कडक उन्हाळ्याने समस्त मनुष्यप्राणी हैराण आहे, उकाड्याने त्रस्त, घामाने बेजार, तहानेने कासावीस झालेल्या या मानवास सुटकेचा मार्ग तरी कोणता?? हा उन्हाळा सहनीय कसा करायचा असा प्रश्न पडायचा, सुट्ट्यांचा मौसम पण सुरु झालेला, पाहुण्यांच्या टोळधाडीची धास्तीने घराघरात बेचैनी. घराघरातून टाहो फुटत होता की ''वाचव आम्हाला, हे भगवंता"!! तेव्हा दरवर्षी अशा समस्त त्रस्त भक्तांना त्रासातून सुटका अथवा अल्पकालीन आराम देण्याकरता भगवंत फळांच्या राजाच्या रुपात, अर्थातच आंब्याच्या रुपात पृथ्वीतलावर अवतारीत होतात.
अशा या माझ्या अत्यंत आवडत्या फळाला माझ्यातर्फे हा नमस्कार.
१) उनाची काहीली वाढत जाते तशातच वसंत ॠतूचे आगमन होते, कोकीळच्या कूजनाबरोबरच आपल्याला राजाचे पहिले दर्शन घडते.
२) प्रत्यक्षात मूर्त स्वरुपात अवतरताना हा राजा येणार्या सुखद दिवसांची हमी देतो.
३) सगुण सुंदर असे रुपडे सर्वत्र दिसू लागते
४) एकदा का नैवेद्य दाखवला की आपल्या प्रकट दर्शनाने, चवीने, रंग रुपाने बेभान करतो.
५) जेवताना जोडीने गोडी बरोबरच कैरीच्या चटणीच्या रुपात तिखट-आंबट चवीने तृप्त करतो
६) उन्हाळ्यातील सण असोत, घरगुती फक्कड जेवण असो, लग्नातील पंगती असोत, आमरसा शिवाय उन्हाळा सार्थकी लागत नाही.
७) थकून आलेल्यांना उर्जा देताना राजा, पन्हं रुपात येऊन ऊनाचा दाह कमी करतो.
८) बाहेर जेवायला गेलो की फर्माइश होते ती आइस्क्रीम /मिल्कशेकची. तिथेही साहेब आहेतच.
आणि या अवतारात हल्ली बाराही महिने असतात.
आंबा-खोबरं वडी
मिल्कशेक / मस्तानी आणि वर आंब्याच्या रसाळ फोडी...
आइस्क्रीम तर आहेच
९) बरं दरवेळी ताज्या रसरशीत स्वरुपातच यायला हवं असं नाही.
बच्चे कंपनीची आवड
बाराही महिने आंब्याचा सीझन
१०) बरं मंगल कार्यात, सणवारीत यांची उपस्थिती आहेच, डहाळ्यांच्या रुपात.
त.टी. -: मला आंबा अतिशय आवडतो. बरेच दिवस एखादी थीम घेऊन फोटोग्राफी करण्याची इच्छा होती. तेव्हा हा आंब्याचा योग जुळून आला. लिखाणात काही उणिवा वाटल्यास गोड मानून घ्या, आंब्यासारखं , ही विनंती.
यात आम्रखंड / आंबावडी / सुजाता मस्तानी / रसना / गोडांबा / क्रीम बिस्कीट्स/ मँगो केक या मान्यवरांचा समावेश करता आला नाही झब्बू भरभरुन टाकावेत
रंगासेठ यु अँड आंबा बोथ आर
रंगासेठ
यु अँड आंबा बोथ आर टू गुड !!
उगाच उघडला हा धागा,
उगाच उघडला हा धागा,
फोटो मस्तं!
फोटो मस्तं!
रंगासेठ, थीम जबरदस्त आणि
रंगासेठ, थीम जबरदस्त आणि मस्त. लोणचे विसरलात.
सगळे फोटो मस्त.
सगळे फोटो मस्त.
वा रंगासेठ, मस्त फोटो. आंबे
वा रंगासेठ, मस्त फोटो. आंबे बघून तोंडाला पाणी सूट्ले.
भारी फोटो! चटणी म्हटलंय ती
भारी फोटो!
चटणी म्हटलंय ती आंब्याची डाळ वाटते आहे मला.
(पन्ह्यात तेवढ्या दोनचार केशराच्या काड्या दिसल्या असत्या तर....)
आंबापोळी, आंब्याचा शिरा..
आंबापोळी, आंब्याचा शिरा.. झब्बू टाका.
हे घ्या झब्बु मँगो चीझ केक
हे घ्या झब्बु मँगो चीझ केक (मुसच्या आकारात)
सुंदर फोटो.
सुंदर फोटो.
रसाचा, फोडींचा केशरी रंग कसला
रसाचा, फोडींचा केशरी रंग कसला भारी दिसतोय.
मस्त, उन्हाळ्यात गारेगार
मस्त, उन्हाळ्यात गारेगार वाटले फोटो पाहून.
सिंडी, मँगो केक म्हणजे
सिंडी, मँगो केक म्हणजे मिक्सरमधून काढलेली वरणभाताची मूद (बटाट्याच्या फोडी घालून) वाटतेय
आंब्याचे फोटोज बघून जीव जळला
नानबा,
नानबा,
आहाहा... आंबा!!!! मस्त फोटो
आहाहा... आंबा!!!!
मस्त फोटो
इथे हापूस आंबा मिळत नाही
अमेझिंग फोटोज....
अमेझिंग फोटोज....
आंबा इज द बेस्ट... वर्षभर
आंबा इज द बेस्ट...
वर्षभर वाट बघावी लागते मग कुठे खायला मिळतो...
सध्या रस, फोडी अशा रुपात रोज पोटात जात असल्याने फोटु बघुन जीव जळला नाही...
मस्त थीम! आंबा इज द बेस्ट >>
मस्त थीम! आंबा इज द बेस्ट >> +१
क्या बात है!!! जबरदस्त थीम
क्या बात है!!!
जबरदस्त थीम आणि जबरदस्त फोटोज
आता आंबा पुराणाची पारायणं करायला पाहिजेच.
मस्त. चौथा फोटो अतिशय आवडला -
मस्त.
चौथा फोटो अतिशय आवडला - 'आधी पोटोबा मग विठोबा' हे फोकसच्या माध्यमातून अप्रतिम उतरलय.
क्या बात है ! मजा आली अमोल
क्या बात है ! मजा आली
अमोल केळकर
झक्कास...
झक्कास...
वॉव! अप्रतीम!
वॉव! अप्रतीम!
मस्त..
मस्त..
सहीच
सहीच
वा!! मस्तच. आताच फ्रीजमधुन
वा!! मस्तच.
आताच फ्रीजमधुन दोन आंबे काढुन पाण्यात बुडवुन ठेवलेत
आंब्याचे प्रचि बघताना डोळे
आंब्याचे प्रचि बघताना डोळे बंद केले तरी सगळे पुराण आवडले... अप्रतिम!
फोटो दिसत नाही
फोटो दिसत नाही
मस्त, उन्हाळ्यात गारेगार
मस्त, उन्हाळ्यात गारेगार वाटले फोटो पाहून.>>>>>>+++++++++११११
मस्त !
मस्त !
Pages