गद्यलेखन

गार्गी - जून्या मायबोलीवरुन

Submitted by दिनेश. on 30 August, 2012 - 00:38

जून्या गुलमोहोरवर हि कथा, साडेसहा वर्षंपुर्वी लिहिली होती. बी ला हवी होती म्हणून माझ्याकडे शोधली तर शिवाजी फाँन्ट्मधे सापडली, ती परत लिहिताना, मायबोलीचाच उपयोग केला, म्हणून इथे,
परत पोस्ट करतोय.
हि दंतकथा मी एका वेगळ्याच संदर्भात वाचली. तशी ती फ़क्त चार ओळींचीच होती. पण मला यातला गार्गीचा युक्तिवाद मह्त्वाचा वाटला. खरे तर मला तो द्रौपदीच्या, सा सभा ... या युक्तिवादापेक्षाहि श्रेष्ठ वाटला.
वेद हे अपौरुषेय मानले जातात. त्यामुळे ते कोणी रचले हे कुठेच नमुद केलेले नाही. पण ईतक्या सगळ्या ॠषिंमधे विदुषी म्हणुन गार्गी व मैत्रेयी हि दोनच नावे मला आढळतात.

शब्दखुणा: 

विषय क्रमांक १ - पिरतिचा उघडला 'पिंजरा' तुमच्यापायी

Submitted by सस्मित on 29 August, 2012 - 09:18

पहाट नुकतीच फुटतेय. दोन बैलगाड्या, गावची वाट आणि गाडीवान गातो....
गंsssssssssssss साजणे
कुन्न्या गावाची कंच्या नावाची
कुन्न्या राजाची तु ग रानी
आली ठुमकत नार लचकत
मान मुरडत हिरव्या रानी
अह्हा काय ठेका गाण्याचा. गाणं ओळ्खीचच नव्हे तर आवडतं. अरे गाडीवान कोण? निळु फुले!!
खटार्‍याला पडदा. आत कोण ते एक कुतुहल. लगेच नामावली सुरु होते- व्ही शांताराम प्रस्तुत - पिंजरा !!!
कलाकार - संध्या - डॉ. श्रीराम लागु
बस्स. आजची दुपार सार्थकी लागणार हे कळुन चुकलं मला.

पानगळ

Submitted by दाद on 28 August, 2012 - 21:08

"आई गंss... आईss..."
बाबाच्या खोलीतून आवाज आला तशी निमा हातातलं ठेऊन चटकन उठली. तिनं आरशात बघून कुंकू ठीक केलं आणि खोलीच्या दारात येऊन उभी राहिली.

कमरेला एका हाताचा आधार देत बाबा पाय उंच करून शेल्फच्या वरच्या फळीवरलं पुस्तक काढण्याच्या प्रयत्नात होता. तिची चाहूल लागताच वळला. तिला भेटण्याच्या अगदी क्षण आधी बाबाची नजर रिकामी झालेली तिला जाणवली.
आणि निमाला वाटलं, देवा... आपल्या पायातलं बळ जाणार आता... बाबा आपल्याला ह्या वेषातही विसरतोय...
तोच, चष्म्याच्या आडून डोळे मिचकावत बघण्याच्या त्याच्या नेहमीच्या सवयीने तिच्याकडे बघतानाच बाबाच्या नजरेत ओळख आली.

शब्दखुणा: 

विषय क्र. १ येशुदास

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 28 August, 2012 - 05:22

दिल के टुकडे टुकडे करते .... हे गाण एकताना किंवा मग चांद जैसे मुखडे पे बिंदीया से तारा एकताना आवाज जरी थोडा घोगरा असला तरी मन वेगळाच ठेका घेते. आणि मग उलगड्त जातात त्या येशुदास या स्वर्गीय गंधर्व म्हणुन नावाजलेल्या गायकाच्या आठवणी.कट्टासेरी जोसेफ येशुदास, जन्माने ख्रिश्चन. भारतिय वेगवेगळ्या भाषात गायन केलेला हा गायक जाने. १९४० ला जन्माला आल्या नंतर वडिलांच्या शास्त्रीय संगीताचा वारसा चालवत चालवत बॉलीवुड मधे दाखल झाले . संगीतात स्नातक उपाधी प्राप्त केल्या नंतर श्रीनीवास अय्यर यांचेकडे प्रशिक्षण घेतले . सर्वच धर्माच्या सोहळ्यात ते आनंदाने आपली कला सादर करीत असत.

शब्दखुणा: 

विषय क्र. १: चित्रपटातले माझे आवडते प्रसंग

Submitted by स्वप्ना_राज on 28 August, 2012 - 03:23

वेळ रात्रीची. तो आणि ती. पण दोघं ऐन नव्हाळीतले नाहीत. तो पोक्त दिसणारा आणि तिच्याही केसात रुपेरी बटा. खूप जुनी ओळख पण खर्‍या प्रेमाच्या नशिबात असलेल्या वर्षांच्या ताटातुटीने पार पुसून टाकलेली. कदाचित ते परत कधी भेटलेही नसते पण क्रूर विनोद करायची नियतीची सवय जाते कुठे? ती आता पूर्वीची अवखळ तरुणी राहिलेली नाही तर एक लोकप्रिय नेता आहे. तो एका हॉटेलचा मॅनेजर. खोलीच्या सजावटीवरून आपल्याला ओळखणारं इथं कोणीतरी आहे हे तिच्या लक्षात येतं. आणि त्यांची परत भेट होते. हा प्रसंग कुठल्याही बागेत, रम्य तळ्याकाठी किंवा समुद्रकिनारी घडत नाही. भोवती असतात कुठल्याश्या उध्वस्त नगरीचे भग्न अवशेष.

निखळ करमणुकीचा धंदा करणारा -उमदा ‘दादा’- शाहीर दादा कोंडके

Submitted by किंकर on 26 August, 2012 - 23:01

गाथाचित्रशती लेखनस्पर्धेसाठी –
१.माझी आवड / आठवण –
निखळ करमणुकीचा धंदा करणारा -उमदा ‘दादा’- शाहीर दादा कोंडके
टवाळां आवडे विनोद । उन्मत्तास नाना छंद । तामसास अप्रमाद । गोड वाटे ॥
समर्थ रामदास म्हणतात - थट्टेखोर माणसास विनोद आवडतो,अंगात माज आलेल्या माणसास नाना व्यसने आवडतात,तर तामसी माणसास दुष्कर्म करणेच गोड वाटते.

वासंती भाटकर आणि स्त्री-मुक्ती

Submitted by ज्योति_कामत on 25 August, 2012 - 12:21

बर्‍याच वर्षांपूर्वीची हकीकत आहे. तेव्हा मी प्राथमिक शाळेत जात होते आणि रत्नागिरीजवळच्या बसणी नावाच्या एका खेड्यात रहात होते. हे इतकं लहान खेडेगाव होतं, की रत्नागिरी फक्त ५ मैलांवर असून तिथे जायला थेट रस्ता नव्हता. मधे साखरतरची खूप मोठी खाडी होती. रत्नागिरीला जायचं तर आधी बैलगाडीने तरीपर्यंत जायचं, मग तरीने खाडी ओलांडायची आणि मग बस मिळायची. गावात दुपारी १२ वाजता वगैरे पेपर यायचा. म्हणजे महाराष्ट्र टाईम्स. सगळ्यात मोठी करमणूक म्हणजे रेडिओवरची खरखरत्या आवाजातली सुशील दोशीची कॉमेंट्री नाहीतर सिलोन रेडिओवरची बिनाका. त्यासाठी आम्ही बुधवार रात्रीची वाट बघायचो.

विषय क्र. १ - ’भूलभुलैय्या’

Submitted by स्वप्ना_राज on 25 August, 2012 - 11:46

आमी मोन्जोलीका.....आमी तोमार रोक्ता पान करबो. एय राजा चोलबे ना.

घाबरू नका, घाबरु नका. मला कुठल्याही बंगाली हडळीने झपाटलेलं नाहीये. पण माझ्या आवडीच्या चित्रपटाबद्दल लिहायचं तर अशी ड्रॅमेटिक सुरुवात करणं गरजेचं होतं.

शब्दखुणा: 

ईशान्य उपनिषद – जगण्याचा मार्ग.

Submitted by विवेक पटाईत on 24 August, 2012 - 10:00

.

ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते.
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
(शांतीपाठ)

ईशा वास्यमिद्ँसर्व यत् किंच जागत्यां जगत.
तेन त्यक्तेन भुन्चीथा मा गृध: कस्य स्विद् धनम्.

कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छत्ँसमाः.
एवं त्वयि नान्यथेतोऽस्तिण कर्म लिप्यते नरे.
[ईशोपानिषद (मंत्र १ & २)]

दिवाली अन्कात लेखन

Submitted by स्वेता२५ on 21 August, 2012 - 14:04

दिवालि अन्कात लेख कसा पाथवावा या विशई माहिति हवि आहे.मला ज्योतिश विशयावर लेख पाथवायचा आहे, सध्या भारतात मि नाहि त्यामुले मदत हवि आहे....

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन