Submitted by अज्ञात on 28 May, 2008 - 01:12
कुशीत ज्या खेळले बाळपण
बागडली अंगाई
साहवे न वार्धक्य तिचे
बघ जीर्ण जाहली आई
तोच जिव्हाळा तीच माऊली
खंड त्यात नाही
निश्पर्ण वृक्ष वठलेला जणु
मन-उरात लाही लाही
सुरकुतलेला स्पर्श गात्र थकलेली,
परि उधाणलेली माई
डोळ्यांत खोल स्वप्ने जरतारी
पाखरांसवे पाही
सण हळवेले पण अमृतमय,
भेटीत सुखाची राई
क्षण सोन्याचा एक एक
शैशवात घेउन जाई
मीच आता झालोय आजोबा
ती पणतीची पणजी
सावलीस सावली पोरकी
खंत आज आहे ही....
....................अज्ञात
१२२९,नाशिक
गुलमोहर:
शेअर करा
अतिशय
अतिशय अतिशय सुंदर कविता, अज्ञात. मुळात किती सुंदर कल्पना आणि अप्रतिम शब्दात, छंदबद्ध कविता म्हणून उतरलीये.... सावलीस सावली पोरकी.... व्वा!
छान लिहिताय.
अतीशय
अतीशय सुंदर!
दाद आणि
दाद आणि यडा का खुळा,
दोघांनाही धन्यवाद.
सावलीस
सावलीस सावली पोरकी.... एकदम आफलातून कल्पना. बढीया बॉस !
थँक्स
थँक्स मन्या,
शब्द नाहीत
शब्द नाहीत कौतुकाला
झेललेस तु मम भावनाना
माय सोडुनी गेलि मला
स्पर्ष तिचा मी पुन्हा जागला.....................
सुरेख
सुरेख कविता..
कुशीत ज्या खेळले बाळपण
बागडली अंगाई
साहवे न वार्धक्य तिचे
बघ जीर्ण जाहली आई......
पहिल्या
पहिल्या अभिप्रायाबद्दल आभार. तुम्ही पठवलेले फोटो छान असतात.
.............................अज्ञात
छानच! सहज
छानच! सहज सुंदर !!
परागकण
अरेच्चा !!
अरेच्चा !! किती दिवसांनी आलाय हा प्रतिसाद.!! तब्येत खुष झाली की एकदम !!!
थँक्स. कधिकाळि का होईना भेटत जा . 
मस्त वाटलं सकाळी सकाळी.