Submitted by अज्ञात on 26 May, 2008 - 05:23
डोळ्यांमधले आड गहीरे
दडलंय काय तळाशी
शोधत फिरती मधुमेणास्तव
भ्रुंग रसिक मधमाशी
निळ्या आकाशी पूर्ण शशी
अस्वस्थ तरूण उपाशी
रत्नाकर विहरे मेघांवर
उसळे लाट अधाशी
व्यग्र चक्र रसनांचे हे
चाळा एकांत मनाशी
खेळ हव्याशा स्वप्नांचा हा
चिरंजीव अविनाशी
....................अज्ञात
१२०३,नाशिक
गुलमोहर:
शेअर करा
छानच !
छानच ! अतिशय अर्थपूर्ण !
दान पावलं
दान पावलं
फारच छान !
फारच छान ! कविता आवडली
थँक्स
थँक्स रवी,
उत्साहाला सावली दिलीस......!
छान
छान