नचिकेतच्या डोळ्यासमोर क्षणभर काळीसावळी धीट मुलगी उभी राहिली...पण गार्गी माझी आई तर गोरी पान मग हे सगळं कोणी लिहिलं असावं ? कोणाची ही डायरी ? त्याच्या चेहर्यावर प्रश्नार्थक भाव बघून अनुला गहिवरुन आलं. त्याचा हात हातात घेत म्हणाली...रात्र फार झाली आहे उद्द्या वाच...पण नचिकेतची उत्सुकता आता शिगेला पोहचली होती. याचा सबंध आपल्याशी कसा हे त्याला जाणून घ्यायचं होत..पण आत्तापर्यन्तच्या वाचण्यातून त्याला कुठलाच अंदाज येत नव्हता. डायरीतील एकुलत्याएक गार्गी बद्दल तो विचार करु लागला. डायरीच्या शेवटच्या पानांमधे काही फोटो होते..तो ते निरखून बघू लागला.
गोट्याने गाडीतून उतरून मागच्या सीट वरचे दप्तर घेतले आणि आईला हात हलवून निरोप दिला. गाडी दिसेनाशी होईपर्यंत तो तिथेच उभा राहिला आणि मग हळूहळू त्याने शाळेच्या दिशेने चालायला सुरुवात केली. शाळेत शिरल्यावर आधी त्याचे लक्ष शाळेच्या मैदानात गेले. त्याने सभोवार बारकाईने पाहिले आणि त्याच्या नजरेने एक जागा टिपली. नंतर मग तो वर्गाच्या दिशेला वळला. सभोवती मुलांची गर्दी, गडबड, गोंधळ, यातलं काही गोट्याच्या डोक्यात शिरत नव्हत. त्याच्या डोक्यात फिरत होती फक्त "बचाव नीती" वरवर शांत राहिलेल्या गोट्याच्या डोक्यात प्रचंड वादळ घोंघावत होतं.
आभाळ भरुन आलं होतं. अनु आत्ताच कुठे काम आवरुन निवांत बसली होती. दुपारचा हा एकांत तिला खूप हवाहवासा वाटत असे. बंद घरात मोकळा श्वास घ्यायला तिला हाच वेळ मिळत असे. आज भरुन आलेल्या आभाळाने आज या एकांतात आणि या एकांतात ती करत असणार्या अभ्यासात व्यत्यय आणला होता. ती अनिच्छेनीच उठली भराभर तारेवरचे कपडे आत आणले. भांड्यांच टोपलं घरात घेतलं. आभाळ एव्हाना गडगडायला लागलं होतं. चांगलाच काळोख दाटला होता. या आभाळासोबत अनुचे मन भरुन आलं, सारं काही कंठाशी दाटून आल्यासारख वाटत होतं.
त्याच्या दूर जाणाऱ्या पाठ्मोऱ्या आकृतीवर तिची नजर कितीतरी वेळ खिळली होती.त्याची आकृती दिसेनाशी होताच तिची नजर शुन्यात हरवली. गतकाळाने तिच्या डोळ्यांपुढे अगदी थैमान घातला.कितीतरी स्मृतींची वलये तीच्या मन:पटलावर फेर धरु लागली.
त्याने एकदा मागे वळून पाहावे, आपल्यासाठी थांबावे अशी फोल आशा तिला का वाटावी? ज्या व्यक्तिचा तिने सदैव तिरस्कार केला, तो आपल्या आयुष्यातून निघून जाण्याची स्वप्ने पाहिली त्याने आज तिच्यासाठी का म्हणून थांबावे?
शेवाळ्याचा दगडाला चिकटुन रहाणे,हा स्थाईभाव आहे.त्याच प्रकारचा स्थाईभाव घेऊन हा पदार्थ जन्माला आला.वडा हा भारतीय खाद्य संस्क्रुतितला पदार्थ पावाला ईंग्रजांच्या आमदानीत चिकटला असावा.हे दोन्ही पदार्थ एकमेकाला असे काही चिकटले,की त्यांच वेगवेगळ अस्तित्व ,हे एकमेकाशिवाय सिद्ध करता येत नाही.किंवा सिद्ध करायला गेलं,तर काही ठिकाणी सिद्ध करणाय्राचा वडाच झाला असं दिसुन येईल.
कहाणी शेतकर्यांची - खास श्रावण मासानिमित्त
( एक रुपककथा )
मी एक पसरट भांड्यातील राजकुमार आहे ज्याचे विचार क्षितिजापलीकडे जाऊन अंधुक होतात..
पण या जगात असेही लोक आहेत ज्यांच्याकडे भविष्यापलीकडे जाऊन बघण्याची शक्ती असते..
माझे आईवडील अश्यांपैकीच एक..
काय, कसे, नेमके कश्यामुळे, माहीत नाही पण माझ्या आईवडीलांनी मी पाळण्यात असतानाच ओळखले की माझे ईंग्रजी भाषेचे ज्ञान इतर मध्यमवर्गीय मराठी मुलांच्या मानाने फार कच्चे आहे... आणि... तिथेच एक ऐतिहासिक निर्णय घेतला गेला... माझे सारे शिक्षण शुद्ध मराठी माध्यमाच्या शाळेतूनच होण्याचा..
सकाळ झाली वाटत? बाबाने अंथरुणातून गणूला उचलले, खळखळ त्याचे तोंड धुतले, कपडे सारखे केले आणि त्याच्या हातात एक बिस्कीट कोंबले. गणू अजून पेंगतच होता. बाबाने स्वतःचे आवरले आणि गणूला खांद्यावर घेउन तो शेताकडे निघाला. बाबाच्या खांद्यावर गणू आपली झोप पूर्ण करून घेत होता. पायवाटेने बाबा निघाला आणि पक्षांच्या किलबिलाटाने गणूला प्रसन्न जाग आली. त्याने मान वळवून पक्षांच्या दिशेने पाहायला सुरुवात केली. पक्षांना पाहून त्याला खूपच छान वाटले आणि बाबाच्या खांद्यावर तो नीट सरकून बसला. मध्येच एक पक्षांची रांग झाडांमधून बाहेर पडून आकाशाच्या दिशेने उडाली आणि गणूची मान त्या दिशेने कलली.
जून २०१२ - खरेदीतील काही नवीन पुस्तके
ऑफिसमधे येऊन अर्धा तास पण झाला नव्हता पण कंटाळा शुक्रवार संध्याकाळ इतका आला होता. जुलैचा महिना त्यात बाहेर तूफान पाऊस पडत होता, त्यामुळे ट्रेन उशीरा धावत होत्या. मध्य रेल्वे तर कधीही बंद पाडायच्या मार्गावर होती. आज ऑफिस अगदी सुनसान होते. सीक्युरीटी गार्ड बसल्याबसल्या चक्क पेंगत होता. बहुधा ऑफिसमधे मीच एकटी वेळेत आले होते. दुसरे कुणीच दिसेना. मेलबॉक्स चेक करून बघितला तर काही नविन मेल नव्हतं. मग उगाच फेसबूक वगैरे उघडून बसले. पण वेळ जाता जात नव्हता. तसं आजच्या दिवसाभराच्या कामाचं माझं काहीच जास्त टारगेट नव्हतं.