ड्रीमर अँड डुअर्स

दया कुछ तो गडबड है !

Submitted by Dr. Satilal Patil on 6 June, 2022 - 02:24

मला लहानपणी, बस स्टॅण्डवर मिळतात तसली पॉकेट बुक्स वाचायची सवय लागली होती. खुनी कौन? गहरा सच, वगैरे डिटेक्टिव्ह कहाण्या वाचत बकऱ्या चारताना, शेतात बांधावर बसून, झाडावर बसून, अंगणात खाट टाकून किंवा छतावर चटई टाकून या रहस्यकथा वाचण्यात मी रंगून जायचो. मोठेपणी आपण डिटेक्टिव्ह होऊ असं ठरवलं होतं. कहाणीतील डिटेक्टीव्हने खुन्याला पकडला की, त्याची कॉलर पकडून मीच त्याला पोलिसांच्या तावडीत देतोय असं दिवास्वप्न मी पाहायचो. गावात एकमेव टीव्ही आला तेव्हा कृष्णधवल 'व्योमकेश बक्षी' ने त्या विचारांना अजून खतपाणी घातलं. मोठं झाल्यावर डिटेक्टिव्ह होता आलं नाही. पण ते कसब जागोजागी कामाला आलं.

अनर्थ !

Submitted by Dr. Satilal Patil on 22 May, 2022 - 05:16

आमावसेची काळीकुट्ट रात्र होती. राकीड्यांची किरकिर तिची भयानकता अजून वाढवत होती. सगळीकडे स्मशान शांतता होती. असणारच!, कारण ते स्मशानच होतं. साधूच्या सांगण्यावरून राजा विक्रमादित्य स्मशानातून झाडावर लटकणारं प्रेत काढायचा. त्याला पाठीवर घेऊन साधूच्या होमकुंडाच्या दिशेने निघायचा. रस्त्यात त्या प्रेतात बसलेल्या पिशाच्चाने त्याला गोष्ट सांगायची, विक्रमादित्याने उत्तर दिलं नाही, तर डोक्याची शंभर शकलं होतील अशी भीती घालायची. आणि उत्तर दिलं की मात्र मौन भंगल म्हणून प्रेतासह परत झाडावर जाऊन लटकायचं. असा 'चीत भी मेरी, और पट भी' चा पिशाच्ची खेळ सुरु होता.

(अ)विश्वास !

Submitted by Dr. Satilal Patil on 13 May, 2022 - 01:59

डोळ्यावर काळाकुट्ट अंधार पसरला होता. वातावरणात स्पिरिटचा मंद दर्प रुंजी घालत होता. लांबवर कुठेशी हळू आवाजात कुजबुज ऐकू येत होती. आपण नेमके कुठे आहोत हे रावसाहेबांना कळेना. त्यांनी डोळे उघडून पाहण्याचा प्रयत्न केला पण ग्लानी आल्यासारखी झाली आणि पुन्हा डोळे मिटले गेले. मग मिटल्या डोळ्यांनी त्यांनी कानोसा घ्यायचा प्रयत्न केला. पण काही अंदाज लागेना. आपण स्वप्नात आहोत का? असा प्रश्न त्यांच्या मनाला चाटून गेला. मोठ्या प्रयत्नाने त्यांनी कूस बदलली. तेव्हड्यात त्यांना शेजारी हालचाल जाणवली. कोण आहे? असं क्षीण आवाजात त्यांनी विचारलं.

विषय: 

आपल्यापुरतं सारवता येतं ?

Submitted by Dr. Satilal Patil on 23 April, 2022 - 02:57

ओ अप्पा s s ओ अप्पा s s असं मोठ्याने ओरडत अप्पांच्या सुनबाई धावतच अंगणात आल्या. अप्पा अंगणातील झोपाळ्यावर बसून अडकित्त्याने 'कुटूर कुटूर' असा आवाज करत पानासाठी सुपारी कातरत होते. कातरलेल्या सुपारीची, शार्पनरने पेन्सिलीची निघते तशी नक्षीदार पापडी, कात-चुना लावलेल्या रंगीत पानावर पडत होती. 'काय झालं सुनबाई?' असं ताडकन उठत अप्पानी विचारलं. 'अहो अप्पा' s s बोलतांना त्यांना धाप लागत होती. 'बघा ना चिंटूला काहीतरी होतंय, तो कससंच करतोय' हातातला अडकित्ता फेकत आप्पांनी घरात धाव घेतली. अप्पांचा सात वर्षांचा नातू चिंटू’ बेडरुममधे दोन्ही हात पोटाशी आवळून कळवळत पडला होता.

……आणि आम्ही वाममार्गावरून ढळलो !

Submitted by Dr. Satilal Patil on 2 July, 2021 - 13:15

धाड s धाड s धाड s धाड s असा आवाज करत आमच्या बुलेटी त्या लोखंडी पुलावर चढल्या आणि पाचही बाईकच्या आवाजाने तो दुमदुमला. भारत आणि बर्माच्या म्हणजेच ब्रह्मदेश उर्फ म्यानमार च्या सीमेला जोडणारा तो पूल होता. सीमेवर ना कुठले कुंपण ना सीमाभिंत. दोन्ही देशातून वाहणारी नदीच सीमा म्हणुन उभी ठाकलीय. नदीच्या पात्रात रोवलेले राकट पोलादी खांब, रस्त्याच्या दोन्ही बाजूला भक्कम लोखंडी पट्ट्याची भिंत. एखाद्या लोखंडी बोगद्यात बाईक चालवायचा फिल येतोय.

तरंगणारे म्यानमारी टोमॅटो !

Submitted by Dr. Satilal Patil on 27 June, 2021 - 22:37

क्यू याम किम सी s s सर s s क्यू याम किम सी s s असं न समजणाऱ्या एलियन भाषेत रस्त्यावरच्या बायका ओरडत होत्या. कडेला बरीच गर्दी जमली होती. मी कुतूहलाने बाईक रस्त्याच्या कडेला थांबवली आणि काय प्रकार आहे, हे पाहण्याचा प्रयत्न करू लागलो. तोपर्यंत आकर्षक, गोल चेहरेपट्टीची, चपळ ठेंगणी म्यानमारी युवती तुरुतुरू चालत माझ्याकडे आली. उन्हातान्हात राबून रापलेला पीतवर्ण गव्हाळ झालेला. डोक्यावर मोठी बांबूची म्यानमारी टोपी. दोन्ही हातात भलेमोठे रसरशीत टोमॅटो घेऊन क्यू याम किम सी ss सर ss असं म्हणत ती पुढे आली. रस्त्याच्या बाजूला टोमॅटोचे ढीग मांडून काही बायका बसल्या होत्या.

लेख-४: . माझी मुशाफिरी!.....आनंद पिकवणारा देश !

Submitted by Dr. Satilal Patil on 7 May, 2021 - 13:41

नजर जाईल तेथवर रंगवलेलं हिरवंगार निसर्गचित्र. रस्त्याच्या दुतर्फा चहाचे मळे पार लांबवरच्या डोंगराकडे धावताहेत. सिलिगुडी - भूतान रस्त्यावरून बुलेटी पळवत आम्ही जयगावला आलो. जयगाव हे भूतानच्या सीमेवरील भारतातलं शेवटचं गाव. सीमेपलीकडे भुतानचं फुनसोलिंग. अगदी खुर्द-बुद्रुक सारखे ही दोन्ही गावं आंतरराष्ट्रीय घरोबा राखत एकदुसऱ्याचा शेजार एन्जॉय करताहेत. जयगावच्या शेवटच्या गल्लीला लागून असलेली कमान ओलांडली आणि भूतानमध्ये प्रवेश केला. ही कमान म्हणजेच बॉर्डर. अंगावर रोमांच उभं राहीलं. आयुष्यात पहिल्यांदाच मोटारसायकल वरून देशाबाहेर पडलोय. भूतानच्या थंडगार हवेने हे रोमांच अधिकच गहिरं केलंय.

२. माझी मुशाफिरी!.... चंद्रावरील माती अन् प्रोटिनची शेती

Submitted by Dr. Satilal Patil on 27 April, 2021 - 04:55

(ड्रीमर अँड डूअर या पुस्तकात समावेश करू न शकलेल्या पर्यावरण, शेती आणी समाज या अनुभवा वर आधारीत लेखमाला.)

Subscribe to RSS - ड्रीमर अँड डुअर्स