संस्थान ड्युआयडी : कहाणी शेतकर्‍यांची : एक रुपककथा

Submitted by मी-भास्कर on 24 July, 2012 - 07:20

कहाणी शेतकर्‍यांची - खास श्रावण मासानिमित्त
( एक रुपककथा )

संस्थान ड्युआयडी : एक आधुनिक प्रागतिक संस्थान. जुना अभिमानास्पद इतिहास असलेले छोटेसे राज्य. शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण अशा सर्व क्षेत्रात अग्रेसर. अशा स्थितीला पोचलेल्यांना स्वसंतुष्टता, अहंता आदींचा संसर्ग होण्याचा धोका असतोच असतो! तसे इथेही घडू लागले असावे. संपन्नता दिसल्यावर चोरभामटे येणारच! उद्योग, व्यापार क्षेत्रांनी या चोरभामटे-प्रश्नाकडे राजाचे लक्ष वेधले. राजाने थोडे लक्ष देऊन त्यांना स्वत:ची सिक्युरिटी यंत्रणा उभी करू दिली. राजाला अनुमती देण्यापलिकडे कांहीच करावे लागले नसल्याने या व्यावसायिकांचा प्रश्न सुसह्य झाला.
शेतकर्‍यांचे मात्र वेगळे प्रश्न होते. एकतर ते मोठ्या क्षेत्रावर विखुरलेले असल्याने झटपट एकत्र येऊ शकत नव्हते आणि त्यांना दोन पायांच्या तसेच चार पायांच्या प्राण्यांचाही उपद्रव सुरू झाला होता. शेतकर्‍यांनी बुजगावणी, गोफणी व रात्रपाळीचे गडी इ. उपाय योजून पाहिले. पण आताचे चोर व जनावरे झुंडीने वावरतात. त्यांच्यासमोर शेतकर्‍यांचा टिकाव लागेना.
एकदा एका शेतकऱ्याने चोराला पकडून आणले तर चोरानेच बेमालूमपणे ’उलट्या बोंबा ’ मारल्याने खोलात चौकशी करण्याचे कष्ट टाळून अंमलदाराने ’प्रिंसिपल ऑफ़ पॅरिटी’ लावून दोघांनाही ’अंदर’ केले. चोराला काय याची सवय होती . त्याची फुकट राहाण्याजेवणाची सोय झाली. त्याने शेतकर्‍यालाच तुरुंगवासात खिजवून दाखवले. शेतकरी मात्र ’पायावर धॊंडा’ पाडून घेतल्याचा पष्चात्ताप करीत बसला. पीडित व पिडणारा एकाच मापाने मोजण्याच्या अजब तंत्रामुळे त्याची झालेली परवड पाहिल्यावर कुठला शेतकरी चोराच्या वाटेला जाईल? त्यामुळे मग तक्रारी वरवर पाहाता कमी झाल्या. पण शेतकर्‍यांचा त्रास मात्र वाढायलाच लागला. दरवडेखोर, पिसाळलेले हत्ती, रानडुक्करे यांचा त्रास सहन करण्याच्या पलिकडे गेल्यावर सर्व शेतकरी धावले राजाकडे कांही मार्ग निघेल या आशेने. राजाला असल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ हवा ना. त्याने लक्ष घालण्याचे आश्वासन तर दिले, पण दरबारी लोकांच्या सल्ल्याने आदेश काढला .
आणि शेतकर्‍यांनी डोक्याला हात लावला!

राजाचा आदेश : "चोर, रानडुक्करे, पिसाळलेले हत्ती इत्यादींना निमंत्रण देणारी कोणतीही पिके शेतकर्‍यांनी आपल्या शेतात घेऊ नयेत. "

आणि राजा पुन्हा आपल्या अंतर्गत आणि बाहेरील राज्यांशी चाललेल्या राजकारणात व्यस्त झाला!
राजाच्या दृष्टीने प्रश्न मिटला , पण शेतकरी मात्र चक्रावले. आदेश मानला तर भुकेने बळी जाणार. नाही मानला तर राजाचा रोष व दरवडेखोरांचा हैदोस! पुन्हा एकदा जिवाच्या आकांताने सर्व शेतकरी धावले राजाकडे.
राजाच्या दरबारी सेवकांनी शेतकऱ्यांनाच दटावले, " अरे महाराजांकडे कशाला येताय अशा किरकोळ बाबींकरता?"

शेतकरी - किरकोळ? अहो , चोरांना असे मोकाट सोडल्यावर कशी शेती करायची आम्ही?

दरबारी- अरे दुर्लक्ष करा त्यांच्याकडे. भुरट्या चोरांना काय घाबरता? घेऊन जाऊ द्या थोडे त्यांना.

शेतकरी- साहेब दुर्लक्ष (इग्नोर) करायला ते काय पांढऱ्यावर काळे केलेले लेख आहेत?

दरबारी- केले दुर्लक्ष तर काय करतील ते?

शेतकरी- अहो पिके कापून नेतील, विरोध केला तर जाळून टाकतील. रानडुक्करे, पिसाळलेले हत्ती शेत उध्वस्त करतील. पोट कसे भरायचे आम्ही? आणि नाही आम्ही शेत पिकवले तर खाणार काय तुम्ही?

दरबारी- त्याची तुम्ही नका फिकीर करू. इतर ठिकाणांहून व्यापारी देतील आणून.

शेतकरी- तुमचे ठीक आहे हो. पण आमचे काय? आमच्या जवळ कुठला असणार त्यांच्याकडून धान्य विकत घ्यायला पैका? ते काही नाही आम्हाला भेटायचेय महाराजांना.

महाराज- काय गलका आहे रे तिकडे?

दरबारी- महाराज, हे शेतकरी आलेत चोराचिलटांचा, रानडुक्करे, पिसाळलेले हत्तींचा बंदोबस्त करा असा कालवा करीत. आपल्याजवळ कुठेत इतके पोलिस? आहेत त्यांना २४ तास काम करावे लागते.

महाराज- अरे प्रत्येकाला कसा काय पोलिस द्यायचा?

शेतकरी- महाराज, आम्ही कुठे मागतोय तसे? अहो दरवडेखोर , रानडुकरे, पिसाळलेले हत्ती आणि काय काय येत नाहीत आमच्या पिकांचा सत्त्यानाश करायला ?

महाराज- मग आम्ही काय करावं म्हणता?

शेतकरी- महाराज, आम्हाला थोडे सशस्त्र करा म्हणजे आम्हीच त्यांना पिटाळून लावू वा ठार मारू.

दरबारी- छे छे! महाराज, असे केले तर यांच्यात आणि पोलिसात काय फरक? आणि चोरांना मारण्याची मुभा यांना दिली तर त्या आंतरराष्ट्रीय ह्युमन राईट्सवाल्यात व पोलिसांत अस्वस्थता नाही का येणार?

शेतकरी- बंदुका नाही देणार, तर निदान दंडुक्यांनी मारण्याची मुभा तरी द्या आम्हाला.

दरबारी- रानडुक्करे, पिसाळलेले हत्ती मारले तर ते आंतरराष्ट्रीय प्राणीदयावाले तुटून पडतील आपल्यावर. महाराज, शेतकऱ्यांचा प्रश्न स्थानिक आहे. नुसते दंडुके दिले तरी प्रश्न आंतरराष्ट्रीय होईल.

महाराज- राज्यात हा प्रश्न यांनाच का? व्यापारी, शिक्षक, विद्यार्थी, लेखक, पत्रकार आणि इतर अनेक धंदे करणाऱ्यांना हा प्रश्न नाहीना?

दरबारी- नाही.

महाराज (शेतकर्‍यांना उद्देशून) - अरे, मग गाढवांनो, याला तुम्हीच जबाबदार आहात. तेव्हा चोर, दरवडेखोर, रानडुकरे, पिसाळलेले हत्ती येणारच नाहीत अशीच पिके का नाही लावत तुम्ही?

शेतकरी- महाराज, कांहीही लावले तरी कोणीना कोणी पिकाचा विध्वंस करणारच. विध्वंस करणे हाच तर त्यांचा स्वभाव. कांहीच लावले नाही तरी जमिनी हडप करायला झोपडी-माफिया येणारच; आणि शेती केली नाही तर आम्ही जगायचे कसे?

महाराज- हे पहा. तुमचे असले किरकोळ प्रश्न सोडवायला वेळ कुणाला आहे? तुम्हा शेतकर्‍यांचीच काळजी घेत बसलो तर लोक मला पक्षपाती नाही का म्हणणार?

माझा अपरिवर्तनीय असा आता आदेश आहे की :
(१) सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या जमीनीत शेतीशिवाय अन्य व्यवसाय लगेच सुरू करावेत. या राज्यात कटकटी निर्माण करणारा ’शेतकरी’ हा वर्गच या घटके पासून आम्हाला नको आहे.
(२) जे शेतकरी आदेश पाळणार नाहीत त्यांना राज्याबाहेर हाकलून देण्यात येईल.
त्यांच्या जमिनी भरपाई न देता सरकारजमा करून घेतल्या जातील.

दुसऱ्या दिवशीची परिस्थिती :

सर्व उभी पिके दरवडेखोरांनी लुटून नेली कारण राज्यात ’मी शेतकरी आहे आणि हे माझे पीक आहे’ असे म्हणणे हाच गुन्हा होता. सगळे एकेकाळचे शेतकरी आता आपली नवी ओळख काय सांगावी या विवंचनेत पडले. कांही शेतकऱ्यांनी हा आदेश धुडकावला, त्यांना होत्याचे नव्हते केले गेले.
आता त्या राज्यात भजनी मंडळे, गायक, बारमाही वारकरी, पानपट्टीवाले, चहाटपरीवाले, हमाली करणारे, तथाकथित समाजसेवक, खाद्यपदार्थ शिकवणारे आणि करून देणारे आचारी , फोटोग्राफर, बेफिकीर लोकं अशा राजाला त्रास न देणार्‍या व्यावसायिकांची संख्या एकदम वाढली आहे. शेतकरी वर्गच हद्दपार झाला आहे.
आणि त्यामुळे आता सारे कसे शांत शांत आहे त्या संस्थान ड्युआयडीत ! अशी ही साठा उत्तराची कहाणी.

Group content visibility: 
Private - accessible only to group members

@आनन्दा
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. या रूपकाचे आणखी एक अंग मला अभिप्रेत होते.

ड्युआयडी संस्थानातील घडामोडींवर नजर (१)
शेतीव्यवसायावर संपूर्ण बंदी घालण्याच्या ड्युआयडी संस्थानातील प्रयोगाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे.
शेती शिवाय देश चालू शकतो कि नाही हे या प्रयोगावरून समजून येणार आहे. बंदी घातल्यानंतर ठळकपणे जे बदल जाणवले त्याची येथे नोन्द करतो आहे.
(अ) दरबारातील प्रतिष्ठितांमध्ये आपणही असावे अशी इच्छा असणाऱ्यांची संख्या प्रचंड वेगाने वाढायला लागली आहे. त्यामुळे शेतीवर बंदी आणल्याबद्दल राजावर प्रशंसेचा वर्षाव होतो आहे. जे लोक बंदी उठवण्याची विनंति करतात त्यांच्यावर लोक तुटून पडताहेत.
(ब) एके काळी मोगल दरबारात शेरशायरीवाल्यांना व दुसऱ्या बाजीरावाच्या काळात लावणीकारांना जशी हेवा वाटावा अशी प्रतिष्ठा मिळायची तशी ड्युआयडी संस्थानात गझलकारांना मिळायला लागल्याची वार्ता सर्वदूर पसरली आहे.
बिनभांडवली आणि ऐशोआरामाचा धंदा असल्याने गजलकारांचे अमाप पीक ड्युआयडी संस्थानात आले आहे. कांहीजण दरबाराचा मार्ग गझलेतून जातो असा दृढ विश्वास बाळगून आहेत. कवितांची गंगा(?) देखील पूररेषेचे नवेनवे विक्रम करीत आहे.
(क) ड्युआयडी संस्थानातील कांही गावातून राजेसाहेबांनीच गप्पाटप्पांचे अड्डे का काढले असा मला प्रश्न पडला होता. शेतीबंदी केल्यापासून तर ’गाव तिथे गप्पाटप्पा’ असा नवा धडक कार्यक्रमच राजेसाहेबांनी सुरु केला असल्याचे समजले. शेतकऱ्यांना गप्पाटप्पांमध्ये गुंतवून ठेवण्याचा यामागे उद्देश आहे असे समजते. शोध घेतल्यानंतर कळलेली बाब धक्कादायकच. दरबारात वजन असल्याचा टेंभा मिरवणाऱ्या एका बड्या शेतकऱ्याने हौसेखातर गप्पाटप्पांचा एक अड्डा सुरु केला होता. तो बहुदा लोकप्रीय झाला असावा. त्या शेतकऱ्याच्या विरोधातील दरबाऱ्यांनी मोठ्या चातुर्याने अशा अड्ड्यांचे महत्व राजेसाहेबांच्या गळी उतरविले आणि महत्वाच्या गावांना हे अड्डे सुरू करायला लावले. या अड्ड्यातून दरबा़ऱ्यांचे हेर वावरत असतात असे बोलले जाते.
आता शेतीच बंद म्हटल्यावर तो बडा शेतकरी काय करतोय कुणास ठाऊक. तोच राजाच्या मर्जीतून उतरल्याचे कळल्यावर त्याच्या अड्ड्यावरची गर्दी रोडावली म्हणे.

@बघतोस काय मुजरा कर | 28 July, 2012 - 09:02
>> बडा शेतकरी सध्या मिसळ खातोय.. <<
इतकी नेमकी माहिती ज्याअर्थी आपणास आहे त्याअर्थी ते 'मिसळ' खात असतांना तुम्ही 'पाव' खात असणार हे नक्की.

ड्युआयडी संस्थानातील घडामोडींवर नजर (२)
(१)शेतीव्यवसायावर संपूर्ण बंदी घालण्याच्या ड्युआयडी संस्थानातील प्रयोगामुळे ज्या शेतकर्‍यांच्या जिम्नी पडिक आहेत तिथे बाभलि आणि बोरि वाढायला लागल्याने त्यांचा कोवला पाला खाताना चक्क एक 'शेळी'
आढळली. जिथे रानदुकरे व पिसाळलेले हत्ति शेतकर्‍यांना 'दे माय धरणि ठाय करायचे ' तिथे महात्माजींना प्रीय असलेली शेळी पाहून अनेक ड्युआयडीकरांना भडभडून आले. आता बोकडांची पैदास वाढणार असे वाटून अनेकांनी शेळीचि पूजा केली.
(२) दुसरा व्यवसाय जमण्यासारखा नसल्याने काम्ही शेतकर्‍यांनि देसांतर तर कांहींनि धर्मांतर केल्याचे कळते.

दासुजी

आपण एक ज्येष्ठ व्यक्ती आहात. आपल्यावर कारवाई व्हावी हे मला देखील रुचलेलं नाही. पण प्रशासनाला अप्रिय निर्णय घेण्यासारखं काही घडलेलं असणार. त्या बाफवर काय झालं हे कळण्यास मार्ग नाही. संबंधित सर्वांना ते माहीत असणार.

त्या बाफवरचे अनेक जण पुन्हा या ना त्या स्वरूपात पुन्हा आलेले दिसताहेत. प्रशासनाने लगेचच त्यांचे आयडी ब्लॉक केलेले नाहीत. यावरून त्यांचा व्यक्तींवर रोष आहे असं दिसत नाही. ज्या कारणावरून कारवाई झाली असं वाटतंय ती कारणे पुन्हा उद्भवू नयेत आणि आपल्याबरोबर इतरही काही आयडीज ब्लॉक होऊ नयेत असं आपल्याला नक्कीच वाटत असणार. आपणास शुभेच्छा !

(१)शेतीव्यवसायावर संपूर्ण बंदी घालण्याच्या मायबोली संस्थानातील प्रयोगामुळे ज्या शेतकर्‍यांच्या जिम्नी पडिक आहेत तिथे बाभलि आणि बोरि वाढायला लागल्याने त्यांचा कोवला पाला खाताना चक्क एक 'शेळी'

जमीन शेतकर्‍यांची नाही, मायबोली संस्थानची आहे. तिथे शेळी चरेल नाही तर ह त्ती फिरेल... तुम्हाला हवे तसे तुम्ही फिरा.. अन्नछत्री जेवणे आणि मिरपूड मागणे, या म्हणीचा अर्थ ठाउक आहे का?

जमीन शेतकर्‍यांची नाही, मायबोली संस्थानची आहे. तिथे शेळी चरेल नाही तर ह त्ती फिरेल... तुम्हाला हवे तसे तुम्ही फिरा.. अन्नछत्री जेवणे आणि मिरपूड मागणे, या म्हणीचा अर्थ ठाउक आहे का?
<<<

Rofl

शेळी | 5 August, 2012 - 12:22
बें बें बें ...... शेळी आली<<<

Rofl

पीडित व पिडणारा एकाच मापाने मोजण्याच्या अजब तंत्रामुळे

पीडीत कोण आणि पिडनारा कोण???? हे तुम्ही ठरवणार का?

@Kiran.. | 5 August, 2012 - 10:51
>> दासुजी <<

'दासुजी' असे का सम्बोधले आहे ते कळले नाही. त्याचा अर्थ कळेल का?

>>आपण एक ज्येष्ठ व्यक्ती आहात. आपल्यावर कारवाई व्हावी हे मला देखील रुचलेलं नाही. <<

आपला कांहीतरी गैरसमज झाला असावा. का ते कळेल का?

>>पण प्रशासनाला अप्रिय निर्णय घेण्यासारखं काही घडलेलं असणार. त्या बाफवर काय झालं हे कळण्यास मार्ग नाही. संबंधित सर्वांना ते माहीत असणार.<<

मध्यंतरी अचानक काही जनांना माबोवरुन काढून दिले त्याबद्दल बहुदा आपण हे लिहिले असावे. मी वर्षभर नुसता वाचक होतो. अनेक लेखांवरील प्रतिसादातील भाषेमुळे असे झाले असावे असे वाटते.
माझ्या सुमारे वर्षभराच्या वाचनाच्या आधारेच हे रूपक लिहिलेले आहे.

>>प्रशासनाने लगेचच त्यांचे आयडी ब्लॉक केलेले नाहीत. यावरून त्यांचा व्यक्तींवर रोष आहे असं दिसत नाही. <<

आय्डींना विपु करायचा असेल तर ब्लॉक केल्याचा मेसेज येतो. पन कांहिंचे लेखन मात्र दिसते आहे त्यावरुन
' त्यांचा व्यक्तिंवर रोष आहे असे दिसत नाही ' याशी सहमत.

>> ज्या कारणावरून कारवाई झाली असं वाटतंय ती कारणे पुन्हा उद्भवू नयेत आणि आपल्याबरोबर इतरही काही आयडीज ब्लॉक होऊ नयेत असं आपल्याला नक्कीच वाटत असणार. <<

पूर्ण सहमत.
पन माझ्याकडून असे कांही घडते आहे असे वाटते आहे का?
कि हे रूपकच तसे आहे असे वाटते? हे रूपकच तसे आहे असे वाटत असेल तर मात्र माझा नाईलाज आहे. एक त्रयस्थ म्हणून मला जे वाटले ते लिहिले. मी तर काय अगदि नवीन आहे. मला मायबोलिवर कसलिच प्रतिष्ठा नाही. असलो काय नि नसलो काय. जिथे मायबोलीवर बर्‍यापैकि लेखन केलेले उडाले तेथे मी किस झाड कि पत्ती?

आपण व्यक्त केलेल्या शुभेच्छाम्बद्दल मनापासून आभार मानतो.

पन कांहिंचे लेखन मात्र दिसते आहे त्यावरुन
' त्यांचा व्यक्तिंवर रोष आहे असे दिसत नाही ' याशी सहमत.

व्यक्तीवर रोस्श असेल तर आय डी उडतो. लेख तसेच रहातात. त्याचा अर्थ व्यक्ती निर्दोष आहे असा होत नाही.

@Kiran.. | 5 August, 2012 - 11:36 नवीन
>>दासुजी
असे संबोधण्याचे कारण ..
दा = दादा
सु = सुविचारी व्यक्ती
<<

'सुविचारी व्यक्ती' होण्याचे ध्येय बाळगा हा आपला संदेश पोचला. संदेश देण्याचि पद्धतहि आवडलि.
सुधारन्याचा प्रयत्न करीन.
आभारि आहे.

छान

शेळी | 5 August, 2012 - 11:17
>>पीडित व पिडणारा एकाच मापाने मोजण्याच्या अजब तंत्रामुळे ..<<

पीडीत कोण आणि पिडनारा कोण???? हे तुम्ही ठरवणार का?

@शेळीताई
मग तुम्ही ठरवा की.
समजा मी पिडणारा आणी तुम्ही पीडित असे धरून चालू.
तरीही ' पीडित व पिडणारा एकाच मापाने मोजण्याचे तंत्र ' अजबच नाही का?

नव्या जमान्याला साजेसे संस्थानाचे पुन्हा एकदा 'ड्युआयडी' असे नामकरण केले आहे. यामुळे 'मायबोली' शब्दाच्या जागी 'ड्युआयडी' वाचावे.
आभारि आहे.
- मी-भास्कर

दासु उर्फ भास्कर, स्वतःच्याच प्रतिसादात उगाचच एक दोन अक्षरांचा बदल कशाला करत बसलाय?

अक्षरे गाळी वा पदरची घाली, तो एक मूर्ख .. दासबोध

चलाख लोक नव्या बाटलीत जुनेच द्रव्य भरून नवे म्हणून विकतात.
अतिचलाख लोक फक्त बाटलीचे बूच बदलून सगळेच नवे आहे असे सांगून विकतात.

@भरत मयेकर | 6 August, 2012 - 16:16
चलाख लोक नव्या बाटलीत जुनेच द्रव्य भरून नवे म्हणून विकतात.
अतिचलाख लोक फक्त बाटलीचे बूच बदलून सगळेच नवे आहे असे सांगून विकतात.<<

चलाख आणि अतिचलाखांचे महामेरू कोठलीच द्रव्यनिर्मिति करण्याचे कष्ट करीत नाहीत. ते दुसर्‍यांनी भरलेल्या बाटल्यात काय भरलेले आहे हे पाहान्याचे कष्टही घेत नाहीत. फक्त बाटल्या व त्यांचि बुचे पाहातात व खरडतात. यांचे अवतारकार्य एवढेच!

शेळी,

>>अन्नछत्री जेवणे आणि मिरपूड मागणे, या म्हणीचा अर्थ ठाउक आहे का?

अन्न पिकवणे म्हणजे काय ते माहिती आहे का हो तुम्हाला? नावावरून तसं वाटंत नाही म्हणून विचारलं.

आ.न.,
-गा.पै.

अ‍ॅडमिनने आय डी ब्लॉक करण्याची शिक्षा दिलेली आहे. त्यात काही बदल करता येतील.

सध्या मायबोलीचे विविध विभाग आहेतच.. जसे गुलमोहर, पाक, खेळ्,इतिहास वगैरे वगैरे... जेंव्हा आय डी विकृत लिहितो, तेंव्हा त्याला त्या विभागात प्रतिसाद देता येणार नाही, अशी शिक्षा द्यावी. इतर विभागात त्याची हालचाल तशीच ठेवावी.

आय डी बंद करणे ही फासावर चढवणे असा प्रकार आहे... विभाग बंद करणे हे गुंडाला तडीपार करणे यासारखे आहे. तरी अ‍ॅडमिनने आपल्या धोरणात असे बदल करावेत.

गामापैलवान | 7 August, 2012 - 13:04 नवीन
शेळी,

>>अन्नछत्री जेवणे आणि मिरपूड मागणे, या म्हणीचा अर्थ ठाउक आहे का?

अन्न पिकवणे म्हणजे काय ते माहिती आहे का हो तुम्हाला? नावावरून तसं वाटंत नाही म्हणून विचारलं.

आ.न.,
-गा.पै.<<<

Rofl

कु.गी.ग.

>> स्वतःच्याच प्रतिसादात उगाचच एक दोन अक्षरांचा बदल कशाला करत बसलाय?
>> अक्षरे गाळी वा पदरची घाली, तो एक मूर्ख .. दासबोध

स्वत:च्याच लेखनात पदराची अक्षरे घातली किंवा वगळली तर ते मूर्खाचे लक्षण होत नाही.

वाचकहो ओळखा पाहू : इथे वडाची साल पिंपळाला हेतुपुरस्सर लावलीये की विशिष्ट शिक्षणप्रणालीचे प्रमाणाबाहेर सेवन केल्याने नीरक्षीरविवेक लोप पावलाय ते.

आ.न.,
-गा.पै.

यात हसण्यासारखे काय आहे? Sad नावात काय आहे, असे टॉलस्टॉय म्हणून गेलेत.

( ते वाक्य शेक्सपीअरचे आहे, असे सांगून चूक काढू नये... एकदा नावात काय आहे असे म्हटल्यावर तिथे मनमोहन सिंग लिहिले तरी चालते, नै का? Proud )

Pages