तुमच मत?
आमच्या मित्राने ही लिंक पाठवली. मला आवडली. बघा तुम्हाला आवडते का.
आमच्या मित्राने ही लिंक पाठवली. मला आवडली. बघा तुम्हाला आवडते का.
स्प्रिंग आला की फुलं बहरायला लागतात. अझेलीयाजचा बहर ओसरला की मॅग्नोलीया बहारायला लागतो. ह्याला स्वतःचा सुगंधही असतो. छोट्याशा झाडालासुध्दा केवढी मोठी मोठी फुलं लागतात. एखादी बारीक आई नाही का आपल्या अगदी बाळसेदार बाळाला सहज उचलून घेते तशीच ही झाडं. माझ्या यार्डमधलं सगळ्यात छोट्सं मॅग्नोलीया मला त्या आईची आठवण करून देतं. म्हणून हे खास Mother's Day Special.
ह्या खेपेच्या भारतभेटीत ओरीसाची ट्रीप केली. केवढं पहाण्यासारख आहे नाही आपल्या देशात?. पुरी, कोणार्क, चिलका लेक, भुवनेश्वर - प्राचीन शील्पांपासून निसर्गाचं सौंदर्य - सगळ्याचीच भरपूर रेलचेल. ह्या खेपेला सगळीकडेच ट्रेंड गाईडस घेतले होते त्यामुळे ट्रीप एकदम माहितीपूर्ण आणि मस्त झाली.
आमच्या इथे सिझनमध्ये जेमतेम एकदा दोनदा स्नो पडतो. ह्या खेपेला जरा जास्तच झाला. आज तर चक्क ६ इंच. ऑफिसमधून लवकर यायला मिळालं मग येता येताच थंडीतून घरी गेल्यावर काय करावं. म्हणजे खायला काय कराव असाच विचार केला जातो. ( म्हणूनच तर पार्ले बीबीवर रुळले नसेन न?) तर हा आजचा बेत.
वहिनीने घरी करून पाठवलेल्या ताज्या भाजाणीची थालीपीठं आणि तिनेच करून पाठवेला छुंदा. दोन्हीही गोष्टी सासूकडे शिकल्याचं अगदी कौतुकाने सांगते. खरच तिच्या खुपशा गोष्टींना अगदी आईच्या हाताची चव आहे. मी भाजाणी, लोणची वगैरे आईकडून शिकलेच नाही. आधी आई पाठवायची. आता वहिनीपण तेवढ्याच प्रेमाने आईचा वारसा चालवते आहे.