मला लहानपणी, बस स्टॅण्डवर मिळतात तसली पॉकेट बुक्स वाचायची सवय लागली होती. खुनी कौन? गहरा सच, वगैरे डिटेक्टिव्ह कहाण्या वाचत बकऱ्या चारताना, शेतात बांधावर बसून, झाडावर बसून, अंगणात खाट टाकून किंवा छतावर चटई टाकून या रहस्यकथा वाचण्यात मी रंगून जायचो. मोठेपणी आपण डिटेक्टिव्ह होऊ असं ठरवलं होतं. कहाणीतील डिटेक्टीव्हने खुन्याला पकडला की, त्याची कॉलर पकडून मीच त्याला पोलिसांच्या तावडीत देतोय असं दिवास्वप्न मी पाहायचो. गावात एकमेव टीव्ही आला तेव्हा कृष्णधवल 'व्योमकेश बक्षी' ने त्या विचारांना अजून खतपाणी घातलं. मोठं झाल्यावर डिटेक्टिव्ह होता आलं नाही. पण ते कसब जागोजागी कामाला आलं.
डोळ्यावर काळाकुट्ट अंधार पसरला होता. वातावरणात स्पिरिटचा मंद दर्प रुंजी घालत होता. लांबवर कुठेशी हळू आवाजात कुजबुज ऐकू येत होती. आपण नेमके कुठे आहोत हे रावसाहेबांना कळेना. त्यांनी डोळे उघडून पाहण्याचा प्रयत्न केला पण ग्लानी आल्यासारखी झाली आणि पुन्हा डोळे मिटले गेले. मग मिटल्या डोळ्यांनी त्यांनी कानोसा घ्यायचा प्रयत्न केला. पण काही अंदाज लागेना. आपण स्वप्नात आहोत का? असा प्रश्न त्यांच्या मनाला चाटून गेला. मोठ्या प्रयत्नाने त्यांनी कूस बदलली. तेव्हड्यात त्यांना शेजारी हालचाल जाणवली. कोण आहे? असं क्षीण आवाजात त्यांनी विचारलं.
ओ अप्पा s s ओ अप्पा s s असं मोठ्याने ओरडत अप्पांच्या सुनबाई धावतच अंगणात आल्या. अप्पा अंगणातील झोपाळ्यावर बसून अडकित्त्याने 'कुटूर कुटूर' असा आवाज करत पानासाठी सुपारी कातरत होते. कातरलेल्या सुपारीची, शार्पनरने पेन्सिलीची निघते तशी नक्षीदार पापडी, कात-चुना लावलेल्या रंगीत पानावर पडत होती. 'काय झालं सुनबाई?' असं ताडकन उठत अप्पानी विचारलं. 'अहो अप्पा' s s बोलतांना त्यांना धाप लागत होती. 'बघा ना चिंटूला काहीतरी होतंय, तो कससंच करतोय' हातातला अडकित्ता फेकत आप्पांनी घरात धाव घेतली. अप्पांचा सात वर्षांचा नातू चिंटू’ बेडरुममधे दोन्ही हात पोटाशी आवळून कळवळत पडला होता.
धाड s धाड s धाड s धाड s असा आवाज करत आमच्या बुलेटी त्या लोखंडी पुलावर चढल्या आणि पाचही बाईकच्या आवाजाने तो दुमदुमला. भारत आणि बर्माच्या म्हणजेच ब्रह्मदेश उर्फ म्यानमार च्या सीमेला जोडणारा तो पूल होता. सीमेवर ना कुठले कुंपण ना सीमाभिंत. दोन्ही देशातून वाहणारी नदीच सीमा म्हणुन उभी ठाकलीय. नदीच्या पात्रात रोवलेले राकट पोलादी खांब, रस्त्याच्या दोन्ही बाजूला भक्कम लोखंडी पट्ट्याची भिंत. एखाद्या लोखंडी बोगद्यात बाईक चालवायचा फिल येतोय.
सेंद्रिय भुत !.... माझी मुशाफिरी (भाग ६)
पुणे सिंगापूर पुणे या हिमिमेतील २०००० किलोमीटर प्रवासादरम्यान पर्यावरण आणि शेतीसंबंधीचे अनुभव.
गेले दोन दिवस जगातल्या सर्वात आनंदी देशात बुलेटने फिरतोय. रस्ते एकदम चकाचक आहेत. कुठेही कचरा नाही, प्लास्टिक च्या पिशव्या, गुटख्याच्या पुड्या नाहीत. घरं, दुकानं मराठी शाळेतल्या आज्ञाधारक मुलांसारखे शिस्तीत उभे. कुठेही राजकारण्यांचा वाशीला लावून केलेलं अतिक्रमण नाही. गावागावांना जोडणारे घाटाचे रस्ते हिरव्यागार डोंगरातून धावत जाताहेत.
नजर जाईल तेथवर रंगवलेलं हिरवंगार निसर्गचित्र. रस्त्याच्या दुतर्फा चहाचे मळे पार लांबवरच्या डोंगराकडे धावताहेत. सिलिगुडी - भूतान रस्त्यावरून बुलेटी पळवत आम्ही जयगावला आलो. जयगाव हे भूतानच्या सीमेवरील भारतातलं शेवटचं गाव. सीमेपलीकडे भुतानचं फुनसोलिंग. अगदी खुर्द-बुद्रुक सारखे ही दोन्ही गावं आंतरराष्ट्रीय घरोबा राखत एकदुसऱ्याचा शेजार एन्जॉय करताहेत. जयगावच्या शेवटच्या गल्लीला लागून असलेली कमान ओलांडली आणि भूतानमध्ये प्रवेश केला. ही कमान म्हणजेच बॉर्डर. अंगावर रोमांच उभं राहीलं. आयुष्यात पहिल्यांदाच मोटारसायकल वरून देशाबाहेर पडलोय. भूतानच्या थंडगार हवेने हे रोमांच अधिकच गहिरं केलंय.
(ड्रीमर अँड डूअर या पुस्तकात समावेश करू न शकलेल्या पर्यावरण आणी शेती संबंधी अनुभवा वर आधारीत लेखमाला- भाग: ३)

दुचाकीवरून सात देशांची सफर करणाऱ्या कृषी शास्त्रज्ञांच्या नजरेतून तेथील शेतीचा रोचक आणि रंजक आढावा...