भोगनंदिश्वर मंदिर बंगलोर पासुन ४० किमीवर नंदि हिल्सच्या पायथ्याशी येते. येथे २ मंदिरे एकमेकांना लागुन आहेत. भोगनंदिश्वर आणि अरुणाचलेश्वर. ही मंदिरे ८ व्या शतकातील स्थानिक बाणा राजवटीत बांधली गेली. हि मंदिरे मूळ द्राविड शैलीतील आहेत. पण उत्तरोत्तर चोला,होयसळा आणि विजयनगर राजवटीत ह्यांत भर घातली गेली.
प्रचि १
-
-
-
प्रचि २
-
-
-
प्रचि ३
'पंचम' बस नाम ही काफी है!
खरे तर असे असून देखिल पंचम ऊर्फ, राहुल देव बर्मन यांच्याबद्दल कितीही लिहिलं बोललं तरी ते कमीच आहे. संगीत, विशेषतः चित्रपट संगीत अवकाशात पंचम हा असा सूर्य आहे की जे काही आहे ते पंचम च्या ऊदय व अस्ता च्या अलिकडले वा पलिकडले आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये, का ते या लेखमालेत नंतर येईलच. पंचम चे स्थान माझ्या आयुष्यात तरी एखाद्या कुटूंबीयापेक्षा कमी नाहीच त्यामूळे पंचम चा एकेरी ऊल्लेख केवळ त्याच्यावरील माया, आदर व भक्तीपोटी.
अंधारलेली रात्र.....मुसळधार पाऊस सुरू आहे.....रस्त्यावर चिटपाखरूही नाही फक्त एक स्कुटर पळतेय.....रेनकोट घातलेली "एक व्यक्ती" स्कूटरवरून उतरतेय आणि "त्या" घरात शिरतेय.....बेडरूमच्या दारावर येऊन कॅमेरा ऑन झालाय आणि पटापट चार-पाच क्लिक्स घेऊन पुन्हा "ती" व्यक्ती मुसळधार पावसात, त्याच जुन्या स्कूटरून परत निघुन चाललीय. बंगल्याचा गेट उघडा असतानाही "तो" भिंतीवरून आत शिरतो. दारावर पाटी झळकते "श्री. अमर आपटे", पुणे ५२ आणि मग सुरू होतो "एक शोध"
भैय्याच्या घागरीत त्याने बुचकाळलेल्या हाताचा आवाज आणि आंबट गोड पाण्याने लडबडलेलं ते सुखाचं छोटसं गाडगं... खाल्ल्यानंतर जीभेच्या अगदी अंग प्रत्यंगाला चव देऊन जातं. मग पुन्हा भैय्या त्याच्या घागरीतलं पाणी त्या लांब दांड्याच्या चमच्याने ढवळतो आणि पुन्हा तेच सारं. पाणी पुरी... माझं सगळ्यात लाडकं आणि जीवाभावाचं खाणं. भैय्याने देत रहावं आणि मी खात जावं.
संयोजनासाठी नाव द्यावं की नाही अशा चलबिचल अवस्थेतून झालेली सुरुवात आज "अरे! संपलं सुद्धा, आता परत इ-भेट कधी?" अशा हुरहुर लावणार्या अवस्थेत संपली. संयोजनासाठी नाव देताना, हां ठिके! नाव देऊ - झाली निवड तर नेमून दिलेले काम करून कार्य पार पाडू, हा का ना का! एवढं सोपं वाटलं होतं. सुरुवात झाली तीच मुळी फेल गेलेली व्हिडिओ कॉन्फरन्स - मुख्य संयोजकांनी दुसर्या मिटींग नंतर घेतलेली सपशेल माघार - दोन तीन संयोजकांचा नो शो - नव्या संयोजकांची शोधाशोध - त्यांच्याबरोबर पुन्हा करावी लागलेली अथश्री - अशी, बेरीज थोडी आणि वजाबाकी जास्त...
बृह्न्महाराष्ट्र मंडळाच्या १६ व्या अधिवेशनाच्या संयोजनात सक्रीय असणार्या, सौ. अदिती टेलर यांच्याशी नुकताच संवाद साधायची संधी मिळाली.
नमस्कार अदिती, बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या १६ व्या अधिवेशनाच्या संयोजनात तुमची भूमिका काय आहे?
मी अधिवेशनाची उप संयोजक आहे आणि संपूर्ण प्रोग्रामिंगची मुख्य आहे यात ५ वेगवेगळी क्षेत्रे येतात. India programming, north american programming, BMM Saregama, Youth program, kids and teen programming.
तुमच्या विभागातली ताजी खबर काय सांगता येईल.
नमस्कार मंडळी,
गणेशोत्सवातील सर्व स्पर्धांमध्ये आपण बहुसंख्येनी सहभागी झालात, तसेच भरभरून दादही दिलीत, त्याबद्दल संयोजक मंडळातर्फे आपणासर्वांचे मन:पूर्वक आभार.
यावर्षी आम्ही ४ स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
१. तों.पा.सु. - हस्तकला स्पर्धा
२. गर्जा महाराष्ट्र माझा - गटलेखन स्पर्धा
३. मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम् ! - पाककृती स्पर्धा - गोड विभाग व तिखट विभाग
४. चित्र बोलते गुज मनीचे - काव्य-प्रकाशचित्र स्पर्धा