Submitted by अज्ञात on 27 May, 2008 - 01:01
आकाश चांदण्यांचे
रवि-चंद्र तिथे आहे
अवसेस का पसारा
ओहटी मागतो आहे
शत रंग जिवाच्या पुनवेला
फेसात वाटतो आहे
परतून वाट येताना
वाळू सवे आणतो आहे
हा वारकरी भजनात दंग
भवभान विसरतो आहे
रत्नाकर अवघा ओंजळीत
प्राणास शोधतो आहे
एकांत किती वेंधळा
वेद शब्दात मांडतो आहे
अथांग सागर एकटाच
डोळ्यांत सांडतो आहे
......................अज्ञात
११९७, नाशिक
गुलमोहर:
शेअर करा
व्वा क्या
व्वा क्या बात है !