एका छोट्याश्या गावात श्रावणी आणि राधा नावाच्या दोन बहिणी राहत होत्या. श्रावणी १० वर्षांची तर राधा तिची छोटी बहीण शेंडेफळ. त्यांच्या दारासमोर छोटीशी बाग होती. श्रावणी आणि राधा आपल्या आई-बाबांसोबत रोज झाडांना पाणी घालताना, त्यांची मशागत करताना सोबत असायच्या. मध्ये मध्ये त्या स्वतःही काही झाडांना पाइप घेऊन पाणी घालायच्या. श्रावणी कुंडीत, झाडाजवळ पाण्याचा पाइप आणून द्यायची तर चिमुकली राधा पाण्याची धार कुंडीत, झाडाला टाकायची असे दृश्य बर्याचदा असे. आई बी किंवा रोपे लावत असताना आईने केलेल्या छोट्या खड्यात बी टाकायचे काम दोघी करायच्या.
स्वागत पावसाचे
दुष्काळलेल्या धरणीवरती
तो जोमा-जोमाने बरसला
तो क्षणही सुखावला मग
जो त्यासाठी होता तरसला
पडल्या दमदार पावसामुळे
मनी आशा चुकचुकली आहे
पावसाचे स्वागत करण्याला
मानवजात उत्सुकली आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
'अजून पोचायला तासभर तरी लागेल तुम्हाला.. या तुम्ही सावकाश.. वाट बघतो ' समोरून आम्हा मुंबईकरांची वाट पाहत असणाऱ्या पुणेकरांपैंकी एकाचा फ़ोन.. आमची गाडी एव्हाना कळसूबाई शिखराच्या बाजूने जात होती.. रात्रीच्या शीथल चांदण्यात निद्रिस्त झालेले ते उत्तुंग शिखर खूपच मोहक वाटत होते.. मनोमन प्रणाम करून आम्ही पुढे निघालो.. मुंबईहून दोन गाडया निघाल्या होत्या.. लवकरच राजूरला एका फाट्याजवळ पोचलो.. जिथे पुणेकरांची टेंपो ट्रेवलर आमची वाट पाहत थांबली होती..
पोळा,...
दुष्काळानं होरपळलोय
ना पडला आहे पाऊस
चंगाळे,झूल,वारनेसची
कशी करावी हौस,...?
माझ्या परिस्थितीचा आढावा
बैलालाही कळला आहे
त्याच्यासह माझ्या मनाला
पोळा आज पोळला आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
पत्रास कारण की,...
पोशिंदाही पिचलाय आज
आमच्या मनात सल आहे
का जीव होतोय नकोसा
का मरण्या इतपत मजल आहे
तुम्ही अश्रु पुसु शकतात
याबद्दल मुळीच दुमत नाही
पण पत्रास कारण की,
आता बोलायची हिंमत नाही
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
सल्ला महत्वाचा
काळ्या काळ्या ढगांनी
मनी हर्ष दाटत आहेत
थेंब-थेंब पावसाचेही
जनी जल वाटत आहेत
दुष्काळंच दाटलाय अजुनही
भविष्यात पाणी टिकलं पाहिजे
थेंब-थेंब पाणी वाचवुन वाचवुन
पाणी जपायला शिकलं पाहिजे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
निसर्ग सारा गातो गाणे...
रंग चोरुनी आभाळाचे
सजली वेडी रानफुले
मृद्गंधाच्या अत्तरातुनी
गंधित झाले रान खुळे
सरसर येता थेंब टपोरे
पाते हिरवे घेत झुले
लाटा उठती आनंदाच्या
सळसळीतुनी ऊन खुले
कंठी येती गाणी कुठली
पाखरांसही भूल पडे
निसर्ग सारा गातो गाणे
रोमांचित हे मन झाले....
पाऊस वार्ता
पडत्या थेंब-थेंब पावसाने
आता मनं सुखावत आहेत
मना-मनातील उत्स्फूर्तानंद
मना-मनात ना मावत आहेत
प्रसार माध्यमातुन प्रसारत
सुख वाटले जात आहेत
पाऊस नाही आला तरीही
पाऊस वार्ता येत आहेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३