कोण अनामिक

Submitted by अज्ञात on 23 May, 2008 - 02:28

मी न कवी व साहित्यिकही
तरी लेखणी झिजते
मलाही सम्भ्रम व्ह्रुदयवरती
कोण अनामिक लिहिते

धुन्द परी अस्वस्थ
तळाशी मी मझी नसते
प्रसवाअन्ती एक मात्र
हळवी व्यकुळ होते

स्मरते ना हे कोण करविते
मन कसाविस होते
मूळ प्रेरणा तीस एकदा
भेटावे वाटते

..............अज्ञात

गुलमोहर: 

कविता छानच आहे. अजून खजिना असल्यास तो आमच्यासाठी मोकळा करावा...

मन्या,
नग भरपूर आहेत, त्यांना खजिना म्हणायचं की काय ते तुम्ही ठरवायचं.
काल तीन-चार टाकल्यात. सांग काय वाटतं ते.
प्रतिसाद हा प्रयेसीच्या फोनइतकाच प्रिय वाटायला लागलाय.