सावलि

Submitted by प्रिती on 14 December, 2007 - 04:50

सावलिस या माझ्या
भिति माझिच वाटते
एकाकि जिवनाचि
साक्ष ति मज देते

मि बावरता क्षणभर
माझ्याहुन मोठि होते
अन उदास हसुन
लुप्त कोठे ति होते
सावलिस माझ्या....

लपंडाव जगण्याचा
माझ्याशि ति खेळ्ते
अंधार येता पांघरुनि
लुप्त कोठे ति होते
सावलिस माझ्या...

खेळ संपता संपता
माझ्यासमवेत निजते
त्याक्षणि मिलनाच्या
भिति न तिज वाटते
सावलित माझ्या मिच लुप्त होते

प्रिति

लिखाण अशुध्द वाटेल जरा संभाळुन घ्या.

गुलमोहर: 

प्रिती, कविता छानच आहे. पण तुमचे पहिल्या वेलांटीवर अंमळ जास्तच प्रेम दिसतेय. ते तेवढे सुधारुन घ्या. Happy