असंच खरडलेलं....

Submitted by Anaghavn on 18 June, 2008 - 02:31

मागची काही वर्षं जरा depression मध्ये गेली.
मी कदाचित कोणी कवयित्री नाही. पण अशाचं मनःस्थितीत असताना ,एका दिवशी (२००२ साली), काहीतरी खरडलं होतं. ते लिहीत आहे.

बोथट झालेल्या जाणिवांना
एकदा चांगली धार लावूया म्हाटलं.
पण काही केल्या जाणिवेचं एकही टोक हाती लागेना.
एकाएकी बोथट होण्यासारखं झालं तरी काय?
एकाएकी? की मलाच नाही जाणवलं
त्यांच बोथट होत जाणं?

बर्‍याच वर्षांपुर्वीची माझी "मी"
जेव्हा मला आठवते,
तेव्हा आठवतं एक "वेडं मन"
वेडं? वेडं म्हणजे?
म्हणजे भाबडं.
कोणावरही मनापासुन प्रेम करु शकणार,
कोणावरही चटकन विश्वास ठेवणारं.
स्वत:वरही.

उगाच कुणाला दुखवु नये ही कळणारं.
आपल्या मनातला आनंद दुसर्‍याच्या मनात
निर्माण केला पाहीजे,ही जाणिव असणारं.

उत्कटतेच्या,निरागसतेच्या जाणिवेनं भरलेलं मन...
आज असं का वागतयं?
मन नसल्यासारखं?
त्याने त्याच्या मनावर स्वर्थाच्या पट्ट्या बांधल्या की अहम्पणाच्या?

थांब!!!
स्वर्थाच्या पट्ट्या तुझ्या मनावर बांधल्या गेल्या आहेत.
अहम्पणाचा दर्प तुज़्याच मनाला येतोय.
मी बघ, पुर्वीसारखाच तुझ्यासमोरुभा आहे--
निर्मळपणे.

जाणिवा बोथट झाल्या खर्‍या,
पण त्या पुन्हा नवी धार येण्यासाठी.
नव्याने तकाकी येण्यासाठी.
उशीर आहे तो फ़क्त तुला त्याची जाणिव होण्याचा.
पण फ़ार उशिर लावु नकोस.
माहीत आहे नं?
बोथट झालेल्या तलवारी गंजुन जातात.
कुठल्यातरी कोपर्‍यात धुळ खात बसतात,
कुणाचही लक्श न जाण्यासाठी--
अगदी मालकाचंही.
ये,तुझं मन तुझ्या वाटेवर डोळे लावुन बसलयं
पण थांब,येण्या आधी थोडसं अजुन ऐक.
तुझ्या भाबड्या मनावर एक तकाकी आलीये--आत्मविश्वासाची.
हे मन आत निर्भय बनलय.
त्या मनाला फ़क्त तुझी साथ हवि आहे.
तुच म्हाणायचीस ना,
माझा देव कुठल्याही देवळात नाही,
कुठल्याही मुर्तीत नाही--माझ्याच मनात आहे!!
मग ये--
पुर्णत्वास जाण्यासाठी
एकमेकांशिवाय आपण
अपुर्ण आहोत.

अनघा

गुलमोहर: 

आवडली कविता!! डिप्रेस्ड असताना असेच काहीतरी विचार येत असतात.. कॉन्फीडन्सची खरोखर गरज असते ऑक्सिजन सारखीच!

छान!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अत्तराची कुपी संपतानाच जास्त जपायची असते...

छान लिहिलं आहेस. मोकळं वाटलं असेल. मनात आलं की लिहावं. आम्हाला ऐकवावं.

खुप छान मांडला आहेस मनाचा प्रवास!!!!!!!
तो सुरुच असतो मनात.. पण नेमक्या शब्दात पकडला आहेस..
तुझ्यात आहे कविता... दे तिला पण तकाकी... Happy वाट बघतोय वाचण्याची... Happy

अनघा, ओथंबून आलं की बरसून जावं तसं... लिही, अजून लिही.

कदाचित फारच उशीरा लिहितोय मी हा प्रतिसाद.. वाचशील न वाचशील माहीत नाही तरीही.. डिप्रेस्ड असताना जर तू अस जर
छान लिहीत असशील तर छान मूडमध्ये कस लिहशील?

फारच सरळ सोपं लिहिलयस हे तू!
>>>
कोणावरही मनापासुन प्रेम करु शकणार,
कोणावरही चटकन विश्वास ठेवणारं.
स्वत:वरही.
उगाच कुणाला दुखवु नये ही कळणारं.>>> हा आपापला स्वभावधर्म म्हण किंवा काहीही हे असच असणं हीच खरी तकद असते! Happy

"The senses do not give us a picture of the world directly; rather they provide evidence for checking hypotheses about what lies before us"
Professor Richard L. Gregory.

बापरे !!
हे नवीन प्रतिसाद मी आजच वाचतेय. खुप बर.ब वाटतंय.
खरं सांगायचं तर मी "बर्यापैकी" लिहु शकते हा विश्वास मला तुमच्या या प्रतिक्रियांमुळे मिळाला.
खुप धन्यवाद.
अनघा

कुलदिप,
वाचला तुमचा प्रतिसाद. छान वाटलं खुप. नव्याने उत्साह वाटला लिहिण्याचा.
खुप धन्यवाद.
बाकी तुम्ही काय म्हणता, काय करता?
अनघा

अनघा,
depression एवढे छान ?
.. असे depression घेऊ नका.. असेच लिहा.. विनोदी पण
लिहीण्याचा प्रयत्न करा.
माझ्या एका मित्राला depression आलं होतं त्याने योगातले
'कपालभाती' 'अनुलोमविलोम' 'भ्रामरी' हे प्राणायाम केले...
दोन महिन्यात 'फ्रेश' झाला. मेडीसीनने शरीरावर दुष्परीणाम
होतात.
सुभाष

अनु,

तुझ्या पाऊलखुणांचा प्रवास सुरू केला (आज तुला सांगितल्याप्रमाणे :))
छानच केली आहेस की गं कविता.
सुचतं कसं तुम्हा लोकांना इतकं छान लिहायला? Happy

लिहीत रहा, माझ्या खूप शुभेच्छा! Happy

आशा भोसले म्हणतात्,सुखी माणूस कलाकार होउ शकत नाही.दु:खातुन पिळून निघाल्याशिवाय खरा कलाकार घदत नाहि.तसच तुझ काव्य आहे .लिहित रहा.शुभेछा.

वन्दना.

लिहीत रहा, माझ्या खूप खूप शुभेच्छा!

देवनिनाद