इच्छांच्या या आभाळाला
मर्यादा कोण घालेल
पुरे आता मला
अस कधि कोणी सांगेल...
माझ्यापेक्षा त्याच्याकडे फार
सर्वच जण म्हणतात
माझ्यातल थोड घे
अस कधि कोणाला सांगतात...
अर्धा भरलेला प्याला सर्वांचा
पुर्ण भरु पाहतात
पुर्ण रिता करण्याचा
ध्यास कधि घेतात
मी हे का लिहितेय
मी हि अशिच एक
जीवनाच्या आभाळामधिल
इच्छांनी भरलेला मेघ....
प्रिति
एकटाच चालतोय मी
एकटाच चालत जाणार
पैशांमागे पळतापळता
एकटाच मी रहाणार
मला हवि प्रसिद्धि
प्रसिद्ध मी होणार
व्याकुळ हाक तुझि
कधि ऐ़कु मज येणार
एकटाच मी रहाणार
मज हवे कौतुक
अनेकजण करणार
प्रेमाचे शब्द तुझे
त्यासमोर तुच्छ मज वाटणार
एकटाच मी रहाणार
माझि स्पर्धा स्वतःशी लागलि
मी मजच हरवणार
थांबायचे कोठे हे मज न माहित
मी न कोठे थांबणार
एकटा न होतो कधि हि
परी एकटाच मी रहाणार
एकटाच मी रहाणार...
१)सुर, ताल, लय यांचा
छंद मना लागला
साज - आवाज यांचा
जीवनी सुर ऊमगला
२) आतुरलेल्या नयनांनि
वाट तुझी पाहते
मनीमानसी माझ्या
मुर्ति तुझिच विराजते
मी साद तुला देते
प्रतिसाद माझा होशिल का...
नयनि स्वप्न तुझे पाहते
तु स्वप्न होऊन राहशिल का...
मी नित्य होऊन रातराणि
रात्र हि जागते
सुवास होऊन दरवळताना
ध्यास तुझाच घेते
स्पर्श तुझा होता
मोरपिसारा फुलते
मन वेडे धुंद होऊनि
थुईथुई नाचते
१) साद तु देशिल
अशी आस मी किती बघु
ओथंबलेल्या डोळ्यांमधिल
अश्रु कुठवर पुसु...
२) धुंद त्या दिवसांची
आठवण आज झालि
नकळत माझ्या जेव्हा
स्मरणात तु आलि...
३) तुझ्या बरोबरीचा अबोला
आनंद मला देतो
तु नसताना हि जवळ
तो सोबत माझि करतो....
४) तुझसवे निरंतर जगण्यासाठी
हळुवार क्षण मी जपत होतो
तु होतीस तेव्हा
मी खरच जीवन जगत होतो...
प्रिति
खुप काही मिळुन सुद्धा
अजुन काही हव असत,
चान्द्ण्यानी भरुन देखील
आपल आभाळ रितच असत.
१) पक्ष्यांचां हल्ली आवाज
कानावर खुप कमी येतोय..
तुझ्या आठवणीचां थवा मात्र
माझ्या कायम सोबत राहतोय.
२) जीवनात प्रत्येक गोष्ट
खूप संघर्ष करुन भेटते
तू मला किती सहज...,
भेटलीस!
३) तू काल भेटलीस
तेव्हा बागेतली फुले फुलली,
आज तू आली नाहीस..
म्हणून वेडी ती ही रुसली!
४) खरंच ना तुझं माझं नातं
किती वेडं आहे...
प्रत्येक ॠतूत सतत
फुलणारे गुलमोहराचे झाड आहे.