गद्यलेखन

विद्रोही साहित्य संमेलन आणि आवश्यकता...

Submitted by अ. अ. जोशी on 11 November, 2012 - 08:19

यंदा विद्रोही साहित्य संमेलन बीडमध्ये भरणार आहे असे ऐकले. २२ व २३ डिसेंबर रोजी होणार्‍या ११ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला कोण कोण असेल हा विचार मनात आला. महाराष्ट्रात एवढ्या चांगल्या परंपरा असताना विद्रोही नावाचे साहित्य संमेलन का व्हावे? असा प्रश्न पडला. या साहित्य संमेलनाची बातमी वाचताना सत्यशोधक असाही उल्लेख सापडला. या उल्लेखामुळे, "ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या" असे ठासून सांगणार्‍या आणि अद्वैतवादाचा प्रसार भारतभर करणार्‍या आद्य श्रीशंकराचार्यांची आठवण लगेचच झाली. मात्र, आता हे विद्रोही साहित्यिक त्यांना मानत असतील का? असाही प्रश्न मनात आला.

शब्दखुणा: 

खारीचा वाटा

Submitted by मंदार शिंदे on 9 November, 2012 - 05:43

रामाच्या मंदीरात प्रवचन सुरू होतं. कीर्तनकार बुवा सत्तरी उलटलेले. मोठ्या आत्मीयतेनं आणि रसाळ वाणीत श्रीरामाची कथा सांगत होते. प्रवचन-सप्‍ताहातला आज पाचवा दिवस होता. प्रवचन ऐकायला रोज लोक गर्दी करत होते. मन लावून प्रवचन ऐकायचे, माना डोलवायचे, आणि 'जय श्रीराम' म्हणत जाताना दक्षिणा-पेटीत पैसे टाकायचे. कुणी पन्‍नासची नोट टाकायचे, तर कुणी शंभराची. कुणी कीर्तनकार बुवांसाठी फुलांचा मोठ्ठा हारही घेऊन यायचे. मंदीराशेजारी राहणारी एक म्हातारी प्रवचनाला रोज येत होती. दिवसभर चार घरची कामं करून स्वतःचं पोट भरायची. घर जवळच असल्यानं प्रवचनाला सगळ्यात आधी हजर असायची.

शब्दखुणा: 

टवाळखोरी - २

Submitted by राजेंद्र क्षत्रिय on 8 November, 2012 - 12:57

सातवी इयत्तेत चांगल्या मार्कांनी पास झाल्यावर बाबांनी मला कबुल केल्याप्रमाणे माझ्या आवडीची सायकल घेऊन दिली. सुरवातीला काही दिवस सायकल शिकण्यात गेले. आठवीत मी सायकलवरच शाळेत जाऊ लागलो. सायकलवर शाळेत येणारे बरेच मित्र होते. या सर्व सायकलस्वारांचा म्हणजे आमचा एक ग्रुपच तयार झाला. त्यातील काही आमच्या कॉलनीतच राहात असत. सायंकाळी शाळा सुटल्यावर घरी गेलो कि पाच-दहा मिनिटांत हातपाय धुवून, थोडे फार खाऊन पुन्हा एकत्र जमून सायकलिंग करत असू. सायकल चालवण्याचे जणू आम्हांला वेडच लागले होते. नंतर नंतर आम्ही दोन-दोन, चार-चार किलोमीटर सायकलिंग करायचो.

शब्दखुणा: 

टवाळखोरी -१

Submitted by राजेंद्र क्षत्रिय on 7 November, 2012 - 12:03

अकोल्याजवळ वडांगळी नांवाचे छोटेसे गांव आहे. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी वडीलांची तेथे बदली झाली तेव्हा मी दुसरीत व माझा मोठा भाऊ तिसरीत होता. गांवात आम्ही नविनच होतो. गांवाच्या एका बाजुला वाड्यासारख्या एका घरात आम्ही राहात होतो. घरापासून थोड्याच अंतरावर आमची शाळा होती. शाळेत जाताना मुख्य रस्त्यावर चार-पाच टपरीवजा दुकाने होती. तेथे भेळ-भत्ता, लाडू, जिलेबी अशा खाद्यपदार्थांचे एक दुकान होते. जमिनीवर बांबू, लाकडी खांब वगैरे रोवून दोन-अडीच फूट उंच असा लाकडी चौथरा तयार केलेला होता. वर ताडपत्रीचा पाल बांधून छत केलेले होते. चौथऱ्याला चारही बाजूने गोणपाट बांधलेले असे.

शब्दखुणा: 

पाहिले न मी तिला

Submitted by मुंगेरीलाल on 6 November, 2012 - 13:23

शाळकरी वयातली आठवण. ठिकाण कुठलंही तालुका पातळीचं. आई-वडील, मी आणि दोन बहिणी असा लवाजमा रस्त्यातून जायला लागला की आजूबाजूचे लोक मिरवणूक पाहिल्यासारखे पहायचे. लहान गावातली ती पद्धतच. विशेषतः बायका-मुलींकडे तर इतकं रोखून आणि सतत पहायचं की त्यांनाच नव्हे, तर बरोबरच्या पुरुष मंडळींनाही ते नकोसं होऊन अंगाचा तिळपापड व्हावा. याचा परिणाम माझ्यावर असा झाला की रस्त्यातून जाताना मुलींकडे पाहणं ही चांगली गोष्ट नव्हे हे घट्ट डोक्यात बसलं. विशेषतः हे पाहणं मुलींना अजिबात आवडत नसणार ही पक्की समजूत झाली.

नामाचिये बळे

Submitted by अनिल तापकीर on 6 November, 2012 - 07:27

जेवल्यानंतर खरेतर आता पुन्हा शेतात जायचा कंटाळा आला होता.दिवसभर शेतातून नदीवर फेऱ्या घालून मी भयंकर थकला होतो .वीजमंडळाला दिवसभरात भरपूर शिव्या घातल्या होत्या. का नाही शिव्या घालणार , नदी ते शेत दीड किलोमीटर अंतर पंप चालू करून आलो नि पाटाने शेतात पाणी आले नि एखादा वाफा झाला कि लगेच लाईट जायची मग पुन्हा नदीवर जावे लागे. परत पंप चालू करून आलो कि पुन्हा तेच नुसता वैताग आणला होता ह्या लाईट वाल्यांनी शेजारच्या एम आई डी सीत थोडी सुद्धा लाईट जात नव्हती. आणि बाकी गावांनी आठ आठ तास लोड शेडींग, लोड शेडींग मध्ये लाईट अजिबातच नसते पण इतर वेळीही सारखी ये जा चालू असते.

परंतू

Submitted by बागेश्री on 5 November, 2012 - 06:21

तुमच्या विचारांवर,
असण्यावर,
असूनही नसण्यावर,
कुणा एकाची व्याप्ती भरून राहते..
इतकी, की- स्वतःचं वेगळं आस्तित्त्व जाणवण्याइतपत जागाच नसते!

त्या व्याप्तीचं रूपांतर कधी अचानक, भरून न येणार्‍या पोकळीत झालं की मग मात्र हादरा बसतो...

जगणं थांबवता येत नाही,
मोकळं आयुष्य कातर होतं!

परंतू, पावलं उचलावीच लागतात!

हा 'परंतूच' सामर्थ्यवान आहे, जगणं रेटून नेण्याची ताकद त्यात आहे......!!

शब्दखुणा: 

मसाप मध्ये डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचा जंगी सत्कार

Submitted by अ. अ. जोशी on 3 November, 2012 - 10:34

मसाप मध्ये डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचा जंगी सत्कार

डॉ. नागनाथ कोतापल्ले यांची ८६व्या अ.भा.साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष्यपदी निवड झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी सायंकाळी कोत्तापाल्लेन्चा सत्कार पुण्याच्या मसापच्या सभागृहात झाला.

त्यावेळी अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते. त्यातही रावसाहेब कसबे आणि अनंत दिक्षित हे विशेष. त्याचबरोबर उल्हास पवार, न.म.जोशी ई. उपस्थित होते.

कोत्तापल्ले यांचे स्वागत करण्यासाठी खास चौघडा वादन झाले. चौघड्यातील विविध तालांनी वादकांनी कमाल केली. स्वत: कोत्तापल्लेही त्यामुळे भारावून गेले.

बिजवराच्या पत्नीच्या खुनाचे प्रकरण - भाग ३

Submitted by हर्षल वैद्य on 3 November, 2012 - 09:12

रात्री आम्ही हॉटेलमध्ये याच प्रकरणाचा विचार करत होतो. मी शवाची पुन्हा तपासणी केली होती. हत्यारही पाहिले होते. रिपोर्टस सर्व बरोबर होते. तरीही मला काहीतरी खुपत होते. मी पडल्यापडल्याच ही बाब देवदत्तला बोलून दाखवली. "म्हणजे तुला काही शंका आहेत? ", देवदत्तने ताडकन उठत विचारले.

बिजवराच्या पत्नीच्या खुनाचे प्रकरण - भाग २

Submitted by हर्षल वैद्य on 2 November, 2012 - 14:15

"फार कठीण प्रश्न आहे साहेब. पण तुम्हाला म्हणून सांगते. हे एका सी. ए. फर्ममध्ये कामाला आहेत. आता सी. ए. म्हटलं की इंकम टॅक्सशी संबंध आलाच. क्लायंटसच्या विविध भानगडी असतात. कधी कधी प्रत्यक्ष जावं लागतं. तसे ते खरं तर कंपनीच्या कामासाठी लोणावळ्यास गेले होते. दोनलाच गेले होते. तीन तारखेस जरा वेळ मिळाला म्हणून सुनंदाला जरा समजवायला गेले होते की आम्हाला तुझे पैसे नकोत.

आता हे काम पोलिसांना सांगितलं तर नस्ती भानगड उभी रहायची. पण यांच्याबरोबर कंपनीचा ड्रायव्हर होता. तो देईल साक्ष. " बाईंच्या चेहऱ्यावर खरेपणा दिसत होता.

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन