मी हवामानशास्त्र, शाश्वत विकास, शेती यापैकी कुठल्याही क्षेत्रातली तज्ञ नाही. उत्सुकतेतून जे काही वाचलं, त्यातून जेवढं मला समजलंय ते इथे शेअर केल्यावाचून राहवलं नाही, म्हणून हे लिहिलंय. पाणी वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो याविषयी, दुष्काळाविषयी आधीच धागे निघालेले आहेत. त्यामुळे इथे फक्त पाणी प्राश्नाची व्याप्ती, आणि दुष्काळ नसला तरी काय होतंय यावर भर देण्याचा प्रयत्न आहे.
नशिबाची हंडी
महाग झालंय जगणं जणू
वागणं सुध्दा बदललं आहे
अन् हर्षभरित मनालाही
परिस्थितीने आदळलं आहे
अंकुरलेली खुशी देखील
का अशी ही खुडली आहे,.?
अन् नशिबाची हंडी सुध्दा
दुष्काळानं फोडली आहे,.!
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
मुसळधार पाऊस
दुर-दुरच्या पावसाचीही
दुर-दुरून चौकशी आहे
अन् चार-चार थेंबांचीही
मना-मनाला खुशी आहे
इकडून तिकडे,तिकडून इकडे
बातम्यांची गर्दी दाटू लागली
अन् टिपकणारी रिमझिमही
हल्ली मुसळधार वाटू लागली
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
दुष्काळी परिस्थितीत
जे अनुभवत असतात
त्यांनाच तर कळतो
जीवघेणा दुष्काळ हा
किती-किती छळतो
परिस्थितीचे भान ठेवुन
माणूसकीचा फिरवा वारा
दुष्काळी या परिस्थितीत
एकमेकांस सहाय्य करा
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
फ्लेमिंगो दर्शनासाठी गेले तेव्हा खाडीच्या रस्त्याला ह्या वटवट्याचे दर्शन झाले. साधारण चिमणी एवढा किंवा लहान म्हणा ह्याचा आकार. खुप अॅक्टीव्ह आहे हा पक्षी आणि धीटही. हा पळेल म्हणून मी भराभर फोटो घेत होते पण मला आजिबात न घाबरता ह्याने फोटो काढून दिले. अर्थातच ह्याच्या आवाजामुळे ह्याला वटवट्या हे नाव पडले आहे. गवत-झुडुपावरील किडे ह्यांचे भक्ष असते.
हा वटवट्या
१)
दुष्काळी दौरे
कुणी समर्थन करतील
कुणी विरोध करतील
कुणी दुष्काळी दौर्यावर
वादंगी बारूद भरतील
ज्याच्या त्याच्या नजरेमधून
नव-नवे वारे वाहिले जातील
अन् वेग-वेगळ्या विचारांनुसार
दुष्काळी दौरे पाहिले जातील
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
नमस्कार,
बि-बियाणे ,त्यांचे उत्पादन आणि त्याचे नंतर होणारे सामजिक परिणाम ,ह्या विषयावर माझे मित्र डॉ.श्री.उमेश मुंडल्ये ह्यांनी पाठवलेला लेख.
शेतकऱ्यांचे प्रश्न फक्त ग्रामीण भागातले असे आहेत असे मानणार्यांचा एक मोठा वर्ग आपल्याकडे आहे.त्यांना ह्या प्रश्नांचे सामाजिक परिणाम दाखवणारा लेख आहे.
डॉ.उमेश मुंडल्ये स्वतः वनस्पतीशास्त्र,पाणी ,पर्यावरण विषयात नावाजलेले तज्ञ आहेत.पाणी संवर्धन ह्या विषयात महाराष्ट्रात अनेक गावात,शहरात ते काम करतात.त्यांनी ह्या लेखात स्वतःकडील माहिती दिलेली आहे.
अंबर
विदर्भातील आत्महत्त्यांचे कृषि किर्तनकार श्री.महादेव भुईभार यांनी केलेले मार्मीक विश्लेषण!
कवी,वात्रटिकाकार " विशाल मस्के" यांची दुष्काळी दौर्याच्या निमित्ताने दुष्काळग्रस्तांच्या भावना प्रखरपणे मांडणारी हि एक वात्रटिका,...
******* तडका-९९९ *****
भावना दुष्काळग्रस्तांच्या,...
काळी माय बी तडफतीया
मनं आमचे होरपळले आहेत
शेतामध्येही फिरून पहा
फडच्या फड वाळले आहेत
शेतात जायची हिंमत नाही
घरातल्या घरात वागतो आहोत
मरण दारात येऊन थांबलंय
मरणाच्या दारात जगतो आहोत
आग पडली काळजात साहेब
उमेदही आचक्या देती आहे
जगणं कुठवर पुरणार आमचं
आमच्याच मनाला भीती आहे
मरत मरत जगतो आहोत
पण जनावरांना पोसावं कसं
त्यांनीच आजवर पोसलंय आम्हा
आता आम्ही गप्प बसावं कसं
महाराष्ट्रात यंदा विशेष पाऊस झालेला नाही. उरलेल्या दिवसांत तो पुरेसा होईल असेही काहीजण म्हणत आहेत आणि यंदा पाऊस दगा देणार असेही काहीजण म्हणत आहेत. काल तर असे समजले की येते दशकभर हा पाऊस कमी असण्याचा प्रश्न सतावण्याची शक्यता असून त्या प्रश्नाचे पुढचे स्वरूप कल्पनेपेक्षाही उग्र, भयानक असेल.
दात कोरून पोट भरता येत नसले तरी पाणीबचत हा जीवनशैलीचा, दिनचर्येचा एक अविभाज्य भाग बनवण्याचा काळ केव्हापासूनच आलेला आहे. आता त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. अजून दोन महिन्यांनी आणखीन जाणवतील आणि नंतर दिवसेंदिवस कदाचित अधिकच! पाऊस पडला तर मात्र विशेष परिणाम जाणवणार नाहीत.