काव्यलेखन

खुशाल आहे.

Submitted by चंद्रहास शास्त्री on 6 May, 2024 - 12:15

खुशाल आहे.
©️ चन्द्रहास शास्त्री

वीज दाटल्या नभी, कडाड विशाल आहे
सांग मेघा तू तिला, पण मी खुशाल आहे.

निशिगंधास रेशमी, ओढली शाल आहे
गंध झाकलास तरी, पण मी खुशाल आहे.

अवकाळी वर्षा ही, अजब हे साल आहे
खळे झालेच नाही, पण मी खुशाल आहे.

स्मृतीसारिकेने ही, मधुरली डाल आहे
पंचमाची प्रतीक्षा, पण मी खुशाल आहे.

चंद्र तेथे चांदणी, ख्याती मिसाल आहे
इतुके नसे पुरेसे, पण मी खुशाल आहे.

शब्दखुणा: 

ती

Submitted by शब्दब्रम्ह on 5 May, 2024 - 07:27

आठवतंय...,शेवटच्या भेटीत बुजली होती ती,
स्वतः च्याच अश्रुंमध्ये भिजली होती ती.

आभाळभर दुःखांनी रडली होती ती,
उष्टी हळद लागूनही फिकी पडली होती ती.

कित्येक यातनांशी एकटीच ,जुंपली होती ती,
नियतीला पुरून उरूनसुद्धा जणू आज संपली होती ती.

"ही शेवटचीच भेट आपली." म्हणल्यावर झुरली होती ती,
कंठात अडकलेल्या हुंदक्यात, नकळत विरली होती ती.

हजारो वादळं उरात दाबून चालली होती ती,
निःशब्द राहून सुद्धा,बरच काही बोलली होती ती.

मी जिंकलो वाटते.

Submitted by चंद्रहास शास्त्री on 4 May, 2024 - 00:41

मी जिंकलो वाटते.
©️ चन्द्रहास शास्त्री

तू हसताना सजणे, मी जिंकलो वाटते
तू लाजताना सखे, मी जिंकलो वाटते.

मिटती उघडती अशा, कळ्या भासती कशा
बोलताना सखे तू, मी जिंकलो वाटते.

गुणगुणतेस सखे तू, माझी कविता जेव्हा
शब्दच मोती होती, मी जिंकलो वाटते.

तारकांना सकाळी, वाटते जाग आली
सुधांशु तुझ्या भाळी, मी जिंकलो वाटते.

दृष्ट लागू नये तुला, अबीर मीच लावतो
मेंदीत अक्षर दिसता, मी जिंकलो वाटते.

शब्दखुणा: 

निरोपाच्या कविता

Submitted by पॅडी on 3 May, 2024 - 23:48

* निरोपाच्या कविता *

एक.

मान वेळावण्याआधी
प्राण कंठाशी येतात
न खाल्लेली सुपारी लागते
उंबर्‍यात पाऊल अडते,
ताटातुटीच्या बिकट समयी
नको नको म्हणताना
तेच ते आदिम आर्त नाट्य
आधुनिक युगातही घडते

दोन.

प्रकृतीस जपा
जेवणाचे हाल, रात्रीची जाग्रणे नको
पोहोचताच फोन करा
तुझ्या लक्षवेधी सूचनांची
लांबलचक यादी,
माझे बर्फाच्या तुकड्यागत
स्वत:त विरघळत जाणे
तुझ्या हरणकाळज्या पात्रात
धोक्याच्या पातळीपर्यंत
येऊन ठेपलेली महानदी

तीन.

शब्दखुणा: 

देवाक काळजी

Submitted by संदिप न. डिचोलकर on 3 May, 2024 - 05:46

माझं जगणं,भोगणं सारं कळुदे आधी माझं मला!
धाऊदे,दमुदे,पडूदे अन् सावरुदे आधी माझं मला!
सगळे आधार संपतील तेव्हा तूलाच साद घालेन मी!
तू माझ्या काळजीने मात्र मदतीच्या पुढे धावू नकोस!!
कळुदे झळ मला आयुष्यात येणाऱ्या ऊन पावसाची!
सोसुदे कळ मला घावावर घाव बसलेल्या वेदनांची!
प्राक्तनाला माझ्या आहे तुझी साक्ष हीच माझी श्रद्धा!
माझ्या थेंबभर श्रद्धेला तुझा कृपेचा सागर देऊ नकोस!!
सुखात रमलो जेव्हा त्याची सवय लागू दिली नाहीस!
दुःखात बुडालो तेव्हा जीवन नांव हेलकावु दिली नाहीस!
नको शुभाचा मोह नको अशुभाचा मोक्ष मला!

मनाची भाषा

Submitted by Devendra P on 2 May, 2024 - 14:36

जना कळावी मना-मनांची भाषा.....
मनी फुलाव्या नवनिर्माणाच्या आशा.....

दुर सारूनी द्वेष, मत्सर, अविचार.....
सत्कृत्यासाठी मने जोडूनी व्हावे तय्यार.....

मनाची निर्मळता, सुंदरता त्यावरी अवलंबून.....
सद्विचार, निकोप शिक्षण हे ची ते गुण......

महापुरुषांना वंदुन, करुनी मातृभुमीचे स्तवन ......
झटावे जागविण्या माणुसकी, जोडण्या दुभंगलेली मन.....

नमस्कार माझा महाराष्ट्रभूला।।

Submitted by चंद्रहास शास्त्री on 1 May, 2024 - 02:59

नमस्कार माझा महाराष्ट्रभूला।।
©️ चन्द्रहास शास्त्री

इथे थोर राजे तसे थोर संत
सुभक्ती सुशक्ती निराळीच माती।
इथे आसमंती निनादे मृदंग
नमस्कार माझा महाराष्ट्रभूला।।

इथे ज्ञान विज्ञानरूपी पताका
इथे दिव्य ओव्या नि गाथा नि दिंड्या।
इथे पेटती संक्रमाच्या मशाली
नमस्कार माझा महाराष्ट्रभूला।।

इथे देव जाते दळायास येई
इथे देव पाणी भरायास येई।
इथे देव लेकूरवाळाचि होई
नमस्कार माझा महाराष्ट्रभूला।।

शब्दखुणा: 

येत जा तू सखे

Submitted by चंद्रहास शास्त्री on 1 May, 2024 - 02:46

येत जा तू सखे
©️ चन्द्रहास शास्त्री

मात्रा १०

पारखे पारखे, नको होऊ सखे
सारखे सारखे, येत जा तू सखे

पाकळ्या थोड्या, देत जा तू सखे
मोकळ्या वेळी, येत जा तू सखे

मी का नव्याने, सांगायला हवे
स्वप्नात जरासे, येत जा तू सखे

पालवी स्मृतींची, वाळण्या आधी
लेऊन बहावा, येत जा तू सखे

ऊन बाहेरही, आतही ते तसे
होऊन गारवा, येत जा तू सखे

शब्दखुणा: 

खुशाल आहे.

Submitted by चंद्रहास शास्त्री on 29 April, 2024 - 23:17

खुशाल आहे.
©️ चन्द्रहास शास्त्री

वीज दाटल्या नभी, कडाड विशाल आहे
सांग मेघा तू तिला, पण मी खुशाल आहे.

निशिगंधास रेशमी, ओढली शाल आहे
गंध झाकलास तरी, पण मी खुशाल आहे.

अवकाळी वर्षा ही, अजब हे साल आहे
खळे झालेच नाही, पण मी खुशाल आहे.

स्मृतीसारिकेने ही, मधुरली डाल आहे
पंचमाची प्रतीक्षा, पण मी खुशाल आहे.

चंद्र तेथे चांदणी, ख्याती मिसाल आहे
इतुके नसे पुरेसे, पण मी खुशाल आहे.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन