चारोळ्या

Submitted by प्रिती on 19 January, 2010 - 03:51

१) साद तु देशिल
अशी आस मी किती बघु
ओथंबलेल्या डोळ्यांमधिल
अश्रु कुठवर पुसु...

२) धुंद त्या दिवसांची
आठवण आज झालि
नकळत माझ्या जेव्हा
स्मरणात तु आलि...

३) तुझ्या बरोबरीचा अबोला
आनंद मला देतो
तु नसताना हि जवळ
तो सोबत माझि करतो....

४) तुझसवे निरंतर जगण्यासाठी
हळुवार क्षण मी जपत होतो
तु होतीस तेव्हा
मी खरच जीवन जगत होतो...

प्रिति Happy

गुलमोहर: