चातक
चातकान कशाला उगीचच
पावसाच्या आशेवर जगावं
बिनधास्त होवून कधी तरी
तळ्याकाठच्या पाण्यावरच भागवाव..
चातकान कशाला उगीचच
पावसाच्या आशेवर जगावं
बिनधास्त होवून कधी तरी
तळ्याकाठच्या पाण्यावरच भागवाव..
ऋतू
अजून लक्षात आहे,
तुझ्या ऋतूंचा बहर...
ईवल्याश्या स्पर्शाने फूल होणे..
तर कधी
कोवळ्या जखमेवरी पानगळीची झूल होणे..
ते सारे घनगर्द लपेटून
चिरंतन उबेत नि:शब्द निजताना
एक मूक आभाळ चहू दिशांनी भरून येणे..
आठवांचा शाप बाधे
घाव कंठ भेदणारा...
उरफाड्या अन् उमाळा
श्वास खोल कोंडणारा...
न कोणी आशा मनाशी
नच् भास कोणी भावणारा...
दुर्लक्षिताचे जिणे असे...
मी दुर्लक्ष सारे वेधणारा...
भाळावरच्या रेषांमागे
मी वाट माझी मांडणारा...
२ दिवसांन पुर्वी मी ऑर्कुटवर मरठी कविता ही कम्युनीटी जॉईन केली.. बर्याच वर्षा पुर्वी मायबोलीवर लिहीलेली कविता आज मी तिथे पोस्ट केली.
ध्यास
इट्ट्ल इट्टल म्हनता, मन पार येडं झालं
ध्यास लागला नामाचा, मन खुळावून ग्येलं
हितं तितं सारीकडं, दिसे इट्टल सावळा
झाडा पाना फुलामंदी मज भासाया लागला
वाटे साजिरी फुलांनी, करू पूजा या द्येवाची
वेचीत पाकळ्यांना ह़ळुवार सांज झालि,
शोधित त्या फुलांनां विरहात रात्र गेलि.
मागची काही वर्षं जरा depression मध्ये गेली.
मी कदाचित कोणी कवयित्री नाही. पण अशाचं मनःस्थितीत असताना ,एका दिवशी (२००२ साली), काहीतरी खरडलं होतं. ते लिहीत आहे.
बोथट झालेल्या जाणिवांना
एकदा चांगली धार लावूया म्हाटलं.
तु भेटावीस म्हणुन रोज याच चवथर्यावर येतोय
तु भेटशील नक्की असे तो चवथरा देखिल म्हणतोय
तिच रात्र अन तोच तुज्या आठवणीचा दिवस
तु नक्की परत येशील असे तेच भाबडे नवस
तुजा विरह आत मला सहन होत नाही