तडका - मुसळधार पाऊस

Submitted by vishal maske on 5 September, 2015 - 10:27

मुसळधार पाऊस

दुर-दुरच्या पावसाचीही
दुर-दुरून चौकशी आहे
अन् चार-चार थेंबांचीही
मना-मनाला खुशी आहे

इकडून तिकडे,तिकडून इकडे
बातम्यांची गर्दी दाटू लागली
अन् टिपकणारी रिमझिमही
हल्ली मुसळधार वाटू लागली

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो मला पण आवडला. मस्केन्च्या चारोळ्याना आता अर्थ यायला लागलाय.( पूर्वी होता, पण त्यानी ऋ टाईप धडाधडा रतिब घातला, आणी तो ओसन्डुन वाहु लागला होता)