गद्यलेखन

गुलमोहर - कथा/कादंबरी

Submitted by admin on 1 August, 2012 - 00:52
गुलमोहर - मराठी कथा/कादंबरी
मराठी कथा, मराठी गोष्टी, मराठी कादंबरी, प्रेम कथा, रहस्य कथा, गुढ कथा

marathi Katha, marathi Kadambari , marathi story , marathi Stories , marathi goshti, prem katha, rahasya katha, gudh katha,

हा ग्रूप सुरु होण्याअगोदर
गुलमोहर मराठी कथा
गुलमोहर मराठी कादंबरी

गुढकथा -७.४० कर्जत फास्ट

Submitted by मुरारी on 31 July, 2012 - 13:26

भे** , साला हरामखोर स्वत : गाडी घेऊन येतो, त्याला काय माहित.. इथे १५ मिनिट जरी उशीर झाला तरी घरी पोचायला २ तासाचा फरक पडतो.. " तो वैतागत बडबडतो ..
हो न यार साला किती ट्राफिक ... आणि हा पाऊस.. त्यात आज ट्रेन पण लेट.. त्याचा मित्र .
साला सगळे भिकारचोट.. रेल्वे वाले तर त्याहून हरामखोर.. "@#@##$.." "मा#$%%.." त्याचा स्वतावरचा ताबा सुटत चाललेला असतो .
अरे काय घाणेरडी लाइफ आहे साली, दिवस भर आपल प्रवासच करत राहा. मुंबईतल्या मुंबईत .. आज हे बिघडल , उद्या सिग्नल तुटला , परवा गाडीच ठोकली .. अरे काय चाललंय काय.. तो बेभान होत असतो . .आजूबाजूचे हसत असतात .. त्याला त्याची पर्वा नसते ..

मी द्यूआय्दी बोल्तोय!

Submitted by बागेश्री on 31 July, 2012 - 07:46

नमस्कार जन्ता जनार्दन,
मी द्यूआय्दी बोल्तोय!
आता माजा वापर असे खोते आनि असुद्द मराथी लिहायला होतो म्हनून, असेच मनोगत वाचावे लागेल तुमाला. त्यात मी गावाकदचा द्यूआय, मंग काय 'पूजेला पावलं अन आयतच घावलं'.. बरं उगा येळ खात नै मी!

तर काय सांगत हुतो,
हा त्येचं बगा असं जालं,
येका प्रतिस्थित खर्या आयदीचा द्यूआय काल धापा टाकत माज्यापाशी आला... आम्हा सगल्या द्यूआयद्यांच लई छान जमतं, उगा कुचाळक्या करून आदनावावरून आमी कुनाचाबी पानुतारा करत नाई.
हा तर सांगत होतो,
त्यो पलत आला, मी उगी पडलो होतो आकाशाकदे बगत, हा आला,

मी मनलं, "साप चावला की कुनी खरा आयदी तुजा पासवर्द विसरला??"

उत्क्रांत

Submitted by अमृतवल्ली on 31 July, 2012 - 05:25

गोव्यातल्या कलंगुट बीचवर आले आणि मनात हाSS गोंधळ. इतक्या गर्दीच्या ठिकाणी एकदम कसे आलो आपण..काही कळेचना. सगळीकडे माणसेच माणसे..त्यांचे लहाने,मोठे घोळके, ट्राफिक, गाड्यांचे भोंगे, कचऱ्याचे ढीग, दुकानातली गर्दी, त्यात परत सोबतच्या मैत्रिणीचे “इथे वळ... पुढच्या चौकात राईट .. पार्किंग कडे बघ... अर्रर्र चुकला नं टर्न!!” गाडी जरा थांबली कि.. “ कित्याक जायचो? फोटो काढायचा का? पन्नास रुपयाला दोन... bedded plates चाहिये क्या?” एकदम लक्ष्यात येईना कुठे चाललो आपण? किती दिवस गेले मध्ये? ही सगळी माणसे कोण आहेत?

शब्दखुणा: 

अण्णा, जिंकण्यासाठी लढताय कि..[१]

Submitted by मी-भास्कर on 31 July, 2012 - 03:36

अण्णा, जिंकण्यासाठी लढताय कि..[१]

राजकारणात उतरल्यावर तर कुस्ती अशा विविध १०० अगडबंब सुमोंशी आहे हे नक्की.
Anna and corruption.jpg

आदरणीय अण्णा,
सादर दंडवत.
एक समर्थक या नात्याने हे पत्र.

बोम दिया अंगोला - भाग ३ (निसर्ग)

Submitted by दिनेश. on 30 July, 2012 - 09:36

निसर्गाबद्दल लिहायचे म्हणून जरा निवांतपणे लिहायला घेतलेय आणि तसा निसर्गाला पण
भिडायला मुरायला वेळ द्यायला हवा ना !

मी इथे आलो तो दिवस दक्षिण गोलार्धातला सर्वात लहान दिवस होता, त्यामूळे सूर्य लवकरच
मावळला आणि एक देखणा सूर्यास्त बघायला मिळाला. वाळवंटातील सूर्यास्त हि एक खास
पर्वणी असते. इथली वाळू, अगदी मुलायम असल्याने दिवसभर आसमंतात उडत असते, आणि
संध्याकाळच्या वेळी ती आभाळात अनोखे रंग भरते. अबोली रंगाच्या वाळूमूळे, आभाळही
निळसर किरमीजी रंगाचे दिसले, सूर्याचे बिंब जरा जास्तच केशरी दिसू लागले, दुसऱ्या दिवशीचा
सूर्योदय पण तसाच देखणा होता.

शब्दखुणा: 

तुम मुझे युं भुला ना पाओगे....

Submitted by दक्षिणा on 30 July, 2012 - 08:36

Rafi1.jpg

'मोहम्मद रफी' हे वादळ आहे वादळ... किंबहूना एक खूळ आहे... जे एकदा डोक्यात शिरलं तर आयुष्यभर बाहेर निघणार नाही. नाहीतर मी लहान असताना इहलोकीची यात्रा संपवलेला हा गायक माझ्या अत्यंत आवडीचा का असावा? खरतर हा प्रश्न मी स्वत:ला अनेकदा विचारला. पण नेमकं उत्तर नाही सापडलं. तसे बरेच धागेदोरे मात्र हाती लागले आणि हळू हळू उलगडलं की त्याची गायनशैली ही अत्यंत भूरळ पाडणारी आहे. वेड लावणारी आहे. धुंद करणारी आहे. स्वतःमधला 'स्व' विसरायला लावणारी आहे.

युनिवर्सल स्टुडियो-सिंगापुर (प्रचि व माहिती)

Submitted by यशस्विनी on 30 July, 2012 - 03:05

सिंगापुरातील सेंटोसा या बेटावर "युनिवर्सल स्टुडियो" बनवला गेला आहे. या थीम पार्कच्या बांधकामाची सुरूवात १९ एप्रिल २००८ मध्ये झाली व औपचारीक उद्घाटन सोहळा २८ मे २०११ रोजी झाला. तेव्हापासुन "युनिवर्सल स्टुडियो" हा सिंगापुरातील महत्वाचे पर्यटन स्थळ बनला आहे. "युनिवर्सल स्टुडियो थीम पार्क" हा आशियात बनवला गेलेला दुसरा थीम पार्क आहे, प्रथम बनवला गेल्याचा मान "जपान" या देशाकडे आहे.

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन