……आणि आम्ही वाममार्गावरून ढळलो !
Submitted by Dr. Satilal Patil on 2 July, 2021 - 13:15
धाड s धाड s धाड s धाड s असा आवाज करत आमच्या बुलेटी त्या लोखंडी पुलावर चढल्या आणि पाचही बाईकच्या आवाजाने तो दुमदुमला. भारत आणि बर्माच्या म्हणजेच ब्रह्मदेश उर्फ म्यानमार च्या सीमेला जोडणारा तो पूल होता. सीमेवर ना कुठले कुंपण ना सीमाभिंत. दोन्ही देशातून वाहणारी नदीच सीमा म्हणुन उभी ठाकलीय. नदीच्या पात्रात रोवलेले राकट पोलादी खांब, रस्त्याच्या दोन्ही बाजूला भक्कम लोखंडी पट्ट्याची भिंत. एखाद्या लोखंडी बोगद्यात बाईक चालवायचा फिल येतोय.