Submitted by प्रिती on 3 February, 2010 - 03:36
इच्छांच्या या आभाळाला
मर्यादा कोण घालेल
पुरे आता मला
अस कधि कोणी सांगेल...
माझ्यापेक्षा त्याच्याकडे फार
सर्वच जण म्हणतात
माझ्यातल थोड घे
अस कधि कोणाला सांगतात...
अर्धा भरलेला प्याला सर्वांचा
पुर्ण भरु पाहतात
पुर्ण रिता करण्याचा
ध्यास कधि घेतात
मी हे का लिहितेय
मी हि अशिच एक
जीवनाच्या आभाळामधिल
इच्छांनी भरलेला मेघ....
प्रिति
(या कवितेसाठी शीर्षक देण्यास माझि मदत करा ... प्लिज )
गुलमोहर:
शेअर करा