निशब्द
प्रेमात पडल्यावर
शब्दांना विसरायचं असतं,
डोळ्यांनी बोलायचं आणि
ओठांनी हसायचं असतं.
प्रेमात पडल्यावर
शब्दांना विसरायचं असतं,
डोळ्यांनी बोलायचं आणि
ओठांनी हसायचं असतं.
शब्द आले होते ओठी
गेले सांगायचे राहुन
भाव मनातले माझ्या
गेले द्यायचे राहुन.....
आला श्रावण, वसंत
गेले उमलायचे राहुन
नभ आले या नभात
गेले बरसायचे राहुन
भोवताली सुख किती
गेले हसायचे राहुन
आले मरण दारात
गेले जगायचे राहुन
आधुनिकतेच्या नावाखाली
ओली भावना झाली सुकी,
सारखं सारखं लावुन
`बाम' ला ही झाली डोकेदुखी.
- राजीव पटेल
Welcome,Thank you
Beg your pardon,
सुन्दर मराठमोळ्या बागेचं
झालंय Hanging Garden.
- राजीव पटेल
हिरव्या मखमालीतून झिरपते ऊन
केशरी मातीवर सोनेरी गोन्दून
सळसळत्या वार्याची सनई धून
पोपटी नक्शी एकमेकात गुंफून
इवल्याश्या डोक्यावर मोळीचा भार
ठेचांच्या पायावर काट्यांची धार
मळकट पातळात लेकराचे घर
सावलिस या माझ्या
भिति माझिच वाटते
एकाकि जिवनाचि
साक्ष ति मज देते
मि बावरता क्षणभर
माझ्याहुन मोठि होते
अन उदास हसुन
लुप्त कोठे ति होते
सावलिस माझ्या....
लपंडाव जगण्याचा
माझ्याशि ति खेळ्ते
अंधार येता पांघरुनि
झाडे पाने ती ओलेति
फुले पाकळ्या डोलती
हिरव्या त्या ओठांवरी
मोती टप्पोरं गळती ||
दाही दिशांनी व्यापिले
कण कण शहरले
चिंब पावसाने सारे
नव्चैतन्य हासले ||
मोर नाचती अंगणी
चहूकडे झाले पाणी
सहज आले माझ्या मनी
गाऊ पावसाची गाणी
कळत नाही तुझं वागणं
गूढ ,अथांग समुद्रासारखं,
कधी उंच लाटांवर उचलणारं
तर कधी बुडवणारं खोल खोल डोहात
कळत नाही तुझं वागणं
न सुटणार्या कोड्यासारखं,
कधी चटकन उलगडणारं
तर कधी गुंतवणारं न उकलणार्या गुंत्यात