उजाड
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
7
विस्थापन झालेल्या गावातले चित्र आहे. लोक घरे सोडून, छतं मोडून गेले आहेत. संपूर्ण गावभर हे असेच अवशेष आहेत शिल्लक. त्या गावातून जात असताना सगळ्या गावाचं भूत झालंय असं वाटत होतं.
कुणाच्या अंगणात पेरूला बारके पेरू लागले होते. कुणी अंगणाच्या पेळूवर स्लिपर्स विसरले होते. कुठे शेवटची चूल पेटवून पुजा केल्याच्या खुणा होत्या. कुणी छताच्या नळ्यांसकट घर तसेच टाकून गेले होते. विस्थापन होऊन जेमतेम दोनेक महिनेच झाले असावेत असं सांगणार्या अनेक खुणा होत्या. भयंकर भयंकर वाटत होतं.
आता हा फोटो काढून दीड-दोन वर्ष होऊन गेलीत. म्हणजे एव्हाना इथे पाणी भरलेलं असणार. वरच्या टेकडीवर घरे हलवलेले लोक खालच्या पाण्याकडे बघून तिथे माझं घर होतं बघ आणि तिथे तुझं असं काही काही म्हणत असणार..
-नी
विषय:
प्रकार:
शेअर करा
(No subject)
संदर्भ काय आहे कळला नाही?
संदर्भ काय आहे कळला नाही? कुठल्या गावाची ही कथा आहे? पेळूवर म्हणजे काय?
छान लिहिलेस.
संदर्भ म्हणजे
संदर्भ म्हणजे विकासासाठी(नक्की कुणाच्या ते माहित नाही) विस्थापन हाच आहे गाव कुठलं का असेना.
गाव सिंधुदुर्गातलं आहे.
पेळू म्हणजे सारवलेल्या अंगणाला जो काठ केलेला असतो तो. कोकणातला शब्द आहे.
नी...खरच विषण्ण आहे हे.. माझे
नी...खरच विषण्ण आहे हे..
माझे हात हे असे फोटो काढायला सुद्धा धजावतील की नाही कोण जाणे... पण मी काळू नदीच्या संपूर्ण भागात जाऊन येणार आहे हे नक्की... एकदा डोळे भरून तो भाग बघून घेऊ दे.
आपली घरे अशी सोडून जाताना
आपली घरे अशी सोडून जाताना लोकांना काय यातना झाल्या असतील...
साधनाताईंशी पूर्ण सहमत!
साधनाताईंशी पूर्ण सहमत!
... एकदा डोळे भरून तो भाग
... एकदा डोळे भरून तो भाग बघून घेऊ दे. >> खरच.
अस्वस्थ वाटले बघुन / वाचुन.