कांसा बेटावरचा पद्मदुर्ग.. - http://www.maayboli.com/node/26001
पद्मदुर्ग आटोपून ११ च्या सुमारास राजपुरीतून निघालो. आता लक्ष्य सामराजगड होते. सामराजगड हा छोटासा दुर्ग मुरुड आणि राजपुरी यांच्यामध्ये असलेल्या एकदरा गांवाजवळ आहे. एकदरा गांवातले लोक किल्ला म्हटल्यावर नीट माहिती देईनात. एकदरा गांवातल्या शिव मंदिराजवळ गेल्यावर मुरुड समुद्रकिनार्याचा सुंदर देखावा दिसतो.

शॉकप्रुफ, वॉटरप्रुफ, डस्टप्रुफ, फ्रिजप्रुफ हे नक्की कशाचे वर्णन असेल असे वाटले का? तर हे डिजिटल कॅमेर्यांचेच वर्णन आहे.
सगळ्या ट्रेकर्स , स्नोर्कलर्स, हायकर्स, स्नोबोर्डस यांच्या मागण्यांना कॅमेरा कंपन्यांनी दिलेले उत्तर म्हणजे असे कॅमेरे आहेत.
सहसा साधे डिजीटल कॅमेरे फारच नाजुक असतात. पडले तर पार्ट आणि पार्ट वेगळा होतो. (हो मी पाडुन बघितलाय एक. त्याचं एक बटन हरवलं ते कधी मिळालच नाही पुन्हा.) शिवाय यांना पाणी लागलं, वाळु लागली, फार थंडी लागली कि हे कॅमेरे नीट काम करत नाहीत.
२- ३ वर्षांपूर्वी कुठल्यातरी ट्रेकवेळी विनयने खटकी पडल्यागत एक भन्नाट ऑफर दिली. मोजक्या मंडळींना घेऊन सहसा न होणारे सागरी किल्ले करायचे आहेत. खांदेरी-उंदेरी, पद्मदुर्ग उर्फ कांसा आणि सुवर्णदुर्ग. या सर्व किल्ल्यांवर जाण्यासाठी सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट जमवावी लागणार होती ती म्हणजे स्थानिक नावाड्यांशी संपर्क नि परवानगी. हे काम विनयने इतर सोबत्यांच्या मदतीने उत्तमपैकी हाताळलं. इतर किल्ल्यांप्रमाणे हे किल्ले सहजपणे होणारे नव्हेत त्यामुळे कितीही महत्त्वाची कामे असली तरी ती बाजूला सारायला हवी होती.
आशुचँपने मागेच मला विचारलं होतं कि अशा प्रकारचा धागा काढशील का? पण मला तेव्हा वेळ नव्हताच त्यामुळे हो म्हणुन पुढे काहीच केलं नाही.
पण आता माझ्या लक्षात आलं की अशा प्रश्नांना उत्तर द्यायला "कोणती गाडी .." सारखा हा धागा कदाचित उपयोगी पडेल. मला व्यक्तिश: इमेल केलेल्या काही लोकांना उत्तर द्यायला मला फार वेळ लागला (वेळ अभावी किंवा विसरल्यामुळेही) त्यामुळे इथे विचारले तर प्रश्न अनुत्तरीत रहाणार नाहीत असे वाटते.