Submitted by दत्तात्रय साळुंके on 27 October, 2017 - 04:48
कातरवेळ
क्षितिजाजवळ खरवडलेले भकास आकाश
तांबडया पिवळया जखमा, चेहरा उदास
ओहोटीच्या वळवळीत, हरवला भरतीचा थरार
खारे पाणी साकाळत डोळा , किनारा निराधार
आकाशाच्या पोकळीत अजूनही गुंजतेय
परागंदा पाखरांची फडफड, भरतीची गाज
हळूहळू दाटतो अंधार अंतर्मुख निळया जळी
ठसठसु लागतं चांदणं आठवांचं कातरवेळी
दत्तात्रय साळुंके
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान
छान, आवडली
ठसठसु लागतं चांदणं आठवांचं
ठसठसु लागतं चांदणं आठवांचं कातरवेळी >>>>
क्या बात है.....
शशांकजी खूप , खूप धन्यवाद
शशांकजी खूप , खूप धन्यवाद उस्फूर्त प्रतिक्रियेसाठी
VB खूप आभार प्रतिसादासाठी
खूप खूप छान सर
खूप खूप छान सर
सुंदर!!
सुंदर!!
जबरदस्त एकदम
जबरदस्त एकदम
वृंदाजी कृपया मला सर म्हणू
वृंदाजी कृपया मला सर म्हणू नका .
मी आपला व अक्षयजी , अंब्दज्ञजी चा खूप आभारी आहे या उस्फूर्त प्रतिसादासाठी