Submitted by dholeshi on 29 May, 2008 - 17:20
तु भेटावीस म्हणुन रोज याच चवथर्यावर येतोय
तु भेटशील नक्की असे तो चवथरा देखिल म्हणतोय
तिच रात्र अन तोच तुज्या आठवणीचा दिवस
तु नक्की परत येशील असे तेच भाबडे नवस
तुजा विरह आत मला सहन होत नाही
मला काय होतय ते सान्गता पण येत नाही
हाती उरलय फ़क्त तुज्यासाठी चवथर्यावर बसणे
डोळ्यातल्या अश्रुबरोबर तु येताना दिसणे
--------------------------------------शिवाजी ढोले
गुलमोहर:
शेअर करा