स्वप्न
जरा लागताच डोळा
झाला काळोख बोलका
ओघळला नकळत
थेंब अश्रूचा पोरका
ओल्या वेदनेचे त्याच्या
मूळ हाताशी लागेना
काय झाकले मुठीत
खरे खोटे आकळेना
दुःख तुझे दुःख माझे
वाटे विभ्रमांचे धुके
रेंगाळती देहातून
आठवांचे श्वास मुके
खुळ्या व्यथांचे गाठोडे
आता उशाशी घेऊन
स्वप्न पाहतो उद्याचे
झाले गेले विसरून
द्वैत