गाथाचित्रशती लेखनस्पर्धा २०१२

विषय क्र. १: चित्रपटातले माझे आवडते प्रसंग

Submitted by स्वप्ना_राज on 28 August, 2012 - 03:23

वेळ रात्रीची. तो आणि ती. पण दोघं ऐन नव्हाळीतले नाहीत. तो पोक्त दिसणारा आणि तिच्याही केसात रुपेरी बटा. खूप जुनी ओळख पण खर्‍या प्रेमाच्या नशिबात असलेल्या वर्षांच्या ताटातुटीने पार पुसून टाकलेली. कदाचित ते परत कधी भेटलेही नसते पण क्रूर विनोद करायची नियतीची सवय जाते कुठे? ती आता पूर्वीची अवखळ तरुणी राहिलेली नाही तर एक लोकप्रिय नेता आहे. तो एका हॉटेलचा मॅनेजर. खोलीच्या सजावटीवरून आपल्याला ओळखणारं इथं कोणीतरी आहे हे तिच्या लक्षात येतं. आणि त्यांची परत भेट होते. हा प्रसंग कुठल्याही बागेत, रम्य तळ्याकाठी किंवा समुद्रकिनारी घडत नाही. भोवती असतात कुठल्याश्या उध्वस्त नगरीचे भग्न अवशेष.

Subscribe to RSS - गाथाचित्रशती लेखनस्पर्धा २०१२