पत्रक
लेखनस्पर्धा २०१३ - स्पर्धेचं स्वरूप आणि नियम
भूतकाळाच्या खांद्यांवर पाय रोवूनच वर्तमानकाळ उभा असतो आणि आपण आज जे वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्य जगतो, त्यातून आपला भविष्यकाळ आकार घेत असतो. त्यामुळे भविष्यकाळाकडे नितळपणे पाहता येण्यासाठी गतकाळातल्या घटनांचा, व्यक्तींचा मागोवा घेणं, या घटनांचा व समकालीन घटनांचा अन्वयार्थ लावणं, हे नेहमीच श्रेयस्कर असतं.
हे लक्षात घेऊनच रोहन प्रकाशनाच्या सहकार्यानं मायबोली.कॉमनं आयोजित केली आहे एक लेखनस्पर्धा. तुमच्या प्रवेशिका १० जुलै ते २५ ऑगस्ट, २०१३, या कालावधीत देऊ शकता.
****
चूल माझी सखी
कळायला लागल्यापासूनच माझ्या भातुकलीचा श्रीगणेशा व्हायचा तो चूल मांडूनच. तीन दगड त्रिकोणी मांडले की झाली चूल. भातुकली खेळताना चुलीसाठी शिंपल्या किंवा खुबड्या वापरायचे. त्या आकाराने सारख्या असल्याने भांडी व्यवस्थित बसायची. मग त्यात छोट्या काड्या लाकडे म्हणून टाकायच्या आणि त्यावर खेळण्यातली भांडी ठेवून खोटे-खोटे जेवण शिजवायचे.
अधिवेशनामागचे चेहरे: श्री. संजय सहस्रबुद्धे
यंदाच्या अधिवेशनाच्या संयोजनात तुमची भूमिका काय आहे?
श्री सहस्रबुद्धे: मी २०१३च्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाचा खजिनदार म्हणून काम करतोय. त्याचबरोबर मी न्यू इंग्लंड मराठी मंडळाचासुद्धा खजिनदार आहे. या दोन वेगवेगळ्या जबाबदार्या आहेत.
त्या संदर्भात तुमच्या विभागातल्या काही ताज्या किंवा नवीन घडामोडी सांगू शकाल का?
सायकलविषयी सर्व काही ४ (सायकल चालवताना आणि देखभाल)
गेल्या काही भागात दिलेल्या माहीतीचा काही जणांना तरी सायकल घ्यायला मदत झाली असेल. आता सायकल खरेदी झालीये, बरोबर एक्सेसरीज पण घेतली आहे. आता काही सायकलींगच्या आणि मेंटेनन्सच्या टीप्स....
एक सूचना - मी काही यातला तज्ञ वगैरे नाही. आंतरजालावर माहीती घेऊन आणि माझे काही अनुभव असे मिळून माबोकरांसाठी मी ही माहीती देत आहे.
मुलाखत - श्रीमती मोनिका कुलकर्णी - संस्थापिका "आजोळ"
आधुनिक जमान्यात आपापल्या नोकरी-व्यवसायांत व दिनचर्येत व्यस्त असणार्या पालकांसाठी वरदान ठरतात ती सुसज्ज व सुविधापूर्ण पाळणाघरे! आपले मूल आपल्या अनुपस्थितीत तेवढ्याच काळजीने व मायेने वाढविले जाणे, त्याला घरात वाटणारी सुरक्षितता व आश्वासन पाळणाघरातही वाटणे आणि तेथील वातावरण हे त्याच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक व भावनिक विकासासाठी पूरक असणे ही आजच्या काळातील पालकांची गरज आहे. जन्मदात्या मात्या-पित्यांच्या गैरहजेरीत मुलांचे मायेने संगोपन करणार्या संस्थांमध्ये व्यावसायिक सफाई व दर्जात्मकता आणून कालानुरूप नवा कल आणणार्या पुणे शहरातील पाळणाघरांमधील एक अग्रगण्य नाव म्हणजे ''आजोळ''.
आंबापुराण
कडक उन्हाळ्याने समस्त मनुष्यप्राणी हैराण आहे, उकाड्याने त्रस्त, घामाने बेजार, तहानेने कासावीस झालेल्या या मानवास सुटकेचा मार्ग तरी कोणता?? हा उन्हाळा सहनीय कसा करायचा असा प्रश्न पडायचा, सुट्ट्यांचा मौसम पण सुरु झालेला, पाहुण्यांच्या टोळधाडीची धास्तीने घराघरात बेचैनी. घराघरातून टाहो फुटत होता की ''वाचव आम्हाला, हे भगवंता"!! तेव्हा दरवर्षी अशा समस्त त्रस्त भक्तांना त्रासातून सुटका अथवा अल्पकालीन आराम देण्याकरता भगवंत फळांच्या राजाच्या रुपात, अर्थातच आंब्याच्या रुपात पृथ्वीतलावर अवतारीत होतात.
अशा या माझ्या अत्यंत आवडत्या फळाला माझ्यातर्फे हा नमस्कार.
अपरिचित, पण अफलातून - ‘कांब्रे लेणी’
सह्याद्रीत भटकंतीमध्ये आपली सोबत करतात - इतिहासाची स्मरणं अन् या मातीतल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाच्या पाऊलखुणा! कधी प्राचीन सागरी बंदरं, जुन्या व्यापारी वाटा, कोकण व देश या भूभागांना जोडणा-या घाटवाटा; तर कधी संरक्षणार्थ बांधलेले दुर्ग/किल्ले, विश्रामासाठी अन् धर्मप्रसारासाठी कोरलेली लेणी हे सारं आपण समजून घेऊ लागतो. निसर्गाशी जुळवून घेताना जीवनसंस्कृती कशी विकसित होत गेली असेल, याचा अंदाज बांधू लागतो. विस्मृतीत गेलेल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा एका ‘अपरिचित, पण अफलातून’ कोरीव लेण्यांच्या रूपानं आम्हांला कश्या गवसल्या, त्याची ही कथा!
५१०००+ चाहते!! मनःपूर्वक धन्यवाद!!!
फेसबुकावरील मायबोलीच्या चाहत्यांची संख्या:
जानेवारी ३१, २०१२ : १००० + चाहते
मार्च १२, २०१२ : १०,००० + चाहते
सप्टेंबर १५, २०१२ : २५,००० + चाहते
एप्रिल २५, २०१३ : ५१,००० + चाहते
धन्यवाद, धन्यवाद !! तुम्ही अजून चाहते झाला नसाल तर लवकर व्हा!! https://www.facebook.com/Maayboli
-मायबोली प्रशासन