गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदाही मायबोलीवर आपण लेखनस्पर्धा आयोजित केली होती. रोहन प्रकाशन हे या स्पर्धेचे प्रायोजक होते.
स्पर्धेसाठी एकूण तीन विषय होते व एकूण २८ प्रवेशिका या स्पर्धेत होत्या.
ज्येष्ठ संपादक श्री. आनंद आगाशे व सुप्रसिद्ध चित्रपटदिग्दर्शक व लेखक श्री. सुनील सुकथनकर यांनी तिन्ही विषयांसाठी परीक्षक म्हणून काम केलं.
गुणांकन करताना कुठली प्रवेशिका कोणी लिहिली आहे, हे परीक्षकांना माहीत नव्हतं.
प्रॉव्हीडन्स मधील आपले अधिवेशन तर उत्तमच झाले. काही गोष्टी आपल्याला आवडल्या, काही गोष्टी थोड्या वेगळ्या करता आल्या असत्या, काही गोष्टी अधिक करता आल्या असत्या.
आपल्या मनातले अधिवेशन आणि आलेला अनुभव प्रत्येक वेळा निराळाच असतो. आम्हा एल ए करांना आपले मनोगत जाणून घ्यायचंय. त्यासाठीच एक निबंध स्पर्धा आयोजित करत आहोत, विषय आहे "माझ्या मनातील अधिवेशन".
सुमारे १००० शब्द मर्यादेत (इंग्लिश किंवा मराठी मध्ये) आपले विचार आमच्या कडे १५ डिसेंबर'१३ पर्यंत खालील पत्त्यावर ईमेल करा.
spardha at bmm2015 dot org
पहिल्या तीन निबंधांना योग्य पारितोषिक देण्यात येईल.
नमस्कार सुजनहो,
आज पाडव्याच्या सुमुहुर्तावर हितगुज दिवाळी अंक २०१३ तुमच्या हाती सोपवताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे.
आमची ही निर्मिती तुमच्या पसंतीस कशी उतरते आहे याबद्दल आम्हांला खूप उत्सुकता आहे. तुमच्या सविस्तर अभिप्रायांचं इथे स्वागत आहे.
स्नेहांकित,
संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक २०१३
'एक नेता, एक मैदान' ही शिवसैनिकांची अनेक दशकांपासून श्रद्धा. बाळासाहेब ठाकरे गेले, आणि या श्रद्धेला तडा गेला. महाराष्ट्रातल्या राजकारणाची समीकरणंही त्यांच्या निधनामुळे बदलली.
संहिता
एकात्म एकरस कथा अस्तित्वात असते का?
प्रत्येकाची जीवनगाथा वेगळी , म्हणून जाणून घेण्याची रीत वेगळी.
कथा सांगणारा आपला दृष्टीकोन तिच्यात अटळपणे मिसळतो.
कथा ऐकणारा ती आत्म-गत करत रिचवतो. तोच तर कथेच्या कडीतला पुढचा निवेदक असतो .
चित्रपटाच्या संदर्भात दिग्दर्शक,पटकथालेखक, निर्माता हे कथेच्या तिसऱ्या मितीचे अदृष्य सूत्रधार.
कथेला पडद्यावर सजीव करताना या सर्वांची जाणीवविश्वे कमीअधिक प्रमाणात कथेत पाझरतात.
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!
नमस्कार,
मायबोली गणेश उत्सवाचे हे चौदावे वर्ष! गणेशोत्सव २०१३ सोहळा पहाण्यासाठी
या दुव्यावर जा!
या वर्षीचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला 'इन्व्हेस्टमेंट' हा चित्रपट २० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होतोय. ज्येष्ठ साहित्यिक श्री. रत्नाकर मतकरी यांनी दिग्दर्शक म्हणून या चित्रपटाद्वारे पदार्पण केलं आहे.
पैसा, प्रगती, महत्त्वाकांक्षा यांच्या गर्तेत सापडलेल्या कुटुंबाची कहाणी या चित्रपटात आहे. सुप्रिया विनोद यांची या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका आहे.
मायबोली दिवाळी अंक २०१३ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी या धाग्यावर आपली नावे कळवा. अंकासाठी साधारण दिड-दोन महीने आठवड्यातले काही तास इतका वेळ द्यावा लागेल.
दिवाळी अंकात काम करणार्या प्रत्येक सदस्याकडे घरी इंटरनेट सेवा असणे अत्यावश्यक आहे.
तसेच संपादक मंडळात सहभागी झाल्यावर सगळ्या संपादकांनी इथे नियमित हजेरी लावणे (काही कारणास्तव गैरहजर रहाणार असल्यास मुख्य संपादकांना तसे आधी कळवणे), चर्चांमध्ये सक्रीय सहभागी होणे, अधुन मधुन होणार्या स्काइप मिटींगांना हजेरी लावणे, मुख्य संपादकांनी दिलेल्या जबाबदार्या वेळेवर पार पाडणे अपेक्षित आहे.
राष्ट्रउभारणी ही एक अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. राष्ट्राच्या निर्मितीनंतर राजकीय धोरणे, आर्थिक स्थैर, परराष्ट्रीय संबंध ह्याच बरोबर सामाजिक जडणघडण सुद्धा योग्य दिशेने होणं अतिशय महत्त्वाचं असतं. राष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीत जी वेगवेगळी क्षेत्रं महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यातील एक म्हणजे क्रीडा क्षेत्र. क्रिडाक्षेत्रातला सहभाग आणि यश हे देशातील नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतं, देशाला स्वतःची एक ओळख मिळवून देतं आणि एकीची, राष्ट्रीयत्त्वाची भावना रुजवतं.