दुर्लक्षिताचे जिणे

Submitted by nikhilmkhaire on 18 September, 2008 - 09:11

आठवांचा शाप बाधे
घाव कंठ भेदणारा...
उरफाड्या अन् उमाळा
श्वास खोल कोंडणारा...

न कोणी आशा मनाशी
नच् भास कोणी भावणारा...
दुर्लक्षिताचे जिणे असे...
मी दुर्लक्ष सारे वेधणारा...

भाळावरच्या रेषांमागे
मी वाट माझी मांडणारा...
वाहत्या मदिरेत मग
मी क्षुद्र होऊन वाहणारा...

..
निखिल.

गुलमोहर: 

छान मांडलीय व्यथा. मस्त.

भाळावरच्या रेषांमागे
मी वाट माझी मांडणारा...
वाहत्या मदिरेत मग
मी क्षुद्र होऊन वाहणारा
!!!

ही तुमच्या इतर कवितांइतकी सहज नाही वाटली.

!