Submitted by बागेश्री on 5 November, 2012 - 06:21
तुमच्या विचारांवर,
असण्यावर,
असूनही नसण्यावर,
कुणा एकाची व्याप्ती भरून राहते..
इतकी, की- स्वतःचं वेगळं आस्तित्त्व जाणवण्याइतपत जागाच नसते!
त्या व्याप्तीचं रूपांतर कधी अचानक, भरून न येणार्या पोकळीत झालं की मग मात्र हादरा बसतो...
जगणं थांबवता येत नाही,
मोकळं आयुष्य कातर होतं!
परंतू, पावलं उचलावीच लागतात!
हा 'परंतूच' सामर्थ्यवान आहे, जगणं रेटून नेण्याची ताकद त्यात आहे......!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हम्म. सहमत आहे.
हम्म.
सहमत आहे.
<<<त्या व्याप्तीचं रूपांतर
<<<त्या व्याप्तीचं रूपांतर कधी अचानक, भरून न येणार्या पोकळीत झालं की मग मात्र हादरा बसतो...>>>
अगदी योग्य. हे पूर्ण लेखन, एक फार मोठ्या प्रवासाची थोडक्यात सांगितलेली कथा आहे. कारण, कुणाच्या तरी आयुष्याची आपण व्याप्ती होऊन राहणं, किंवा कुणी तरी आपल्या आयुष्याची व्याप्ती होऊन राहणं हा फार मोठा पल्ला आहे. आणि मग पुढच्या घडामोडी, (पोकळी निर्माण होण्याची अवस्था) फार लवकर घडत जातात. छान मांडलंय
खरंय! पटलं. कविताही आशयासकट
खरंय! पटलं.
कविताही आशयासकट आवडली.
अगदी खरं आहे.. आवडले
अगदी खरं आहे.. आवडले
मस्त... ही थीम कथानकासह
मस्त... ही थीम कथानकासह फुलवता आली असती असे वाटले.
हल्ली लोक तुझ्या कवितांना ललित नि ललिताला कविता म्हणू लागलेत . निंबे
मुक्तछंदाचा कसा वापर करावा हे
मुक्तछंदाचा कसा वापर करावा हे बागेश्रीकडून शिकावं
बरं... ललित पटलं असं म्हणते!
बरं... ललित पटलं असं म्हणते! ...
लिहिणार्याने ज्या प्रकारात लिखाण केलंय तेच ग्राह्य असं असतं का? मी कविता म्हणून वाचली आणि प्रतिसाद दिला.
लक्षात आल नाही आधी. ही कविता
लक्षात आल नाही आधी. ही कविता असेल तर कविता विभागात पोस्ट करायला हरकत नाही. मुक्तछंद म्हणजे काही गुन्हा नाही.
एकदम 'आह'... बाग्ज तुझ्या
एकदम 'आह'...
बाग्ज तुझ्या ललित्/मुक्तछंद पंख्यात एक पाती वाढव
जे आहे ते अतीशय उत्तम !..शमजी
जे आहे ते अतीशय उत्तम !..शमजी म्हणाले त्याच्याशीही सहमत .
हे ललित आहे म्हणून मी असे वचले ;कारण मी हे लिहिले असते तर नक्कीच असे लिहिले असते ....................
कुणा एकाची व्याप्ती भरून राहते,.इतकी की- स्वतःचं वेगळं आस्तित्त्व जाणवण्याइतपत जागाच नसते!
त्या व्याप्तीचं रूपांतर कधी अचानक भरून न येणार्या पोकळीत झालं की मग मात्र हादरा बसतो...जगणं थांबवता येत नाही,मोकळं आयुष्य कातर होतं! परंतू, पावलं उचलावीच लागतात!हा 'परंतूच' सामर्थ्यवान आहे, जगणं रेटून नेण्याची ताकद त्यात आहे......!!( / आहे त्यात !!)
असो ......
धन्यवाद
बागेश्रीची कविता आणि ललित ही
बागेश्रीची कविता आणि ललित ही जुळी भावंड वाटतात. चेहर्यावरुन चटकण ओळखता येत नाही पण दोन्ही भावंड आहे खुप बोलकी आणि खुप विचार करायला लावणारी
हेय सचिन.... अफ्टर लाँग
हेय सचिन.... अफ्टर लाँग
आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी आहे, दोस्तहो...
छान लिहिता आपण, कमी शब्दात
छान लिहिता आपण, कमी शब्दात भला मोठा आशय मांडता.
माझ्यासारख्यांना हळूहळू आणि डब्बल वाचावे लागते, पण अर्थ उमगल्यावर छान अनुभुती मिळते.
सुंदर..... दादच्या त्या
सुंदर..... दादच्या त्या लेखाची आठवण झाली.
छान लिहिता आपण, कमी शब्दात
छान लिहिता आपण, कमी शब्दात भला मोठा आशय मांडता.
सहमत.
बागेश्री, दुखर्या विषयावर
बागेश्री, दुखर्या विषयावर किती सुंदर लिहिलंस. खूप नेमकं, प्रत्येकाने अनुभवलेलं, जितकं वैयक्तिक तितकं सार्वत्रिक..
तेरा गमभी मुझको अझीझ है
के तुम्हीकी दी हुई चीज हैं..
या ओळी आठवून गेल्या.
__/\__
__/\__
नेहमीप्रमाणेच आशय अतिशय मनाला
नेहमीप्रमाणेच आशय अतिशय मनाला भिडणारा...
सर्वांची आभारी आहे.. निखळ
सर्वांची आभारी आहे.. निखळ प्रतिसाद वाचले की खरेच बरं वाटतं, मग ते कलाकृती पटण्याबद्दल असोत वा न पटल्याबद्दल
अखी कुठल्या गं! वाचायला आवडेल... सांग नक्की
वैभवा,
स्फुट लेखात समावेश आहे ह्याचा, लि़खाणाला अॅस्थेटिक सेन्सही तितकाच महत्त्वाचा ह्या मताची मी असल्याने मांडणी अशी केलीये.
छान लिहिले आहे !
छान लिहिले आहे !
बाग्ज, सुपर्ब ! आवडलं.
बाग्ज, सुपर्ब ! आवडलं.
खूप नेमकं, प्रत्येकाने अनुभवलेलं, जितकं वैयक्तिक तितकं सार्वत्रिक.. >>> + १
मस्त
मस्त
विचार खूप आवडला.
विचार खूप आवडला.
हा 'परंतूच' सामर्थ्यवान आहे,
हा 'परंतूच' सामर्थ्यवान आहे, जगणं रेटून नेण्याची ताकद त्यात आहे......!! << चोकस !
माझ्यासाठी कविता म्हणजे
माझ्यासाठी कविता म्हणजे माध्यम आहे अनुभूतीचं. कवी/यित्रीच्या रचनेतून आपण त्या अनुभूतीशी रिलेट होऊ शकत असू तर ही कलाकृती त्यात यशस्वी झाली आहे. साजालंकार न चढवताही भिडलेल्या काही रचनांपैकी एक.
हो ना किरण... रोजचं जगणं असं
हो ना किरण... रोजचं जगणं असं साधंच असतं ना... नेहमीच कुठे सजणं होतं.. तो साधेपणाच भावतो मात्र!!
सगळ्यांची आभारी आहे दोस्तहो..
भारती,
खरंय सार्वत्रिक आहे म्हणूनच रेखाटता येतंय.. पोहोचवता येतंय, धन्यवाद जी