Submitted by swaroopasamant on 14 December, 2007 - 04:48
झाडे पाने ती ओलेति
फुले पाकळ्या डोलती
हिरव्या त्या ओठांवरी
मोती टप्पोरं गळती ||
दाही दिशांनी व्यापिले
कण कण शहरले
चिंब पावसाने सारे
नव्चैतन्य हासले ||
मोर नाचती अंगणी
चहूकडे झाले पाणी
सहज आले माझ्या मनी
गाऊ पावसाची गाणी
गाऊ पावसाची गाणी ||
गुलमोहर:
शेअर करा
सुरेख
स्वरुप फारच छान कविता. अगदि पावसात भिजल्याचा आनंद दिलास