शब्दच का ?
नाही माहीती विचारही-
येती पटलावर कुठूनसे,.........
हा प्रवास अज्ञाताचा
मी वाटसरू,..........
खेळणे कुणाचे जाणत नाही,.......
रेखतो रेष येणारी,........
आकार शोधतो; अर्थ तोच त्याचा
घालतो हात काळजास कधि-
आकाश पिंजतो,....
न कळे कशास सारे,....
कुशीत ज्या खेळले बाळपण
बागडली अंगाई
साहवे न वार्धक्य तिचे
बघ जीर्ण जाहली आई
तोच जिव्हाळा तीच माऊली
खंड त्यात नाही
निश्पर्ण वृक्ष वठलेला जणु
मन-उरात लाही लाही
सुरकुतलेला स्पर्श गात्र थकलेली,
परि उधाणलेली माई
आकाश चांदण्यांचे
रवि-चंद्र तिथे आहे
अवसेस का पसारा
ओहटी मागतो आहे
शत रंग जिवाच्या पुनवेला
फेसात वाटतो आहे
परतून वाट येताना
वाळू सवे आणतो आहे
हा वारकरी भजनात दंग
भवभान विसरतो आहे
रत्नाकर अवघा ओंजळीत
प्राणास शोधतो आहे
डोळ्यांमधले आड गहीरे
दडलंय काय तळाशी
शोधत फिरती मधुमेणास्तव
भ्रुंग रसिक मधमाशी
निळ्या आकाशी पूर्ण शशी
अस्वस्थ तरूण उपाशी
रत्नाकर विहरे मेघांवर
उसळे लाट अधाशी
व्यग्र चक्र रसनांचे हे
चाळा एकांत मनाशी
सर वळवाची सोनेरी
म्रुदगंध मदन शर मनोहरी
कोकीळ स्वरांची जरतारी
नक्शी काळीज जिव्हारी
चांदण्या विखुरल्या लिंबाच्या
झुळुकेत सुगंधी जल लहरी
स्पर्शात जिव्हाळा पुनवेचा
मन संमोहित दरबारी
पाऊलखुणा गत शकुनाच्या
मी न कवी व साहित्यिकही
तरी लेखणी झिजते
मलाही सम्भ्रम व्ह्रुदयवरती
कोण अनामिक लिहिते
धुन्द परी अस्वस्थ
तळाशी मी मझी नसते
प्रसवाअन्ती एक मात्र
हळवी व्यकुळ होते
स्मरते ना हे कोण करविते
मन कसाविस होते
मूळ प्रेरणा तीस एकदा
संवाद साधण्यासाठी आम्हाला
'बाहेरचं ' कुणीतरी हवं असतं,
घरातल्यांबद्दल म्हणाल तर
बोलण्यासारखं काहीच नसतं.
काळजी, समस्या, दु़:ख, हुरहुर
हे रोज आमच्याही मनात दाटतं,
म्हणून सिरियल पाहतांना काळीज
प्लॅस्टिकच्या पिशवीसारखं फाटतं.
आत्मा आणि ईश्वर यान्चा सन्गम म्हणजे आई.
आई शब्दातच सारे विश्व !
आईच्या मायेच आभळ
नेहमी निळ असत,
काळ भोर नसत कारण;
ते बिचर भोळ असत.
आत्मा आणि ईश्वर यान्चा सन्गम म्हणजे आई.
आई शब्दातच सारे विश्व !
आईच्या मायेच आभळ
नेहमी निळ असत,
काळ भोर नसत कारण;
ते बिचर भोळ असत.
दिनांक १८ एप्रिल २००८ रोजी भरत नाट्य मंदिर, पुणे येथे कविवर्य सुरेश भट ह्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुशायरा आयोजित करण्यात आला आहे.