अनामिक अशी
चाहुल लागते
क्षणाक्षणाला मन
हिंदोळ्यापरी झुलते
तुझ्या आठवांनी
डोळा आसवांची गर्दी होते
रोज कातरवेळी
मना याद तुझी येते
तुझ्या आठवणींत
मन असे विरु लागते
मन माझे वेडे
तुझ्या स्वप्नी रंगते
तु दुर असला तरी
तुजपाशीच विसावते
(Dipti Bhagat)
कातरवेळ
क्षितिजाजवळ खरवडलेले भकास आकाश
तांबडया पिवळया जखमा, चेहरा उदास
ओहोटीच्या वळवळीत, हरवला भरतीचा थरार
खारे पाणी साकाळत डोळा , किनारा निराधार
आकाशाच्या पोकळीत अजूनही गुंजतेय
परागंदा पाखरांची फडफड, भरतीची गाज
हळूहळू दाटतो अंधार अंतर्मुख निळया जळी
ठसठसु लागतं चांदणं आठवांचं कातरवेळी
दत्तात्रय साळुंके