गद्यलेखन

रणांगण

Submitted by हर्षल_चव्हाण on 23 October, 2012 - 08:07

--------------तारवटलेल्या डोळ्यांनी कृष्णा उठला. उठल्या-उठल्या; स्लीप मोडमध्ये असलेल्या लॅपटॉपला त्याने जागवले. काल रात्री ज्या मुलीच्या प्रोफाईल पेजवर होता, तिचा चेहेरा पाहून दिवसाची सुरुवात झाली. खरंतर, सुरूवात म्हणजे काही विशेष काम असं नव्हतंच. मुरली मनोहर काही करो अथवा न करो, सार्‍या जगाची चिंता तो मनोमन करून सर्व चिंतांचे हरण करतोच, अशी नागरीकांची श्रद्धा होती. त्या श्रद्धेमुळे कृष्णाची मात्र पंचाईत झाली होती. नको त्या वयात; नको तो पराक्रम करून बसल्यामुळे योग्य त्या वयात; योग्य ते करतांना लोकापवादाची सारखी भिती बाळगत त्याला आता जगावं लागत होतं.

शब्दखुणा: 

नसीब का सिक्का

Submitted by कविन on 22 October, 2012 - 03:31

पळणार्‍या घड्याळ्याच्या काट्याशी स्पर्धा करत आवरुन बाहेर पडायचं, ठरलेल्या वर्तमान पत्र वाल्या कडून ठरलेलं वर्तमान पत्र घ्यायचं. १० ची नोट द्यायची नि त्याने ७ रुपये परत केले की ते बसच्या तिकिटासाठीच्या कप्प्यात सरकवून बसच्या सुट्यांची सोयही अशी परस्पर करायची... हे ही नेहमी सारखेच

तो दिवसही त्याला अपवाद नव्हता. वर्तमान पत्र घेतलं, बॅगेत ठेवलं आणि लोकल पकडायला पुन्हा एकदा पायांना घड्याळा बरोबर पळवलं.

ऑक्सफर्डचा फेरफटका

Submitted by चिमण on 18 October, 2012 - 14:29

जगातल्या अग्रेसर विद्यापीठांमधे ऑक्सफर्डची गणना होते हे पुण्यातल्या वाहतुकीला शिस्त नाही इतकं सर्वश्रुत आहे. गाढ्या विचारवंतांचा आणि संशोधकांचा सुळसुळाट असलेलं, ८०० वर्षांपेक्षा जुनं, ऑक्सफर्ड विद्यापीठ आत्तापर्यंत ५० च्या वर नोबेल पारितोषिकांचं धनी आहे. जुनी कॉलेजं व जुन्या वास्तू अजूनही टिकून आहेत. नुसत्या टिकूनच नाहीत तर वापरात पण आहेत. याचं एक कारण शासकीय प्रयत्न व अनुदान आणि दुसरं हिटलर! हे कारण एखादं काम न झाल्याचा दोष वक्री शनीला देण्याइतका हास्यास्पद वाटेल पण दुसर्‍या महायुद्धात ऑक्सफर्डवर बाँब टाकायचे नाहीत असा हिटलरचा हुकूम होता.

आपलं शहर

Submitted by Vini on 18 October, 2012 - 10:42

मायबोलीवर लेखनाचा पहिलाच प्रयत्न

खरंतर हे आपलंच शहर असतं,इथले ट्राफिक जॅम,खड्डे ,गर्दी ,छोटे रस्ते,असंख्य वन वे अशा सगळ्या गोष्टीं सहीत! पण या गोष्टी कधीच प्रकर्षाने जाणवल्या नसतात. एकेकाळी अनोळखी असलेल्या या शहरात एन्ट्री केल्यावर पाहता पाहता कधी हे शहर आपलंच होऊन गेलं हे कळलं देखील नसत. इथला पाऊस,इथला हिवाळा ,शॉपिंग करता प्रसिद्ध असलेल्या गल्ल्या ,ऐतिहासिक वाडे ,स्वतःची ओळख जपलेली भाषा , पाट्या ,शहराच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत विखुरलेली संकेतस्थळ,कॉफी पिण्यापासून ते ऑफिस ची पार्टी अरेंज करण्यासाठी भटकलेली हॉटेल्स हे सगळ आपलंच ..

शब्दखुणा: 

शल्य!

Submitted by आर.ए.के. on 15 October, 2012 - 06:20

त्या दिवशी घरात एका महत्वाच्या विषयावर चर्चा चालू होती. माझं अ‍ॅडमिशन! १२ वी चा निकाल नुकताच लागला होता...सी.ई.टी. चा पण निकाल हातात आला होता...पण दोंन्ही परीक्षेत काही खास म्हणावं असं यश मिळालं नव्हतं! तशी १२ वीची कोणतीच परिक्षा मी गांभीर्याने घेतली नव्हती.... उडाणटप्पूपणा पण केला नव्हता किंवा माझं अभ्यासाकड दुर्ल़क्ष वगैरे झालं होतं असही नव्हतं...पण चांगल्या कॉलेजला अ‍ॅड्मिशन मिळवण्यासाठी जोर लावून मी अभ्यास केला नव्हता....माहीत नाही का मला तशी गरजच कधी वाटायची नाही. निकाल लागेपर्यंत मी हे ही ठरवलं नव्हतं की मला १२ वी नंतर काय करायचं आहे?

!!रम्य ते बालपण!!

Submitted by सारंग पात्रुडकर on 14 October, 2012 - 09:26

!!रम्य ते बालपण!!

'रम्य ते बालपण' बर्‍याच जणांकडून ऐकल आहे आणि खुपदा वाचलं आहे...

सणासुदीला घरी आलो कि विचारचक्र भिरभिरत अन् मनाचं कालचक्र उलट फिरायला लागतं, नकळत तुलना चालू होते, लहानपणीची लगबग, उत्साह, हुरूप आठवतो सण- समारंभातला.
मग तो सण गौरी-गणपतीचा असो वा पोळा, नागपंचमी, दिवाळी, संक्रांतीचा.
त्यावेळी दुर्वा-आघाडा निवडताना, तोरणं-माळा बनवताना केलीली कुचराई आठवते अन हसु येतं.

देवाची आरती चालू असताना हमखास येणारा कंटाळा, पोटातल्या भुकेवर मनातल्या बाल-श्रध्देने Happy मात करताना उडालेली तारांबळ;
त्यावेळी सकाळी लवकर उठून आईला केलेली 'मदत' (खरंतर उठलो तीच फार मोठी मदत व्हायची);

शब्दखुणा: 

गर्लफ्रेंड असावी पुणेरी आणि बायको मराठवाड्यातील !!

Submitted by सारंग पात्रुडकर on 14 October, 2012 - 09:17

!!गर्लफ्रेंड असावी पुणेरी आणि बायको मराठवाड्यातील !!

पु. लं. ना स्मरून...
तसा स्फोटक विषय आहे पण ललित गद्य समजून "रस" ग्रहण करावे.
कुठलाही भेदभाव करणे तसे चांगले नाहीच पण इथे मी फक्त स्वभाव वैशिष्टे मांडत आहे.
खरतर स्त्रीस्वभाव विश्वात सगळीकडे सारखा पण फरक लग्न-आधी आणि नंतरचा आहे.

लग्नआधी मुलींचा अपेक्षा खुपदा माफक असतात फार तर कॉफी, सिनेमा अश्या मागण्या.
त्या मागायला पुणेरी मुलगी बिनधास्तपणे
पुढे सरसावते पुणे-इतर मुली पदार्थांचे/तिकिटाचे भाव वैगेरे अश्या गोष्टी मध्ये गुंतून जातात, रोमान्स कशाशी खातो असा काही विचार तेंव्हा डोक्यात तरळतो.

रावसाहेब

Submitted by शाबुत on 13 October, 2012 - 11:39

निर्धार

रावसाहेब जाधव प्लेटफार्मच्या अगदी शेवटच्या टोकाला एका बाकळ्यावर बसला होता. आजुबाजुला कोणीही नव्हतं, एवढ्या लांब दुपारच्या तापत्या उन्हात कोणी येईलच कशाला? त्याच्या अंगावरुन घामाच्या धारा निथळत होत्या, कारण उन्हं अंगाला चटके देत होतं, तरी रावसाहेबाला आता कशाचीही पर्वा वाटत नव्हती.

तो एकटक दुरवर, हरवल्यासारखा पाहत होता. आपल्याच विचाराच्या तंद्रीत त्याला जगाचा विसर पडला होता. समोरच्या रुळावरुन गाड्या जोराचा आवाज करत येत-जात होत्या, त्यानं सारा प्लेटफार्म हलत होता, पण आता रावसाहेबाच्या मनात कसलीही धडधड होत नव्हती.

गेट क्लोजर

Submitted by दाद on 11 October, 2012 - 20:28

गेट क्लोजर...
काय फंडा आहे...

नक्की कशा कशावर कंट्रोल आहे आपला म्हणायचा... म्हणून गेट क्लोजर?
कधीतरी अख्खं आयुष्यच झपाटून टाकणारं, काहीतरी गवसतं.... आयुष्यात आल्याचं कळतं. आपलाच एक भाग बनून जातं. त्याच्याविना आयुष्यं अधुरं, अपुरं वाटेल असं काहीतरी. त्याविना दु:खं अधिक गहिरं अन आनंदही कोमेजलेला असतो. त्याच्या मनातलं हसू आपल्या जिवणीवर झुळझुळतं, त्याची काळजी आपल्या काळजाचं पाणी होऊन भळभळते.... अन तिथं ओघळल्या सरीनं आपलं जग चिंब होतं.

शब्दखुणा: 

काल मला पण असचं झालं होतं!

Submitted by आर.ए.के. on 10 October, 2012 - 04:55

सकाळचे ७:०० वाजले आहेत.
अजून ७:१५ पर्यंत झोपाव असा विचार करुन मी पांघरुण डोक्यावर ओढून पुन्हा झोपी गेले. जेंव्हा जाग आली तेंव्हा घड्याळात ७:४५ झालेले...मी दचकून जागी झाले.. शेजारी तो शांतपणे झोपला आहे. त्याला पाहून मला परत एकदा झोपण्याची इच्छा झाली...पण आत्ता नाही उठले तर पुढे ऑफिसला जायला उशीर होणार...म्हणून मी पलंगाच्या खाली पाय ठेवला..

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन